Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Muktai abhang: मुक्ताबाईंच्या ताटी उघडा अभंगातून मिळणारी प्रेरणा, जाणून घ्या

मराठी संतसाहित्यामध्ये भावस्पर्शी, तत्वज्ञानपूर्ण आणि अध्यात्मिक उंची गाठणारे अनेक अभंग आढळतात. त्यामध्ये संत मुक्ताबाई यांचा “ताटी उघडा ज्ञानेश्वरा” हा अभंग विशेष महत्त्वाचा मानला जातो.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Apr 01, 2026 | 02:40 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • मुक्ताबाईंनी ज्ञानेश्वरांना उद्देशून रचलेला अभंग
  • ताटी उघडा ज्ञानेश्वरा अभंगाचे महत्त्व
  • सहिष्णुता आणि संयमाचे महत्त्व
 

 

संत मुक्ताबाईंनी ज्ञानेश्वरांना उद्देशून रचलेले “ताटी उघडा ज्ञानेश्वरा” हे अभंग (ताटीचे अभंग) आध्यात्मिक प्रगल्भता आणि माणुसकीचा संदेश देतात. लोकांच्या शब्दांनी खिन्न होऊन ज्ञानेश्वरांनी झोपडीचे दार (ताटी) बंद केले असता, मुक्ताबाईंनी ‘योगी पुरुष पावन मनाचा, साहे अपराध जनाचा’ असे म्हणत समजूत काढली आणि विश्वकल्याणासाठी ताटी उघडण्याची विनंती केली.

अभंगाची पार्श्वभूमी

संत ज्ञानेश्वर, निवृत्तिनाथ, सोपानदेव आणि मुक्ताबाई ही चार भावंडे समाजातील अन्याय, बहिष्कार आणि दुःख सहन करत होती. त्यांच्या आई-वडिलांच्या संन्यासामुळे समाजाने त्यांना बहिष्कृत केले होते. या परिस्थितीत ज्ञानेश्वरांना अनेकदा मानसिक त्रास सहन करावा लागला. एकदा ज्ञानेश्वर महाराज अत्यंत दुःखी होऊन स्वतःला एका झोपडीत बंद करून घेतात. त्यावेळी त्यांची धाकटी बहीण मुक्ताबाई प्रेमाने, करुणेने आणि तत्वज्ञानाने भरलेला हा अभंग म्हणत त्यांना बाहेर येण्यासाठी विनंती करते.

अभंगाचा आशय

“ताटी उघडा ज्ञानेश्वरा” या अभंगात मुक्ताबाई ज्ञानेश्वरांना सांगतात की—

जगात दुःख आहे, अन्याय आहे, पण त्यापासून पळून जाणे हा उपाय नाही
संतांचा मार्ग म्हणजे सहनशीलता, क्षमा आणि करुणा
संतांनी समाजाला मार्गदर्शन करणे हेच त्यांचे कर्तव्य आहे.

मुक्ताबाई ज्ञानेश्वरांना सांगतात की, “तुम्ही जर स्वतःला बंद करून घेतले, तर जगाला ज्ञानाचा प्रकाश कोण देणार?”

संत मुक्ताबाई किंवा मुक्ताबाईंचे अभंग म्हटले की, सर्वप्रथम आठवतात ते ताटीचे अभंग. ‘बहिर्मुख करणारी अंतर्मुखता’ हे या ताटीच्या अभंगांचं सूत्रच वाटतं. कारण ज्ञानोबांना अंतर्मुख करून, बाहेर येण्यासाठी प्रवृत्त करणं हे या अभंगांचं मूळ उद्दिष्ट आहे. या अभंगरचनेमागचा प्रसंग आपल्याला ज्ञात आहेच. भिक्षा मागत असताना ज्ञानदेवांचा अवमान झाल्यामुळे, खिन्न आणि उद्विग्न अवस्थेत ज्ञानेश्वर महाराज सिद्धबेटावरच्या आपल्या झोपडीच्या आत जातात, आणि ताटी आतून लावून घेतात. पुन्हा उघडायचीच नाही या संकल्पाने! जगाचा, जगाकडून मिळणाऱ्या अखंड आणि महत्त्वाचं म्हणजे अकारण अवहेलनाचा वीट त्या वयात येणं खरं अगदी साहजिकच आहे. लहानशी मुक्ताई तिथे येते तेव्हा आतून लावलेली ताटी पाहून, ती ठोठावली तरी उघडली जात नसल्याची पाहून तिला नक्कीच आश्चर्य वाटलं असणार.

