Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Janmashtami 2025: श्रीकृष्णांना प्रिय असलेल्या या गोष्टींचे करा दान, सर्व दुःख आणि गरिबी होईल दूर

जन्माष्टमीचा सण हा केवळ पूजेसाठी मर्यादित नसून देवाच्या भक्ती आणि सेवेसाठी स्वतःला समर्पित करण्याची संधी आहे. या दिवशी गरजूंना काही गोष्टींचे दान करणे फायदेशीर ठरू शकते. कोणत्या गोष्टींचे दान करावे, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 11, 2025 | 02:08 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

जन्माष्टमीचा सण हा भगवान श्रीकृष्णाच्या पराक्रमांची आठवण करून देणारा हा एक खास दिवस. या दिवशी श्रीकृष्णाचे भक्त उपवास करतात. चित्रे सजवतात आणि रात्री 12 वाजता जन्माष्टमीचा सण साजरा केला जातो. जो भक्त भक्तिभावाने उपवास करुन श्रीकृष्णाची पूजा करतात आणि देवाला प्रिय असलेल्या वस्तूंचे दान करतात अशा लोकांच्या जीवनातील सर्व दुःख आणि दारिद्र्य दूर होते. यंदा जन्माष्टमीचा सण शुक्रवार, 15 ऑगस्ट रोजी आहे. खासकरुन श्रीकृष्णाला ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टींचे दान करणे शुभ मानले जाते. जन्माष्टमीच्या दिवशी कोणत्या गोष्टींचे दान करावे, जाणून घ्या

कधी आहे जन्माष्टमी

यंदा जन्माष्टमी तिथीची सुरुवात शुक्रवार, 15 ऑगस्ट रोजी रात्री 11.49 वाजता सुरू होणार आहे आणि या तिथीची समाप्ती शनिवार, 16 ऑगस्ट रोजी रात्री 9.34 वाजता होईल. त्यामुळे जन्माष्टमीचा सण यावेळी शुक्रवार 15 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येणार आहे. तर दहीहंडीचा सण शनिवार, 16 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येणार आहे.

जन्माष्टमीला करा या गोष्टींचे दान

धार्मिक मान्यतेनुसार, जन्माष्टमीच्या दिवशी जो व्यक्ती भक्तिभावाने दान करतो, त्याच्या जीवनातील वाईट काळाचा प्रभाव कमी होतो. या दिवशी दान केल्याने पुण्य लाभते, अशी मान्यता आहे. ज्या वस्तू भगवान श्रीकृष्णांना प्रिय आहेत त्या वस्तूंचे दान केल्याने तुम्हाला त्याचा अनेक पटींनी फायदे होताता.

Vastu Tips: घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर कोणत्या देवतेचा फोटो लावणे असते शुभ

जन्माष्टमीच्या दिवशी कोणत्या वस्तूंचे दान करावे

अन्न आणि फळांचे दान

जन्माष्टमीच्या दिवशी गरीब किंवा गरजूंना अन्न, फळे किंवा मिठाई यांचे दान करावे. त्यामुळे घरातमध्ये समृद्धी येते आणि अन्न आणि पेयाची कधीही कमतरता भासत नाही.

लोणी आणि साखरेचे दान

भगवान श्रीकृष्णाला लोणी खूप आवडते. त्यामुळे या दिवशी गाईच्या दुधापासून बनवलेले लोणी आणि साखरेचे दान करणे खूप शुभ मानले जाते.

मोरपंखाचे दान करणे

श्रीकृष्णाच्या मुकुटाचा अभिमान म्हणजे मोरपंख. हे मोरपंख मंदिरात किंवा ब्राह्मणाला दान करावे. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होते.

Vastu Tips: घरामध्ये तुळशीचे रोप कोणत्या दिशेला लावावे? जाणून घ्या ज्योतिषशास्त्रीय टिप्स

कपडे आणि चप्पल बूट

मुलांना नवीन कपडे किंवा चप्पल-बूट यांचे दान करणे पुण्याचे मानले जाते. असे देखील मानले जाते, विशेषतः बाळ गोपाळांच्या मूर्तीच्या रूपात मुलाला काहीतरी देणे शुभ असते.

कामधेनू गाईची मूर्ती

असे मानले जाते की, व्यक्तीच्या मनातील सर्व इच्छा कामधेनू गाय पूर्ण करते. त्यामुळे तिची छोटी मूर्ती मंदिरात किंवा पुजाऱ्याला दान करावे, त्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी येते, अशी मान्यता आहे.

बासरीचे दान

बासरी ही भगवान श्रीकृष्णाची ओळख आहे. ती मुलांना किंवा मंदिरात दान केल्याने मन शांत राहते आणि मानसिक ताण देखील कमी होतो.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Janmashtami 2025 donate these things all sorrow and poverty will be gone

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2025 | 02:08 PM

Topics:  

  • dharm
  • Krishna Janmashtami
  • religions

संबंधित बातम्या

Krishna Death Mystery: श्रीकृष्णांच्या मृत्यूनंतर त्यांच्या शरीराचे काय झाले? जाणून घ्या महाभारतातील रहस्यमय कथा
1

Krishna Death Mystery: श्रीकृष्णांच्या मृत्यूनंतर त्यांच्या शरीराचे काय झाले? जाणून घ्या महाभारतातील रहस्यमय कथा

Krishna Janmashtami 2026: सजायला वेळ नाही? नो टेंशन, Gemini AI च्या मदतीने घरबसल्या तयार करा राधाराणीसारखा फोटो
2

Krishna Janmashtami 2026: सजायला वेळ नाही? नो टेंशन, Gemini AI च्या मदतीने घरबसल्या तयार करा राधाराणीसारखा फोटो

Janmashtami Dream Meaning: स्वप्नात श्रीकृष्ण बासरी वाजवताना पाहणे शुभ की अशुभ, जाणून घ्या
3

Janmashtami Dream Meaning: स्वप्नात श्रीकृष्ण बासरी वाजवताना पाहणे शुभ की अशुभ, जाणून घ्या

Monthly Horoscope: सप्टेंबर महिना सर्व राशींच्या लोकांसाठी कसा राहील, जाणून घ्या
4

Monthly Horoscope: सप्टेंबर महिना सर्व राशींच्या लोकांसाठी कसा राहील, जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.