
कोकणात सातेरी देवी, रामेश्वर माऊली, रवळनाथ गांगोभैरी अशी देवस्थानं आहेत. यांच्याबरोबरीने आणखी एका देवस्थानाला गावकरी मोठ्या श्रद्धेने पुजतात. हा देव म्हणजे वेतोबा. याचं प्रमुख स्थान वेंगुर्ले तालुक्यात आहे. तळकोकणात या वेतोबाला मनोभावे पुजलं जातं. गावचा राखणदार म्हणून देखील याला भाविक पुजतात. वेतोबा म्हणजे भुतांचा राजा म्हणून ओळखला जातो. जरी हा भुतांचा राजा असला तरी तो कधीही गावाचं नुकसान करत नाही. वेतोबा गावची राखण करतो आणि म्हणूनच त्याला राखणदार म्हणतात.
रात्रीच्या वेळी निजानीज झाल्यावर वेतोबा गावात फेरी मारतो. गावच्या संरक्षणाची जबाबदारी त्याच्यावर असते. गावकरी जसं या वेतोबाची श्रद्धेने पूजा करतात तितकंतच त्याला घाबरतात देखील. हा राखणदार गावात फेरी मारताना त्याची पायवाट ठरलेली असते. त्यावाटेत घाण केली किंवा घर बांधलं तर त्या वक्तीचं काहीतरी वाईच होतं. आणि राखणदाराचा कोप झाला अशी गावकऱ्यांची समजूत होते. असं हे वेंगुर्ला आणि तळकोकणतील वेतोबा हे जागृत देवस्थान असून या देवाच्या मंदिरात येणारा भाविक फुलं नाही तर चपला देवाला वाहतो. याची देखील एक रंजक गोष्ट आहे.
असं म्हणतात की वेतोबा म्हणजेच राखणदार हा रात्रीच्या वेळी मंदिराच्या बाहेर पडतो.. त्याच्यासमोर सा -या शक्ती नतमस्तक होतात. कोणतीही काळी शक्तीही त्याच्या समोर टिकाव धरू शकत नाही. इतकं त्याचं सत्व असतं. ज्या ज्या वेळी गावावर संकट येतं तेव्हा वेतोबाचे नुसते स्मरण करावं म्हणजे कुळावर किंवा गावावर आलेलं संकटही नाहीसं होतं असा गावकऱ्यांचा विश्वास आहे.
वेतोबा सातत्याने गावात फेरी मारतो असतो. त्यामुळे चप्पल झिजतात आणि म्हणूनच भाविक किंवा गावकरी वेतोबाच्या मंदिरात फुलं नाही तर चपला वाहतात. गावकऱ्यांच्या या श्रद्धेला आणि विश्वासाला वेतोबा प्रतिसाद देतो असं म्हटलं जातं. भक्तांच्या रक्षणासाठी वेतोबा सातत्याने भ्रमंती करतच असतो. तो भक्तांची काळजी घेतो. म्हणून भक्त त्याचा त्रास हलका करण्यासाठी मंदिरात चपला वाहिल्या जातात. वेंगुर्ल्यातील आरवली या गावात वेतोबाचं मुख्य आणि जागृत देवस्थान आहे. या मंदिरात लाखो चपलांचा ढीग दिसतो. वेतोबा गावचं रक्षण करतो असा इथल्य़ा गावकऱ्यांचा ठाम विश्वास आहे.
Ans: वेतोबा हे कोकणातील ग्रामदेवता असून त्यांना गावाचा राखणदार मानले जाते. अनेक आख्यायिकांमध्ये त्यांना भुतांचा राजा म्हटलं असलं, तरी ते नेहमी गावकऱ्यांचं रक्षण करणारे, न्याय देणारे आणि संकट दूर करणारे देव मानले जातात.
Ans: वेतोबाचं प्रमुख आणि जागृत देवस्थान वेंगुर्ले तालुक्यातील आरवली गावात आहे. तळकोकणात या देवाची अतिशय मोठी भक्ती केली जाते.
Ans: कोकणात विविध अलौकिक गोष्टी आणि भुतांच्या कथा प्रसिद्ध आहेत. या सर्वांपेक्षा वरचढ, शक्तिमान आणि सर्व शक्तींना वश करणारा देव म्हणजे वेतोबा. त्यामुळेच त्याला भुतांचा राजा अशी ओळख आहे. पण हा “राजा” नेहमी गावाचं रक्षण करतो, नुकसान नाही.