Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navratri Traffic: कल्याणमध्ये नवरात्रोत्सवासाठी वाहतुकीत मोठे बदल; ‘या’ ७ मार्गांवर अवजड वाहनांना प्रवेशबंदी

Navratri Traffic: दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर कल्याण शहरात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी मोठे बदल केले आहेत. ११ ते २० ऑक्टोबरदरम्यान दररोज सायंकाळी ४ ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत सात प्रमुख मार्गांवर जड व अवजड वाहनांसह बसेसना प्रवेशबंदी राहणार आहे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Oct 08, 2026 | 02:30 PM
कल्याणमध्ये नवरात्रोत्सवासाठी वाहतुकीत मोठे बदल

कल्याणमध्ये नवरात्रोत्सवासाठी वाहतुकीत मोठे बदल

Follow Us
Follow Us:
  • नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कल्याण शहरातील वाहतुकीत मोठे बदल
  • ११ ते २० ऑक्टोबरदरम्यान दररोज सायंकाळी ४ ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत वाहतूक निर्बंध लागू राहतील
  • खासगी आणि सरकारी बसेसनाही काही मार्गांवर प्रवेश करता येणार नाही
 

 

११ ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सवाची सुरुवात होत आहे आणि २० ऑक्टोबरला दसरा आहे. यादरम्यान वाहतूककोंडी टाळण्यासाठी वाहतुकीत मोठे फेरबदल करण्यात येणार आहे. हे नियम ११ ऑक्टोबरपासून २० ऑक्टोबरपर्यंत लागू राहतील, याची नागरिकांनी नोंद घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दसऱ्याच्या काळात कल्याण शहरात होणारी संभाव्य वाहतूककोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी खबरदारीची पावले उचलली आहेत. कल्याण पश्चिमेकडील दुर्गामाता मंदिर आणि ऐतिहासिक दुर्गाडी किल्ला परिसरात भाविकांची प्रचंड गर्दी उसळण्याची शक्यता लक्षात घेऊन शहरातील वाहतुकीत मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. त्यानुसार ११ ते २० ऑक्टोबर दरम्यान दररोज सायंकाळी ४ ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत सात प्रमुख मार्गांवर जड, अवजड आणि मल्टिएक्सल वाहनांसह खासगी व सरकारी बसेसना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उपआयुक्त पंकज शिरसाट यांनी ५ ऑक्टोबर रोजी यासंदर्भातील अधिसूचना जारी केली. या निर्बंधांमधून पोलिस वाहने, अग्निशामक दल, रुग्णवाहिका आणि इतर अत्यावश्यक सेवांतील वाहनांना वगळण्यात आले आहे. सणासुदीच्या काळात नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

नवरात्रोत्सव आणि असे असतील निर्बंध आणि पर्यायी मार्ग

कल्याण नाका

नवी मुंबई, पनवेल, महापे पाईपलाईन व मुंब्रा येथून पत्रीपूलमार्गे शहरात येणाऱ्या अवजड वाहनांना बंदी. ही वाहने मुंब्रा बायपास खारेगाव टोलनाका मुंबई-नाशिक महामार्गाने वळवण्यात येतील.

JNPA Port: जेएनपीएतील वाहतूककोंडी दूर; २४ तास देखरेखीमुळे कंटेनर वाहतूक सुरळीत

कल्याण खोणी निसर्ग ढाबा

तळोजा बायपासमार्गे कल्याणकडे येणाऱ्या वाहनांना रोखले जाईल. या वाहनांना बदलापूर-अंबरनाथ – काटई-बदलापूर चौक लोढा पलावा फाटामार्गे जाता येईल.

नेवाळी नाका

मलंग रोडमार्गे चक्कीनाका-पत्रीपूलकडे येणाऱ्या जड वाहनांना मनाई असेल. ही वाहने बदलापूर-अंबरनाथ महामार्गाने इच्छितस्थळी जातील.

श्रीराम चौक

कोळसेवाडी हद्दीत जाणाऱ्या वाहनांना बंदी असून उल्हासनगर शहाड अंबरनाथ मार्गाचा वापर करावा लागेल.

आधारवाडी चौक

शहाड, प्रेम ऑटो, दुर्गामाता चौक, कोनगाव व भिवंडीकडे जाणाऱ्या वाहनांना बंदी. पर्याय म्हणून आधारवाडी चौक-गंधारी ब्रिज बापगाव सोनाळे मार्गाचा वापर करावा.

Thane News: टेंभी नाका नवरात्रोत्सवामुळे वाहतुकीत बदल; २० ऑक्टोबरपर्यंत वाहतूक व्यवस्थेत बदल

रांजनोली नाका

कोनगावमार्गे कल्याणकडे येणाऱ्या वाहनांना बंदी असून ही वाहतूक मुंबई-नाशिक महामार्ग खारेगाव टोलनाका मार्गे वळवली जाईल.

सावद नाका

ठाणे ग्रामीण हद्दीतून बापगावमार्गे गंधारी ब्रिजकडून येणाऱ्या वाहनांना मज्जाव असेल; या वाहनांना सावदनाका सोनाळे मार्गाने पुढे पाठवले जाईल.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Navratri 2026 kalyan traffic changes heavy vehicles no entry 7 routes pp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2026 | 02:30 PM

Topics:  

  • kalyan
  • Navratri
  • Traffic

संबंधित बातम्या

Navratri 2026: कुठे गरबा-दांडियाची धूम, काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत अशा आहेत वेगवेगळ्या परंपरा
1

Navratri 2026: कुठे गरबा-दांडियाची धूम, काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत अशा आहेत वेगवेगळ्या परंपरा

Poonam Estate Navratri: बकरी ईदच्या वादानंतर पूनम इस्टेटमध्ये नवरात्रोत्सवावरून नवा वाद; 120 कुटुंबांची परवानगीची मागणी
2

Poonam Estate Navratri: बकरी ईदच्या वादानंतर पूनम इस्टेटमध्ये नवरात्रोत्सवावरून नवा वाद; 120 कुटुंबांची परवानगीची मागणी

Navratri 2026: नवरात्रीत देवीच्या नऊ रूपांची केली जाते पूजा, जाणून घ्या धार्मिक आणि वैज्ञानिक कारणे
3

Navratri 2026: नवरात्रीत देवीच्या नऊ रूपांची केली जाते पूजा, जाणून घ्या धार्मिक आणि वैज्ञानिक कारणे

Navratri 2026: शारदीय नवरात्रीमध्ये राशीनुसार देवीला या गोष्टी करा अर्पण, जाणून घ्या मंत्र
4

Navratri 2026: शारदीय नवरात्रीमध्ये राशीनुसार देवीला या गोष्टी करा अर्पण, जाणून घ्या मंत्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.