Hanuman Jayanti 2026: वाल्मिकी रामायणामध्ये सुंदरकांडातील थरारक आणि प्रेरणादायी कथा

आत्मपरिवर्तनाचा संदेश

ताटीचे अभंग एकूण 42 आहेत. यातील प्रत्येक अभंगाचं पालुपद म्हणजे ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’ हाच या अभंगांचा मूळ उद्देशही. केवळ बाह्य ताटी उघडावी हा नव्हे, तर आतली ताटी उघडून कार्यप्रवृत्त व्हावं, चिंता, क्रोध सारं काही सांडून आपल्या कार्याचं स्मरण ठेवून तदनुरुप आचरण करावं ही प्रेरणा ही भगिनी-योगिनी आपल्या वडील, भावाला किंवा गुरुबंधूला देत आहे. त्यासाठी वापरलेल्या उपमारुपकांचं सौंदर्य ते किती! प्रसंगी मुक्ताई जरा कठोर उद्गारही काढते, पण हेतू एकच, की ज्ञानोबांनी काही करुन क्रोधादि विकारांचं मळभ कायमचं दूर सारुन आतली ताटी पुन्हा न लावण्यासाठी उघडावी.

April Shubh Muhurat 2026: एप्रिल महिन्यात वाहन आणि मालमत्ता खरेदीसाठी कोणते आहेत मुहूर्त, जाणून घ्या

सहिष्णुता आणि संयमाचे महत्त्व

“ताटी उघडा ज्ञानेश्वरा” अभंग १० वर्षांच्या मुक्ताबाईंनी आपल्या थोरल्या भावाला दिलेला ज्ञानाचा आणि संयमाचा उपदेश आहे, ज्यातून ‘सहिष्णुता’ आणि ‘लोकसंग्रह’ या मूल्यांचा संदेश मिळतो. हा अभंग केवळ एक भावनिक प्रसंग नसून, तो जीवनाचा मार्गदर्शक आहे. संत मुक्ताबाई यांनी आपल्या भावाला दिलेला हा संदेश आजही प्रत्येकासाठी तितकाच महत्त्वाचा आहे. संकटे आली तरी धैर्याने, संयमाने आणि सकारात्मकतेने त्यांचा सामना करावा, हा या अभंगाचा मुख्य संदेश आहे.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: ताटी उघडा’ याचा अर्थ काय?

    Ans: बाह्य दार नव्हे, तर मनातील नकारात्मकता दूर करून सकारात्मकतेकडे वळण्याचा संदेश आहे.

  • Que: “ताटी उघडा ज्ञानेश्वरा” अभंग कोणी लिहिला?

    Ans: हा अभंग मुक्ताबाई यांनी रचला आहे

  • Que: या अभंगाचे आजच्या काळात महत्त्व काय आहे?

    Ans: मानसिक ताण, निराशा यावर मात करून सकारात्मक राहण्याची प्रेरणा देतो.

Web Title: Muktai abhang inspiration from taati ughada abhanga

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2026 | 02:40 PM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • religions

संबंधित बातम्या

Chanakya Niti: तणावातही लोक हसतमुख कसे राहतात? जाणून घ्या काय सांगते चाणक्य नीती
1

Chanakya Niti: तणावातही लोक हसतमुख कसे राहतात? जाणून घ्या काय सांगते चाणक्य नीती

हनुमानांना चिरंजीवी का म्हटले जाते? जाणून घ्या रामायणातील प्रसिद्ध कथा
2

हनुमानांना चिरंजीवी का म्हटले जाते? जाणून घ्या रामायणातील प्रसिद्ध कथा

Shani Amavasya: पितरांच्या आशीर्वादासाठी अमावस्या का मानली जाते खास, जाणून घ्या
3

Shani Amavasya: पितरांच्या आशीर्वादासाठी अमावस्या का मानली जाते खास, जाणून घ्या

Jupiter Transit: जून महिन्यात गुरू ग्रह बदलणार आपले मार्गक्रमण, या राशींच्या लोकांचे उजळणार नशीब
4

Jupiter Transit: जून महिन्यात गुरू ग्रह बदलणार आपले मार्गक्रमण, या राशींच्या लोकांचे उजळणार नशीब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.