फोटो सौजन्य - Social Media
शहरासाठी अभिमानाचा आणि प्रत्येक पालकांसाठी आनंदाचा क्षण ठरलेला सुपर अबॅकस नॅशनल कॉम्पिटिशन अवॉर्ड सोहळा नुकताच संभाजीनगर येथे उत्साहात पार पडला. भानुदासराव चव्हाण स्मृती सभागृहात आयोजित या स्पर्धेत सागा सुपर अबॅकस अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन करत कारंज्याचे नाव उज्ज्वल केले.
सागा सुपर अबॅकस अकॅडमीच्या संचालिका अश्विनी शेगोकार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी हे यश मिळवले. या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये उदंतिका वैभव गावंडे (लेव्हल १) हिने प्रथम क्रमांक पटकावत कारंज्याचा झेंडा राष्ट्रीय पातळीवर फडकावला. तिच्या या यशामुळे शहरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
याच गटात शिवाय संतोष नेमाने (लेव्हल १) याने द्वितीय क्रमांक मिळवला, तर अनय अतुलकुमार महल्ले (लेव्हल १) याने चतुर्थ क्रमांक आणि निर्वाण नितीन इंगोले (लेव्हल १) याने पाचवा क्रमांक मिळवत उत्कृष्ट कामगिरी केली. विशेष श्रेणीत स्पृहा आतिष चौधरी, रियांशा स्वप्निल इंगोले, निहित विजय पोहाने आणि श्रीरंग अभिषेक वानखडे यांना सन्मानित करण्यात आले.
स्पर्धेत सहभागी झालेल्या चैतन्य घुले, श्रावी शेगोकार, स्वरा हिवाळे, बुद्धांग भुसारे, ईशान शेगोकार आणि ओजस्वी निंगोट या विद्यार्थ्यांनाही ‘काँग्रॅच्युलेशन ट्रॉफी’ देऊन गौरविण्यात आले. त्यांच्या या यशामुळे कारंज्यातील पालक आणि शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य वन विभागाचे सचिव सुजय दोडल, उद्योजक विनोद जैन तसेच सुपर अबॅकसचे व्यवस्थापकीय संचालक मनीष महाजन यांची उपस्थिती लाभली. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
दरम्यान, संचालिका अश्विनी शेगोकार यांनाही त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत ‘नवरात्री फेस्टिवल अवॉर्ड’ आणि ‘इम्पॅक्ट वुमन अवॉर्ड’ या प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या यशामागे त्यांचे मार्गदर्शन आणि परिश्रम महत्त्वाचे ठरल्याचे उपस्थितांनी नमूद केले. एकूणच, सागा सुपर अबॅकस अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर यश संपादन करून कारंज्याचा मान उंचावला असून, इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे.






