Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dahi Handi: दहीहंडीची पूजा करण्याची काय आहे पद्धत आणि शुभ वेळ, जाणून घ्या दहीहंडी सणांचे महत्त्व

श्रीकृष्णाशी संबंधित असलेला महत्त्वाचा एक सण म्हणजे दहीहंडी. हा सण महाराष्ट्रामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावेळी दहीहंडी शनिवार, 16 ऑगस्ट रोजी साजरी केली जाणार आहे. दहीहंडी सणांचे महत्त्व जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 16, 2025 | 07:05 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:

दहीहंडीचा सण आज शनिवार, 16 ऑगस्ट रोजी सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. हा सणाचा संबंध श्रीकृष्णाशी आहे. श्रीकृष्णाच्या बालपणीच्या विलास, लोणी चोरी आणि त्यांच्या खोडकर स्वभावाचे प्रतीक आहे. त्यांच्या बालपणी ज्यावेळी तो लोणी आणि दही चोरायचा, त्यावेळी गोपी आणि गोकुळातील लोकांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, जो आता आपण उत्सव म्हणून साजरा करतो.

कधी आहे दहीहंडी

दहीहंडीचा सण आज शनिवार, 16 ऑगस्ट रोजी आहे. कृष्ण पक्षाची अष्टमी तिथीची सुरुवात शुक्रवार, 15 ऑगस्ट रोजी रात्री 11.49 वाजता सुरु होईल आणि या तिथीची समाप्ती शनिवार, 16 ऑगस्ट रोजी रात्री 9.34 वाजता होईल.

Samudrik Shastra: पायांच्या बोटावर केस असणे शुभ की अशुभ, काय सांगते सामुद्रिकशास्त्र जाणून घ्या

दहीहंडीला पूजा करण्याची पद्धत

घर आणि देव्हारा स्वच्छ करुन झाल्यानंतर भगवान श्रीकृष्णाची मूर्ती माती किंवा पानांनी सजवलेल्या जागेवर ठेवा. त्याच्या जवळ, नवीन हंडी (भांडे) ताजे दही, तूप, गूळ आणि फळ ठेवा. या दिवशी भाविक निरहार उपवास करतात किंवा हलके फळे आणि दुधाचे अन्न खातात. यावेळी तुम्ही आधीच हंडी सजवून ठेवू शकता. त्यानंतर श्रीकृष्णाच्या मूर्तीसमोर किंवा चित्रासमोर फुले, तांदूळ, लोणी, दही आणि फळे या गोष्टी अर्पण करा. त्यानंतर तुपाचा दिवा लावा. कीर्तनाच्या वेळी मध्यरात्री भगवान श्रीकृष्णाला हंडीचा अर्घ्य अर्पण करा. हा प्रसाद कुटुंबातील सर्व सदस्यांमध्ये वाटा. त्यानंतर आरती भजन करावे.

दहीहंडी सणांचे महत्त्व

दहीहंडीच्या दिवशी श्रीकृष्णाचा जन्म आणि त्याची लीला साजरी केली जाते. दहीहंडीचा उत्सव भगवान श्रीकृष्णाच्या बालपणीच्या लीलाला समर्पित आहे. हा उत्सव केवळ एक धार्मिक उत्सव नाही तर सांस्कृतिक आणि सामाजिक एकतेचे प्रतीक देखील आहे.

दहीहंडीचा सण का साजरा केला जातो

दहीहंडी हा भगवान श्रीकृष्णाशी संबंधित मुख्य सण आहे. यालाच गोपाळकाला असेही म्हटले जाते. यावेळी गोविंदा उंचीवर बांधलेले मडके फोडण्यासाठी एक गट तयार करुन मनोरे रचतात. तसेच ते गोंविदा रे गोपाळा, बोलबजरंग बली की जय या घोषणा देखील देतात.

Krishna Janmashtami 2025: जन्माष्टमीला 190 वर्षांनंतर तयार होत आहे हा शुभ योग, या राशीच्या लोकांना होणार फायदा

दहीहंडी सणाला एक धार्मिक कथा देखील आहे. द्वापर युगात भगवान श्रीकृष्ण लहानपणी लोकांच्या घरातून लोणी चोरून ते आपल्या मित्रांमध्ये वाटून खात असत. त्यामुळे त्याचा त्रास गोपींना होत असे. म्हणून त्यांनी लोणीचे भांडे एका उंच ठिकाणी टांगण्यास सुरुवात केली, परंतु त्यांचा हा प्रयत्न देखील अयशस्वी झाला.

श्रीकृष्ण आपल्या मित्रांसोबत मनोरे रचून भांड्यातून लोणी आणि दही चोरून खात असत. कान्हाची ही बालपणीची कृती दरवर्षी जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे दहीहंडीच्या दिवशी त्याची आठवण म्हणून मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.

दहीहंडीचा सण कुठे साजरा केला जातो

महाराष्ट्र, मथुरा, वृंदावन आणि उत्तर प्रदेश येथे हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Krishna janmashtami 2025 dahi handi puja method auspicious time importance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2025 | 07:05 AM

Topics:  

  • dharm
  • Krishna Janmashtami
  • religions

संबंधित बातम्या

Zodiac Sign: रवि योगामुळे मेष आणि मिथुन राशीसह या राशीच्या लोकांच्या लोकांना समाजात मिळेल प्रतिष्ठा
1

Zodiac Sign: रवि योगामुळे मेष आणि मिथुन राशीसह या राशीच्या लोकांच्या लोकांना समाजात मिळेल प्रतिष्ठा

Numerology: या मूलांकांच्या लोकांना होतील फायदेच फायदे, प्रत्येक क्षेत्रात मिळेल अपेक्षित यश
2

Numerology: या मूलांकांच्या लोकांना होतील फायदेच फायदे, प्रत्येक क्षेत्रात मिळेल अपेक्षित यश

Shukra Gochar: शुक्र हस्त नक्षत्रामध्ये करणार प्रवेश, 17 ऑक्टोबरपासून या राशीच्या लोकांच्या नातेसंबंधामध्ये होतील बदल
3

Shukra Gochar: शुक्र हस्त नक्षत्रामध्ये करणार प्रवेश, 17 ऑक्टोबरपासून या राशीच्या लोकांच्या नातेसंबंधामध्ये होतील बदल

Diwali 2025: दिवाळीपूर्वी घरामध्ये साफसफाई करताना या गोष्टी दिसण्याचा नेमका अर्थ काय? जाणून घ्या
4

Diwali 2025: दिवाळीपूर्वी घरामध्ये साफसफाई करताना या गोष्टी दिसण्याचा नेमका अर्थ काय? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.