या जगात अनेक आश्चर्य आहेत सोशल मीडियामुळे अगदी घरबसल्या जगातल्या कानाकोपऱ्यातली माहिती अगदी सहजपणे मिळते. भरातात असे अनेक देवस्थानं आहेत जिथे काही ना काही वैशिष्ट्य आहे. जसं त्र्यंबकेश्वरला गरम पाण्याचं कुंड आहे जे त्या देवस्थाचं वेगळेपण आहे अगदी तसंच कोकणातील देवस्थानाच्या परिसरात एक अशी विहिर आहे. या विहिरीचं पाणी इतर विहिरींपेक्षा खुप वेगळी आहे. असं म्हणतात की या विहिरीतल्या पाच कळशी पाण्याने अंघोळ केली तर किती ही वाढलेला त्वचारोग कमी होतो. कोकणात नेमकं कुठ आहे ही विहीर चला तर मग जाणून घ्या.
तळकोकण म्हणजे सिंधुदुर्ग, कुडाळ आणि देवगड ते गोव्याच्या सीमेवर असलेल्या गावांमध्ये देवी सातेरीला मोठं महत्व आहे. ही सातेरी काहींची कुलदैवत तर काहींची ग्रामदेवता आहे. पारंपरिक कौलारु मंदिर हे कोकणातचं आणखी एक लोभसवाणं सौंदर्य. मालवण तालुक्यातील सातोरे गावातील सातेरी देवीचं मंदिर मन वेधून घेतं. लाल माती, नारळी पोफळीच्या बागा, पारंपरिक कौलारु छत असं हे मंदिर दिसायला जितकं सुंदर आहे तेवढंच ते एका वेगळ्या कारणाने देखील पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. ते म्हणजे मंदिर परिसरातील विहिर. सिंधुदुर्गातून गोव्याला जाताना वाटेत हे गाव लागतं. या गावातील सातेरी देवीच्या मंदिराच्या समोर असलेलेल्या विहिरीचं वैशिष्ट्य आहे.
असं म्हणतात की, या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही जर या विहिरीतलं पाच कळशी पाण्याने अंघोळ केली तर तुम्हाला कितीही गंभीर असलेला त्वचारोग दूर होतो. किंवा भविष्यात होत देखील नाही. या मंदिरात येणारे भाविक हे विहिरीवर अंघोळ केल्याशिवाय पुढे जात नाही. तर याचं शास्त्रीय कारण असं की, या विहिरीच्या पाण्यात नैसर्गिकरित्या सल्फर आढळतं. सल्फरयुक्त पाणी असल्याने हे पाणी त्वचारोग दूर करण्यास मदत करतं. ही विहीर नैसर्गिक साल्फरयुक्त पाण्याने भरलेली असून, त्वचारोगांवर प्रभावी उपचारात्मक गुणधर्म असलेली मानली जाते. याबाबतची माहिती सुजल गायकवाड यांनी दिली आहे.
खाज, खवखव, सोरायसिस, एक्झिमा, फंगल इन्फेक्शन यांसारख्या त्वचारोगांवर या विहिरीचं पाणी उपयुक्त आहे. या पाण्याने अंघोळ केल्याने त्वचेचा पोषण मिळतं असं गावकऱ्यांच म्हणणं आहे. सुल्फर त्वचेतील डेड सेल्स दूर करूननव्या पेशींची निर्मिती वाढवते.त्यामुळे त्वचा अधिक स्वच्छ, उजळ आणि निरोगी दिसते.
सल्फरमध्ये नैसर्गिक अँटीसेप्टिक व अँटीबॅक्टेरियल घटक असतात. त्यामुळे त्वचेवरील संसर्गाचा धोका कमी होतो.
हे पाणी जमिनीखालच्या नैसर्गिक उष्ण जलस्रोतांमधून येतं.यामध्ये नैसर्गिकरित्या गंधक (Sulphur) मिसळलेलं असल्याने त्याला हलकासा खास गंध देखील जाणवतो. या सातेरी देवीच्या मंदिराचं जसं पावित्र्य आहे तेवढंचं पावित्र्य गावकऱ्यांनी आणि भक्तांनी या विहिरीचं देखील ठेवलं आहे.






