
फोटो सौजन्य- pinterest
यावर्षी नवरात्रीची सुरुवात ११ ऑक्टोबरपासून होत आहे. पहिल्या दिवशी प्रतिपदा तिथीला घटस्थापना आणि देवी शैलपुत्रीची पूजा केली जाते. नवरात्र सुरू करण्यापूर्वी घट आणि विशेषतः देवघर स्वच्छ करून घ्यावं.
पहिल्या दिवशी कलशाची स्थापना हा प्रमुख विधी मानला जातो. कलशामध्ये पाणी भरून त्यामध्ये आंब्याची किंवा उपलब्ध पत्रांची पानं आणि नारळ ठेवावा. कलशाखाली धान्य पेरण्याची परंपरा अनेक कुटुंबामध्ये आहे. यंदा घटस्थापनेचा मुहूर्त सकाळी सकाळी ०६:०८ मिनिटांनी सुरू होत असून तो १०:०३ मिनिटांपर्यंत आहे.
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गेच्या शैलपुत्री रुपाची पूजा केली जाते. देवीला फूल, अक्षता, नैवेद्य अर्पण करून आरती करावी. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी शैलपुत्रीला या दिवशी साधा, सात्विक आणि घरच्या परंपरेनुसार तयार केलेला नैवेद्य अर्पण करण्याची प्रथा आहे.
माता शैलपुत्रीला गाईच्या तुपाचा नैवेद्य अर्पण करण्याची धार्मिक मान्यता प्रत्येक ठिकाणी आढळते. त्यामुळे पहिल्या दिवशी तुपाने तयार केलेला शिरा, खीर किंवा गोड पदार्थ नैवेद्य म्हणून ठेवावा. काही परंपरेनुसार, तुपासोबत केळी किंवा इतर फळे देखील अर्पण केली जातात.
यंदा नवरात्रीच्या पहिल्या दिवशी केशरी रंगांला विशेष महत्त्व आहे. केशरी रंग हा उत्साह, ऊर्जा, धैर्य, त्याग आणि सकारात्मकतेचं प्रतीक मानला जातो. भगवा किंवा केशरी रंग भारतीय धार्मिक परंपरेत साधना, अध्यात्म आणि वैराग्याशी जोडला जातो. या दिवशी केशरी रंगांचे वस्त्र परिधान करणं, देवीला केशरी रंगांची फूल किंवा वस्त्र अर्पण करणं केव्हाही चांगलंत. केशरी रंग सूर्याच्या तेजाशी आणि अग्नीच्या उर्जेशी जोडला जात असल्याने तो उत्साह नव्या सुरुवातीचे प्रतीक मानला जातो. नवरात्रीच्या काळात हा रंग भक्ती बरोबरच मनात सकारात्मक ऊर्जा करण्याची भावना व्यक्त करतो.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)