Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 27 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karwa Chauth 2026: करवा चौथला द्रौपदीनेही केलं होतं व्रत? भगवान श्रीकृष्णाने सांगितलेली कथा जाणून घ्या

Karwa Chauth 2026: करवा चौथच्या व्रताला धार्मिक आणि पारंपरिक महत्त्व आहे. या कथेनुसार, अर्जुन तपस्येसाठी गेल्यानंतर द्रौपदी चिंतेत पडली होती. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने तिला कर्क चतुर्थी अर्थात करवा चौथ व्रताची माहिती सांगितली.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 27, 2026 | 03:58 PM
Karwa Chauth 2026: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Karwa Chauth 2026: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • द्रौपदीला श्रीकृष्णाने करवा चौथ व्रत सांगितल्याची कथा
  • पार्वती-शंकराच्या उदाहरणातून व्रताचे महत्त्व
  • चंद्रदर्शन, अर्घ्य आणि पूजेनंतर उपवास सोडण्याची परंपरा

करवा चौथ काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. यादिवशी लग्न झालेल्या बायका आपल्या पतीचे दीर्घ आयुष्य वाढावे म्हणून कडक उपवास पकडतात. दिवसभर अन्नाचा-पाण्याचा एकही थेंबही न पिता उपवास धरतात. संध्याकाळच्या वेळेस कथा ऐकतात आणि रात्रीचे चंद्राचे दर्शन घेऊन उपवास सोडतात. या सणाची मुळ ही महाभारताची जुनी कथा आहे. खुद्द भगवान श्रीकृष्णाने द्रौपदीला हा उपवास करायला सांगितला होता. Karwa Chauth 2026:

अर्जुन तपस्येला गेला आणि द्रौपदी चिंतेत पडली

महाभारतातली गोष्ट आहे. अर्जुन एकदा देवांकडून दिव्य शस्त्र मिळवण्यासाठी पर्वतावर तप करायला गेला होता. तो खूप दिवस घरी नव्हता. अर्जुन नसल्यामुळे द्रौपदीला एकटं वाटू लागलं. घरात, बाहेर सगळीकडे संकटं आहेत असं तिला वाटायला लागलं. मनात सारखी भीती आणि काळजी. अशावेळी तिला धाव घ्यावीशी वाटली ती फक्त कृष्णाची. तिने कृष्णाला हाक मारली आणि म्हणाली, “कृष्णा, अर्जुन नाहीये, मला काही सुचत नाहीये, सगळं अवघड वाटतंय, काहीतरी मार्ग दाखव.

“तेव्हा कृष्णाने तिला धीर दिला आणि एक व्रत सांगितलं. तो म्हणाला, “एक व्रत आहे, त्याचं नाव कर्क चतुर्थी, आपण त्यालाच करवा चौथ म्हणतो. हे व्रत बायका आपल्या नवऱ्याच्या भल्यासाठी करतात. याने संसारात सुख येतं, अडचणी दूर होतात.”

Vastu Tips OF Wall Colour: दिवाळीपूर्वी घर रंगवताना चूक करू नका! वास्तुशास्त्रानुसार ‘हे’ रंग आणतील सुख-समृद्धी?

कृष्णाने सांगितले पार्वती-शिवाचे उदाहरण

कृष्ण फक्त एवढ्यावरच थांबला नाही. त्याने द्रौपदीला अजून एक गोष्ट सांगितली. तो म्हणाला, “असाच प्रश्न एकदा देवी पार्वतीने भगवान शंकराला विचारला होता. माझ्या पतीसाठी मी काय करू, जेणेकरून त्याचं कल्याण होईल? तेव्हा शंकराने पार्वतीला हेच व्रत करायला सांगितलं होतं. हे व्रत केलं की वैवाहिक जीवनातले विघ्न निघून जातात आणि अखंड सौभाग्य प्राप्त होतं.”हे सगळं ऐकल्यावर द्रौपदीचं मन शांत झालं. तिने ठरवलं की आपण पण हे व्रत करूया. मग तिने अगदी मनोभावे आणि नियमाप्रमाणे हे व्रत केलं. करवा देवीची, शंकर आणि पार्वतीची पूजा केली. कृष्णाच्या तोंडूनच या व्रताची पूर्ण कथा ऐकून घेतली. संध्याकाळी चंद्राला अर्घ्य देऊन तिने उपवास सोडला. असं मानतात की या व्रतामुळे तिच्या आयुष्यातले सगळे त्रास संपले.

