फोटो सौजन्य- pinterest
हिंदू धर्मामध्ये तुळशीच्या रोपाला पवित्र मानले जाते. घरामध्ये गुरुवार आणि शुक्रवारी तुळशीचे रोप लावणे शुभ मानले जाते. यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढलेली राहते. तसेच सुख समृद्धी राहते.
घरामध्ये तुळशीचे रोप लावल्याशिवाय ते अर्पूण आहे. प्रत्येक सनातनी घरात तुळशीचे रोप असते. तुळशीचे रोप अत्यंत पवित्र मानले जाते. शास्त्रांनुसार, सकाळी आणि संध्याकाळी तुळशीची पूजा केल्याने गरिबी दूर होते आणि घरात सकारात्मक ऊर्जा वाहते. घरामध्ये तुळशीच्या रोपाची योग्य पद्धतीने पूजा करणे फायदेशीर मानले जाते.
धार्मिक मान्यतेनुसार, तुळशीचे रोप लावल्याने सुख समृद्धी वाढते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. वास्तुशास्त्रात तुळशीचे रोप लावण्यासाठी योग्य दिवस मानला जातो. तुळशीचे रोप कोणत्या दिवशी लावावे? घरात तुळशीचे रोप कोणत्या दिशेला लावल्याने काय फायदा होतो? जाणून घ्या
शास्त्रामध्ये म्हटल्यानुसार, तळशीच्या रोपाची सकाळी आणि संध्याकाळी पूजा केल्याने गरिबी दूर होते. तसेच घरामध्ये सकारात्मक उर्जेचे आगमन होते. वास्तुशास्त्रामध्ये तुळशीचे रोप योग्य ठिकाणी लावल्याने घरामध्ये सुख समृद्धी वाढते, असे मानले जाते.
मान्यतेनुसार, घरामध्ये तुळशीचे रोप लावण्यासाठी गुरुवार आणि शुक्रवारचा दिवस खूप शुभ मानले जाते. कारण गुरुवारचा दिवस भगवान विष्णू आणि शुक्रवारचा दिवस देवी लक्ष्मीला समर्पित आहे. त्यामुळे या दिवशी तुळशीचे रोप लावल्याने आर्थिक समस्या दूर होतात.
घरामध्ये तुळशीचे रोप रविवार, सोमवार आणि बुधवारी लावणे अशुभ मानले जाते. या दिवशी तुळस लावणे निषिद्ध मानले जाते.
घरामध्ये नेहमी तुळशीचे रोप ईशान्य दिशेला लावावे. कारण उत्तर दिशा ही देवी लक्ष्मीची दिशा मानली जाते. या दिशेला तुळशीचे रोप लावल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. असे देखील मानले जाते की, या दिशेला देवी देवतांचे स्थान आहे. त्याचप्रमाणे हिरव्या रंगाचे देखील प्रतिनिधित्व करते. त्यामुळे तुळशीचे रोप योग्य दिशेला लावणे शुभ मानले जाते.
तुम्ही घराच्या दक्षिण दिशेला तुळशीचे रोप लावणे खूप अशुभ असते. वास्तुनुसार या रोपाची जागा निवडा.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)