Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kamada Ekadashi: आज कामदा एकादशी; जाणून घ्या श्री हरीच्या पूजेच्या मुहूर्ताची वेळ अन् पद्धत

कामदा एकादशी 2025: हिंदू पंचांग नुसार, चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला कामदा एकादशी असते. या एकादशीला उपवास केला जातो. चला जाणून घेऊया पूजेचा शुभ मुहूर्त आणि पद्धत कोणती.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 08, 2025 | 10:35 AM
EKADASHI(फोटो सौजन्य- PINTEREST)

EKADASHI(फोटो सौजन्य- PINTEREST)

Follow Us
Close
Follow Us:

हिंदू पंचांग नुसार, चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला कामदा एकादशीचा उपवास केला जातो. कामदा एकादशीला ‘चैत्र शुक्ल एकादशी’ असेही म्हंटले जाते, कारण हे चैत्र नवरात्रीच्या नंतर येते.

Hanuman Jayanti: पाकिस्तानमध्ये स्थित आहे ‘हे’ १,५०० वर्ष जुने हनुमान मंदिर; काय आहे खासियत? जाणून घ्या

७ एप्रिल म्हणजेच आज कामदा एकादशीचा उपवास ठेवला जातो. हिंदू धर्मात अनेक त्योहार साजरे केले जातात. यात सगळ्यात विशेष असते ते म्हणजे एकादशी. एकादशीच्या पवित्र दिवशी आपण भगवान विष्णूची पूजा करतो आणि भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी लोक उपवास ठेवतात आणि त्यांची पूजा करतात. हिंदू पंचांगानुसार, चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला कामदा एकादशीचे उपवास केले जाते. कामदा एकादशीला ‘चैत्र शुक्ल एकादशी’ असेही म्हंटले जाते, कारण हे चैत्र नवरात्रीच्या नंतर येते.

कामदा एकादशी 2025 शुभ मुहूर्त
पंचांगानुसार, चैत्र महिन्यातील एकादशी तिथी ७ एप्रिल रोजी म्हणजे काल रात्री ८ वाजता सुरू झाली आहे आणि ही तिथी ८ एप्रिल रोजी म्हणजे उद्या रात्री ९.१२ वाजता संपेल. कामदा एकादशीचे पारण ९ एप्रिल रोजी सकाळी ६.०२ ते ८.३४ पर्यंत असेल.

कामदा एकादशी पूजेची विधी
एकादशीचा उपवास करण्यापूर्वी जेवणानंतर भगवान विष्णूचे स्मरण करावे आणि एकादशीच्या दुसऱ्या दिवशी उपवास करण्याचा संकल्प करावा आणि देवाची प्रार्थना करावी. या दिवशी भगवान विष्णूला फुले, फळे, दूध, पंचामृत, तीळ इत्यादी अर्पण करावेत. देवाची पूजा केल्यानंतर दिवसभर देवाचे नाव जपावे आणि रात्री जागरण करावे. एकादशीच्या दुसऱ्या दिवशी हे उपवास सोडले जाते.

कामदा एकादशीला उपवास करताना दिवसातून फक्त एकदाच जेवावे ज्यामध्ये दूध, फळे, भाज्या आणि सुक्या मेव्यापासून बनवलेले अन्न असावे. या दिवशी फक्त सात्विक आणि शाकाहारी अन्नच सेवन करावे. तसेच, तांदूळ, मूग डाळ, गहू आणि बार्ली खाऊ नये. सूर्यास्तापूर्वी अन्न ग्रहण करावे परंतु एकादशीच्या दुसऱ्या दिवशी ब्राह्मणाला दक्षिणा आणि भोजन देऊनच अन्न ग्रहण करावे.

कामदा एकादशी उपाय
१. जर तुम्हाला आर्थिक अडचणी येत असतील, तर तुम्ही कामदा एकादशीला भगवान विष्णूचा बीज मंत्र जपला पाहिजे आणि तो मंत्र आहे- ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः’.
२. जर तुमच्या कारकिर्दीत समस्या येत असतील तर एकादशीला भगवान विष्णूला ११ पिवळी फुले अर्पण करा. या दिवशी विष्णू चालीसा पाठ करणे देखील फायदेशीर आहे.

Web Title: Kamada ekadashi today is kamada ekadashi know the time and method of worshiping shri hari

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2025 | 10:35 AM

Topics:  

  • hindu religion

संबंधित बातम्या

भारताचं ते रहस्यमयी मंदिर, जे दिवसातून दोनदा अचानक होतं गायब… सत्य वाचताच तुम्हालाही बसेल धक्का
1

भारताचं ते रहस्यमयी मंदिर, जे दिवसातून दोनदा अचानक होतं गायब… सत्य वाचताच तुम्हालाही बसेल धक्का

‘यमगंड’ म्हणजे काय, दिवसातून एकदा ‘साक्षात् मृत्यू’ला निमंत्रण; यमाची वेळ टाळण्यासाठी 6 कामांपासून रहा दूर
2

‘यमगंड’ म्हणजे काय, दिवसातून एकदा ‘साक्षात् मृत्यू’ला निमंत्रण; यमाची वेळ टाळण्यासाठी 6 कामांपासून रहा दूर

Pitru Paksha 2025: पितृपक्ष कधी सुरू होणार? तृतीया-चतुर्थी श्राद्ध एकाच दिवशी, जाणून घ्या
3

Pitru Paksha 2025: पितृपक्ष कधी सुरू होणार? तृतीया-चतुर्थी श्राद्ध एकाच दिवशी, जाणून घ्या

सीताकुंड ते महेशखली…ISI चा बांगलादेशातील हिंदू मंदिरांवर ‘घातक डाव’,चंद्रनाथ धामवर मशीद बांधण्याचा कट?
4

सीताकुंड ते महेशखली…ISI चा बांगलादेशातील हिंदू मंदिरांवर ‘घातक डाव’,चंद्रनाथ धामवर मशीद बांधण्याचा कट?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.