Shukra uday: शुक्राच्या उदयामुळे या राशींच्या लोकांचे नशीब पालटणार, करिअरमध्ये यश मिळण्याची शक्यता

या दिवशी पूजा कशी करतात?

करवा चौथची पूजा कशी करायची हे पण सोप्या भाषेत समजून घेऊया. सकाळी लवकर उठून स्नान करायचं, घर आणि देवघर स्वच्छ करायचं. पहाटे सासूने दिलेली सरगी खायची. सरगी खाल्ल्यावर देवाचं नाव घेऊन आज दिवसभर मी काहीही खाणार-पिणार नाही असा संकल्प करायचा.

संध्याकाळ झाली की पूजेची तयारी करायची. एका ठिकाणी थोडी माती घेऊन छोटी वेदी तयार करायची, त्यावर देवी-देवता बसवायचे. समोर एक करवा म्हणजे छोटं मडकं ठेवायचं. त्यात पाणी भरून त्याची पूजा करायची.

अगरबत्ती, दिवा लावायचा, कुंकू, हळद, चंदन लावायचं.

चंद्र यायच्या आधी सगळ्या बायका एकत्र बसून या व्रताची कथा ऐकतात. मग चंद्र उगवला की चाळणीतून आधी चंद्राला पाहायचं, त्याला पाण्याचा अर्घ्य द्यायचा आणि नंतर आपल्या पतीचा चेहरा पाहायचा. मगच उपवास सोडायचा.उपवास सोडल्यानंतर सून आपल्या सासूला नमस्कार करते. तिला मिठाई, फळं, सुका मेवा आणि काही पैसे देऊन आशीर्वाद घेते. बऱ्याच घरांमध्ये कुंकू, बांगड्या, टिकली, आरसा, कंगवा अशा सुहागाच्या वस्तू पण सासूला किंवा घरातल्या मोठ्या बाईला दिल्या जातात. प्रत्येक राज्यात, प्रत्येक घरात थोडी वेगळी पद्धत असते, पण उद्देश एकच असतो – नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना.सार बदलू शकतात.

💡

Frequently Asked Questions

  • Que: करवा चौथ व्रत का केले जाते?

    Ans: पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि वैवाहिक जीवनाच्या सुख-समृद्धीसाठी महिला हे व्रत करतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे.

  • Que: द्रौपदीला करवा चौथ व्रत कोणी सांगितले?

    Ans: दिलेल्या कथेनुसार, अर्जुन तपस्येला गेल्यानंतर चिंतेत असलेल्या द्रौपदीला भगवान श्रीकृष्णाने हे व्रत सांगितले.

  • Que: करवा चौथच्या कथेत पार्वती आणि शंकराचा उल्लेख का आहे?

    Ans: कथेनुसार, भगवान शंकराने देवी पार्वतीला हे व्रत सांगितल्याचे उदाहरण श्रीकृष्ण द्रौपदीला देतात.

Web Title: Karwa chauth 2026 draupadi lord krishna story rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2026 | 03:57 PM

Topics:  

  • hindu religion
  • karwa chauth
  • Religion Conversion
  • religion news

संबंधित बातम्या

Dev Puja Rules: देवपूजेत अत्तराचा उपयोग करण्याचे महत्त्व काय? कोणत्या देवतेच्या पूजेत घ्यावी विशेष
1

Dev Puja Rules: देवपूजेत अत्तराचा उपयोग करण्याचे महत्त्व काय? कोणत्या देवतेच्या पूजेत घ्यावी विशेष

Karwa Chauth Mehndi Designs: नवविवाहित महिलांसाठी करवा चौथसाठी खास मेहंदी डिझाइन
2

Karwa Chauth Mehndi Designs: नवविवाहित महिलांसाठी करवा चौथसाठी खास मेहंदी डिझाइन

Valmiki Jayanti: आदिकवी महर्षी वाल्मिकी कोण होते? रामायणाची रचना आणि त्यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रवास
3

Valmiki Jayanti: आदिकवी महर्षी वाल्मिकी कोण होते? रामायणाची रचना आणि त्यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रवास

Shivling Abhishek: महादेवाच्या शिवपिंडीवर जलाभिषेक का करतात? जाणून घ्या धार्मिक कारण आणि महत्त्व
4

Shivling Abhishek: महादेवाच्या शिवपिंडीवर जलाभिषेक का करतात? जाणून घ्या धार्मिक कारण आणि महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.