Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Makar Sankranti: मकरसंक्रांतीनंतरचा दिवस किक्रांत अशुभ का आहे, जाणून घ्या यामागील कारण

संक्रांत हा केवळ एक दिवसाचा सण नसून तीन दिवसांचा सोहळा असतो. मकरसंक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जाणारा सण किक्रांत. हा सण अशुभ मानला जातो. किक्रांत म्हणजे नेमकं काय, हा दिवस अशुभ का मानला जातो जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jan 15, 2026 | 09:03 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • किक्रांत कधी आहे
  • किक्रांत अशुभ का मानली जाते
  • किक्रांतीचा सण का साजरा केला जातो
 

 

मकरसंक्रांतीच्या सणानंतर येणारा दुसरा दिवस म्हणजे किक्रांत होय. संक्रांतीचा सण हा तीन दिवसांचा असतो पहिला दिवस भोगी, दुसरा संक्रांत आणि तिसरा किक्रांत यालाच कर किंवा कर दिन असे म्हटले जाते. मात्र शास्त्रामध्ये हा दिवस अशुभ मानला जातो. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. नवीन वस्तूंची खरेदीदेखील केली जात नाही.

किक्रांत आणि मकरसंक्रांतीचा संबंध

मकरसंक्रांती म्हणजे सूर्य उत्तरायणात प्रवेश करण्याचा दिवस. यानंतर वातावरण, ऋतू आणि निसर्गात बदल घडू लागतो.
ग्रामीण भाषेत संक्रांतीनंतर सुरू होणाऱ्या या बदलत्या काळाला “किक्रांत” असे म्हटले जाते.

Makar Sankranti 2026: मकरसंक्रांत का आणि कशी साजरी केली जाते? काय आहे या सणांमागील इतिहास

किक्रांत कशी साजरी केली जाते

किंक्रांतच्या दिवशी स्त्रिया हळदीकुंकू समारंभ आयोजित करतात. या दिवशी स्त्रियांनी शेणात हात घालू नये असे शास्त्रात सांगण्यात आलेले आहे. किंक्रांतीला भोगीच्या दिवशी केलेली भाकरी राखून ठेवली जाते आणि ती शिळी भाकरी खाल्ली जाते, केरकचरा काढण्यापूर्वी वेणी घालावी असे सांगितले जाते, तसेच दुपारी हळदीकुंकू करतात. अशा काही प्रथा किंक्रांतला महाराष्ट्रामध्ये पाळल्या जातात. तसेच, यादिवशी बेसनाचे धिरडे करून खाण्याचीही प्रथा आहे. या दिवशी संक्राती देवीची पूजा करून तिला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवला जातो. त्याचप्रमाणे कुलदैवताचे नामस्मरण केले जाते.

किक्रांत अशुभ का मानली जाते

कथेमध्ये म्हटल्यानुसार देवी संक्रांतीने संक्रांतीच्या दिवशी संकासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. त्यानंतर मकरसंक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी देवीने किंकर नावाच्या अत्यंत शक्तिशाली आणि क्रूर राक्षसाचा वध केला होता. याच विजयाच्या दिवसाला किक्रांत असे म्हटले जाते. देवीने या राक्षसाचा संहार करुन पृथ्वीवरील सज्जनांचे रक्षण केले होते. म्हणून या दिवशी देवीच्या विजयी रुपाची पूजा केली जाते.

Zodiac Sign: वाशी योगामुळे मेष आणि मिथुन राशीसह या राशीच्या लोकांच्या उत्पन्नात होईल वाढ

किक्रांतचे महत्त्व

ज्योतिषशास्त्रात किंक्रांत हा दिवस अशुभ मानला जातो. महाराष्ट्रासारख्या काही भागामध्ये या दिवशी महिला शेण सारवत नाही. या दिवशी शिळी भाकरी खाल्ली जाते. तसेच या सणाच्या दिवशी बेसनाचे धिरडे बनवण्याची परंपरादेखील आहे. किंक्रांतीला मोकळे केस सोडून काम करणे वर्ज्य मानले जाते. घरात सतत भांडण होत असल्यास तर या दिवशी शांत राहायला हवे. लांबचा प्रवास करणे टाळायला हवा. या दिवशी कुलदैवतेचे स्मरण करुन देवाची करावी.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: किक्रांत म्हणजे काय?

    Ans: किक्रांत हा मकरसंक्रांतीनंतरचा दिवस किंवा काळ दर्शवणारा लोकपरंपरेतील शब्द आहे. काही भागांत तो संक्रमणानंतरचा अस्थिर काळ मानला जातो.

  • Que: किक्रांत दिवसाला अशुभ का मानले जाते?

    Ans: लोकसमजुतीनुसार संक्रांतीच्या दिवशी सूर्याचे संक्रमण होते आणि त्यानंतरचा दिवस हा ऊर्जेच्या समतोलाचा मानला जातो. त्यामुळे शुभकार्य टाळण्याची प्रथा आहे.

  • Que: किक्रांत दिवशी काय करणे शुभ मानले जाते?

    Ans: दानधर्म, बोरन्हाण, देवपूजा, सूर्योपासना या गोष्टी शुभ मानल्या जातात.

Web Title: Makar sankranti why is the kikrant day after makar sankranti considered inauspicious know the reason behind the belief

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 15, 2026 | 09:03 AM

Topics:  

  • Hindu Festival
  • hindu religion
  • Makar Sankranti

संबंधित बातम्या

THANE : आयुर्वेदिक दृष्टिकोनातून मकर संक्रांतीचे महत्त्व काय आहे? डॉ. ऐश्वर्या रानडे
1

THANE : आयुर्वेदिक दृष्टिकोनातून मकर संक्रांतीचे महत्त्व काय आहे? डॉ. ऐश्वर्या रानडे

Makar Sankranti: मकरसंक्रांतीला सूर्याला पाणी का अर्पण केले जाते? काय आहेत त्याचे फायदे जाणून घ्या
2

Makar Sankranti: मकरसंक्रांतीला सूर्याला पाणी का अर्पण केले जाते? काय आहेत त्याचे फायदे जाणून घ्या

Nashik News: पतंगावरही ‘जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला’, १२० ते १ हजार रुपयापर्यंत किंमत; गुजरातचे आकर्षक पतंग विक्रीस दाखल
3

Nashik News: पतंगावरही ‘जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला’, १२० ते १ हजार रुपयापर्यंत किंमत; गुजरातचे आकर्षक पतंग विक्रीस दाखल

Makar Sankarnti: मकरसंक्रांती सणाला पतंग का उडवले जातात? जाणून घ्या यामागील सविस्तर कारण
4

Makar Sankarnti: मकरसंक्रांती सणाला पतंग का उडवले जातात? जाणून घ्या यामागील सविस्तर कारण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.