फोटो सौजन्य- pinterest
शरीराच्या आकार आणि रचनेवरुन आपल्याला व्यक्तीचे भविष्य समजते. या लोकांचे वैयक्तिक जीवन कसे असेल ते समजते. सामुद्रिक शास्त्रानुसार, शरीराच्या विविध भागांकडे पाहिल्यास व्यक्तीचा भूतकाळ, भविष्य आणि वर्तमान जाणून घेण्यास मदत होते. पायाच्या बोटांपासून ते मानेवरील तीळांपर्यंत, शरीरावरील लहान गोष्टींमुळे आपले नशीब बदलू शकते. तसेच तुमच्या हातांवरील रेषा, तुमच्या कपाळाचा आकार, तुमचे डोळे, नाक, कान आणि अगदी तुमच्या पायाच्या बोटांचा आकार इत्यादी बऱ्याच गोष्टींमुळे तुम्हाला आपल्या भविष्याबद्दल समजू शकते. त्यासोबतच लोकांच्या पायांच्या बोटांवर केस असतात. पायांच्या बोटांवर केस असणे शुभ की अशुभ जाणून घ्या
सामुद्रिकशास्त्रानुसार, पायाच्या बोटांवर केस असणे ही सामान्य गोष्ट मानली जाते. जर एखाद्या व्यक्तीच्या पायाच्या बोटांवर केस असतील तर त्याचे वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवन कसे असेल आणि त्याचे भविष्य कसे असू शकते. हे ठरवता येऊ शकते. बऱ्याचदा पायाच्या बोटांवर केस नसतात किंवा ते खूप हलके असतात. पण काही लोकांच्या पायाच्या बोटांवर जाड आणि स्पष्ट केस असतात. ज्योतिषशास्त्रात ही गोष्ट सामान्य मानली जात नाही.
सामुद्रिशास्त्रानुसार, पायाच्या बोटांवरील केस हे व्यक्तीच्या उज्ज्वल नशिबाचे लक्षण आहे. कपाळावरील केस संपत्ती, समृद्धी आणि आनंद दर्शवतात. अशा व्यक्ती आर्थिकदृष्ट्या मजबूत असतात आणि आपल्या प्रयत्नांनी जीवनात उंची गाठते. मात्र ही लोक खूप मेहनती असतात. या लोकांना नेहमी नशिबाची साथ मिळते. तसेच या लोकांना व्यवसाय, नोकरी किंवा कोणत्याही विशिष्ट क्षेत्रात उत्तम यश देखील मिळते.
ज्या लोकांच्या पायावर केस असतात असे लोक खूप स्वावलंबी, जबाबदार आणि आत्मविश्वासू असल्याचे मानले जाते. ते नेहमी त्यांच्या मुद्द्यावर ठाम असतात आणि निर्णय घेण्यास अजिबात संकोच करत नाहीत. अशा लोकांमध्ये नेतृत्व क्षमता खूप चांगली असते. अशा व्यक्तींना धार्मिक विषयात जास्त आवड असते. तसेच या लोकांमध्ये समजून घेण्याची वृत्ती जास्त असते.
ही गोष्ट शुभ मानली जात असली तरी ज्या लोकांच्या पायांच्या बोटांवरील केस जाड आणि खडबडीत असतात त्या व्यक्तीमध्ये राग आणि अहंकाराचे लक्षण असू शकते. असे लोक कधीकधी खूप रागवतात, अविचारी निर्णय घेतात. त्यामुळे अशा लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे या लोकांनी नेहमी बोलताना किंवा वागताना ध्यान आणि संयम बाळगला पाहिजे.
सामुद्रिकशास्त्रानुसार, ज्या लोकांच्या पायांच्या बोटांवर केस असते अशा लोकांना नशिबाची साथ लाभते. ते केवळ नशिबावरच अवलंबून राहत नाही. मात्र अशा लोकांना कठोर मेहनत घ्यावी लागते. असे लोक ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी त्यांच्या प्रभाव आजूबाजूच्या लोकांवर पडतो.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)