Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jyotiba story: ज्योतिबा आणि गुलाल यांचं नातं आहे खूप खास, जाणून घ्या यामागील कारण

ज्योतिबा आणि गुलाल यांचं नातं अतूट आणि भक्तिभावाने नटलेलं आहे. महाराष्ट्रातील लोकपरंपरेत ज्योतिबाच्या यात्रेत गुलाल उधळण्याची प्रथा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. ज्योतिबा आणि गुलाल यांचं नातं का खास आहे, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: May 03, 2026 | 09:00 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • ज्योतिबा आणि गुलाल यांचं नातं
  • गुलाल तयार करण्याची पद्धत
  • ज्योतिबाला गुलाल उधळण्याचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व
गुलालाचा लाल रंग हा शक्ती, उत्साह आणि भक्तीचे प्रतीक मानला जातो, त्यामुळे भक्त देवाच्या चरणी गुलाल अर्पण करून आपली श्रद्धा व्यक्त करतात. या परंपरेमागे केवळ धार्मिक भावनाच नाही, तर सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संदर्भही दडलेले आहेत. ज्योतिबाला उधळला जाणारा गुलाला हा वेगळा आहे. याचा रंगही वेगळा आहे. हे तुमच्या लक्षात आलंच असेल. याबद्दल माहिती जाणून घेऊया

ज्योतिबा देव आणि गुलाल यांचे अतूट नाते

चैत्र पौर्णिमेचा गुलाल उत्सव हा महाराष्ट्रातील सर्वांत मोठा आणि प्रसिद्ध यात्रा महोत्सावांपैकी एक आहे. या यात्रेत लाखो भाविक सहभागी होऊन ज्योतिबाच्या नावानं चांगभलंच्या जयघोषात गुलालाची उधळण करतात. ज्योतिबा देव आणि गुलाल याचं नातं अतूट मानलं जातं. ज्योतिबाच्या यात्रेचं सर्वांत मोठं वैशिष्ट्य म्हणजे डोंगरावर उधळला जाणारा गुलाल. भक्त चांगभलं असा जयघोष करत गुलाल उधळतात आणि संपूर्ण परिसर गुलाबी रंगांने न्हाहून निघतो. हे दृश्य अत्यंत आकर्षक आणि भक्तिमय मानला जातो. यामुळे संपूर्ण डोंगराचा रंग गुलाबी होतो म्हणूनच याला पिंक टेंपल असंही म्हणतात.

Jyotiba story: ज्योतिबाच्या नावानं चांगभलं! अनेकांचे कुलदैवत असणाऱ्या ज्योतिबाची कथा

गुलाल तयार करण्याची पद्धत

ज्योतिबा देवाच्या चरणी अर्पण केला जाणारा गुलाल हा अत्यंत पवित्र आणि विशिष्ट पद्धतीने तयार केला जातो. हा गुलाल मुख्यत्वे नैसर्गिक आणि सेंद्रिय घटकांपासून बनतो. यात प्रामुख्याने लाल चंदन, डाळिंब्याच्या सुकवलेल्या साली आणि रोहतकाचे फूल जे गुलाला लाल रंग देतं. तर याचा बेस म्हणून आरारूट पावडर वापरली जाते. त्याला सुगंध जटामांसी या औषधी वनस्पतीमुळे येतो. त्यामुळे हा गुलाल औषधी गुणधर्मानी युक्त असतो. याचा कोणताही त्रास त्वचेला होत नाही. गुलाल उधळण्यामागे अनेक लोकश्रद्धा आणि कथा देखील सांगितल्या जातात. लोककथेनुसार, ज्योतिबा देवांनी राक्षसांवरती विजय मिळविल्यानंतर भक्तांनी आनंद व्यक्त करण्यासाठी गुलाल उधळला. त्या विजयाचं प्रतीक आणि उत्सवाचं प्रतीक म्हणून ही परंपरा पुढे सुरू राहिली. भक्तांचा असा विश्वास आहे, गुलाल उधळल्यामुळे वातावरण पवित्र होतं आणि देवदेवतांची कृपा होते. काही लोक गुलाल कपाळाला लावतात तर काहीघरी प्रसादासारखाही घेऊन जातात.

Numberlogy:  मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व

ज्योतिबा मंदिर परिसरात चैत्र महिन्यात भरवल्या जाणाऱ्या यात्रेमध्ये लाखो भाविक सहभागी होतात. त्यावेळी गुलालाची इतकी उधळण होते की हा डोंगर गुलाबी दिसतो. ढोल ताशांचा गजर, चांगभलंचा जयघोष आणि हवेत उडणारा गुलाला त्यामुळे एक वेगळचं भक्तिमय वातावरण तयार होतं. असं म्हणतात, या चैत्र यात्रेनंतर हा गुलाल धुवून टाकण्यासाठी पाऊस ही हजेरी लावतो. त्यामुळे हा सगळा गुलाल धुवून निघतो. त्यामुळे ज्योतिबा देवाचं नाव घेतलं की गुलालाची आठवण ही नक्कीच होते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: गुलाल उधळण्यामागे काय कारण आहे?

    Ans: लोकश्रद्धेनुसार, ज्योतिबा देवांनी दुष्ट शक्तींवर विजय मिळवल्यानंतर आनंद व्यक्त करण्यासाठी गुलाल उधळण्याची परंपरा सुरू झाली.

  • Que: ज्योतिबा मंदिराला “पिंक टेंपल” का म्हणतात?

    Ans: उत्सवाच्या वेळी इतका गुलाल उधळला जातो की संपूर्ण डोंगर गुलाबी दिसतो, म्हणून त्याला “पिंक टेंपल” असेही म्हटले जाते.

  • Que: गुलालाचे धार्मिक महत्त्व काय आहे?

    Ans: गुलाल हा भक्ती, विजय आणि आनंदाचे प्रतीक मानला जातो. देवाच्या चरणी अर्पण केल्याने श्रद्धा व्यक्त होते.

Web Title: Jyotiba story the reason behind jyotiba and gulal special relationship

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2026 | 09:00 AM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • religions

संबंधित बातम्या

Bhadrapad Purnima 2026: भाद्रपद पौर्णिमा कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा विधी आणि पितृपक्षाशी संबंध
1

Bhadrapad Purnima 2026: भाद्रपद पौर्णिमा कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा विधी आणि पितृपक्षाशी संबंध

Mangal Gochar: मंगळाचा पुष्य नक्षत्रात प्रवेश; ‘या’ राशीच्या लोकांची रखडलेली कामे होतील पूर्ण
2

Mangal Gochar: मंगळाचा पुष्य नक्षत्रात प्रवेश; ‘या’ राशीच्या लोकांची रखडलेली कामे होतील पूर्ण

Numberlogy: मूलांक ३ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
3

Numberlogy: मूलांक ३ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Pitru paksha: अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी पितृपक्षाची सुरुवात का होते? गणेशोत्सव आणि पितृपक्षाचा काय आहे संबंध
4

Pitru paksha: अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी पितृपक्षाची सुरुवात का होते? गणेशोत्सव आणि पितृपक्षाचा काय आहे संबंध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.