Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navratra 2025 : भक्ताने घातली शपथ अन्… ; आई तुळजा भवानीच्या तुळजापूरातील मंदिराची ‘अशी’ आहे आख्यायिका

महाराष्ट्रात आई तुळजाभवानी आणि अंबाबाई यांना आद्य देवता मानलं जातं. महाराष्ट्रातील अनेक कुळांची कुलस्वामिनी ही आई तुळजाभवानी आहे. याच तुळजाभवानीच्या तुळजापुरातील वास्तव्याची आख्यायिका आज जाणून घेऊयात.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Sep 21, 2025 | 03:20 AM
Navratra 2025 : भक्ताने घातली शपथ अन्… ; आई तुळजा भवानीच्या तुळजापूरातील मंदिराची ‘अशी’ आहे आख्यायिका
Follow Us
Close
Follow Us:

यंदा शारदीय नवरात्रीला सुरुवात 22 तारखेपासून होत आहे. नवरात्र म्हणजे स्त्रीशक्तीचा जागर. महाराष्ट्रात आई तुळजाभवानी आणि अंबाबाई यांना आद्य देवता मानलं जातं. महाराष्ट्रातील अनेक कुळांची कुलस्वामिनी ही आई तुळजाभवानी आहे. याच तुळजाभवानीच्या तुळजापुरातील वास्तव्याची आख्यायिका आज जाणून घेऊयात.

हिंदू धर्मातील तुळजापुरची आई तुळजाभवानीचं अत्यंत जागृत असं देवस्थान आहे. भाविक मोठ्या श्रद्धेने या ठिकाणी डोकं टेकवण्यासाठी येत असतात. पण तुम्हाला माहितेय का आई तुळजाभवानीच्या प्रकटीकरणाची देखील एक रंजककथा सांगितली जाते. असं म्हटलं जातं की, कर्दम ऋषी हे देवी भगवतीने मोठे भक्त होते. एके दिवशी कर्दम ऋषी देह त्याग केला. त्यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी अनुभूती ही देखील सती जात होती. तिला आश्रमातील अनेकांनी समजावून सांगितलं की, देवी आपण सती जाऊ नका आपल्याला एक लहान मुलगा आहे तसंच आपल्या पोटात देखील एक जीव वाढत आहे. या दोन्ही जीवांना मारण्याचं पाप आपण आपल्य़ा माथी घेऊ नये. अनुभूती आपला पत्नीधर्म निभावताना आपण मातृत्वाच्या कर्तव्याकडे दुर्लक्ष तर करत नाही ना हा विचार मनात येताच तिने सती न जाण्याचा निर्णय घेतला.

कर्दम ऋषी म्हणजेच आपले पती भगवती देवीची आराधना करत असे याचमुळे मनोरमादेखील गर्भवती असताना भगवती देवीची आराधना करत ध्यानस्थ जंगलात बसली होेती. त्यावेळी एका असूराने तिची तपश्चर्या भंग केली आणि तिच्या अंगावर हात टाकण्यातचा प्रयत्न केला त्यानंतर अनुभूतीने भगवती देवीचा धावा केला. त्यावेळी भगवती देवी त्याठिकाणी प्रकट झाली. अनुभूतीचं पावित्र्य भंग करु पाहणाऱ्या असूराचा तिने नाश केला. भगवती देवीचं रौद्ररुप होतं. देवीच्या डोळ्यात अंगार होता. त्या असूराबाबातचा क्रोध तिच्या डोळ्यातून ओसंडून वाहत होता त्याचवेळी तिच्या हृदयात अनुभूतीच्या प्रेमाचा पाझर देखील होता. असूराचा वध केल्यानंतर भगवती देवीने आई जशी आपल्या मुलांची काळजी घेते जवळ घेते अगदी त्याच मायेने अनुभूतीला जवळ घेतलं.

Shardiya Navratri 2025: नवरात्रीमध्ये गृहप्रवेश करण्यासाठी काय आहे शुभ मुहूर्त, जाणून घ्या

देवीने अनुभूतीला सांगितलं की प्रत्येक भक्त देवीचं बाळ आहे आणि आई कधीच आपल्या लेकरांना संकटात सोडत नाही. मी संकटात तुमच्या हाकेला धावून येईलच पण कधीही कोणत्याही भयाण परिस्थितीसमोर न झुकता ठामपणे संकटांचा प्रतिकार करता यायला हवं प्रत्येकाला. मी सैदेव तुझं रक्षण करेन, देवीचं हे बोलणं ऐकून अनुभूती भारावून गेली. तिने देवीला शपथ घातली की, तू आजपासून या ठिकाणी वास्तव्यास राहणार आहे. तुझ्या कृपेची आणि मायेची गरज प्रत्येक भक्ताला आहे. आपल्या भक्ताने घातलेली शपथ देवीला मोडता आली नाही आणि तिने त्याच ठिकाणी वास्तव्य केलं ते ही कायमच. जे आज तुळजापूर या नावाने प्रसिद्ध आहे. देवी भगवती हे तुळजाईचं दुसरं नाव आहे. अशी आहे देवी तुळजाईच्या तुळजापुरातील वास्तव्याची आख्यायिका.

Shardiya Navratri 2025: नवरात्रीमध्ये कलश स्थापनेसाठी काय आहे शुभ मुहूर्त, या दिवशी जवचे करा हे उपाय

Web Title: Navratra 2025there is an interesting legend about the temple of goddess tulja bhavani

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2025 | 03:20 AM

Topics:  

  • hindu religion
  • Navratri 2025
  • Tuljabhavani
  • tuljapur news

संबंधित बातम्या

Shardiya Navratri 2025: नवरात्रीमध्ये कलश स्थापनेसाठी काय आहे शुभ मुहूर्त, या दिवशी जवचे करा हे उपाय
1

Shardiya Navratri 2025: नवरात्रीमध्ये कलश स्थापनेसाठी काय आहे शुभ मुहूर्त, या दिवशी जवचे करा हे उपाय

Shardiya Navratri 2025: नवरात्रीमध्ये गृहप्रवेश करण्यासाठी काय आहे शुभ मुहूर्त, जाणून घ्या
2

Shardiya Navratri 2025: नवरात्रीमध्ये गृहप्रवेश करण्यासाठी काय आहे शुभ मुहूर्त, जाणून घ्या

Durga Names: नवरात्रीत जन्माला आली असेल घरात ‘दुर्गा’, ठेवा युनिक आणि अर्थपूर्ण नाव; वाचा यादी
3

Durga Names: नवरात्रीत जन्माला आली असेल घरात ‘दुर्गा’, ठेवा युनिक आणि अर्थपूर्ण नाव; वाचा यादी

Sharadiya Navratri: नवरात्रीमध्ये या राशीच्या लोकांना होईल फायदा, प्रलंबित सर्व कामे होतील पूर्ण
4

Sharadiya Navratri: नवरात्रीमध्ये या राशीच्या लोकांना होईल फायदा, प्रलंबित सर्व कामे होतील पूर्ण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.