शिवभक्तांसाठी महाशिवरात्रीचा (MahaShivratri 2022) दिवस एखाद्या सणापेक्षा कमी नसतो. फाल्गुन महिन्यात येणाऱ्या शिवरात्रीला महाशिवरात्री म्हणतात. महाशिवरात्रीला भक्त महादेवाची पूजा (Maha Shivratri Puja) करून भगवान शंकराची पूजा करून उपवास करतात.
यंदा महाशिवरात्र १ मार्च २०२२ रोजी (मंगळवारी) साजरी केली (Maha Shivratri 2022 Date) जाणार आहे. असे मानले जाते की जे भक्त महाशिवरात्रीला भगवान शिव आणि पार्वतीची मनोभावे पूजा करतात. तसेच विधीपूर्वक उपवास करतात. त्यांच्या सर्व मनोकामना भगवान शंकर आणि पार्वती पूर्ण करतात. महाशिवरात्रीचा शुभ मुहूर्त आणि चारही प्रहरात केल्या जाणाऱ्या पूजेची वेळ (Maha Shivratri Timings) आपण आज जाणून घेणार आहोत.
[read_also content=”पांडवांशीही इतिहास जोडला आहे उत्तराखंडच्या जागेश्र्वर धामशी, वाचा प्राचीन शिवधामचं महत्त्व https://www.navarashtra.com/mahashivaratri/religion/mahashivaratri/jogeshwar-dham-temple-uttarakhand-red-importance-nrak-243688.html”]
महाशिवरात्री शुभ मुहूर्त (Maha Shivratri 2022 Shubh Muhurta)
रात्रीच्या पूजेची वेळ – १ मार्च २०२२ रोजी सायंकाळी ६.२२ वाजेपासून ते रात्री १२.३३ वाजेपर्यंत
पहिला प्रहर – सायंकाळी ६.२१ वाजेपासून ते ९.२७ वाजेपर्यंत
दुसरा प्रहर – रात्री ९.२७ वाजेपासून ते १२.३३ वाजेपर्यंत
तिसरा प्रहर – रात्री १२.३३ वाजेपासून ते सकाळी ३.३९ वाजेपर्यंत
चौथा प्रहर – २ मार्च २०२२ रोजी सकाळी ३.३९ वाजेपासून ते ६:४५ वाजेपर्यंत
पूजा विधी – महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराला पंचामृताने स्नान घालावे. त्यानंतर केसरच्या आठ वाट्या जल अर्पण करून रात्रभर दिवा लावावा. यानंतर भगवान शिवाला चंदनाचा तिलक लावावा. भगवान शंकराला भांग, धतुरा, बेलपत्र, तुळस, जायफळ, कमळ गट्टे, पाच प्रकारची फळे, गोड सुपारी, उसाचा रस, फुले आणि काही धन अर्पण करावे. यानंतर केशरची खीर बनवावी आणि ती भगवान शंकराला अर्पण करून लोकांमध्ये वाटावी.वरील गोष्टी अर्पण करताना ॐ नमो भगवते रूद्राय, ॐ नमः शिवाय असा जप करावा.






