
Navratri 2026: नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशीही जव उगवले (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
नवरात्रीत घट बसवल्यावर जव सगळ्यात महत्वाचं असते. घटासमोर मातीत पेरलेलं जव हिरवंगार वाढलं की घरात बरकत येते म्हणतात. ते चांगलं वाढणं म्हणजे देवी प्रसन्न असल्याची लक्षणं असे मानले जाते. पण अनेकदा काय होतं, जव पेरतो आपण पण ते उगवतच नाही. तीन दिवस झाले तरी कोंब येत नाही. मग लोक घाबरून जातात. Navratri 2026:
पैशाची अडचण येईल का? असे विचार मनात येतात. खरं सांगायचं तर घाबरायचं काही कारण नाही. थोडं लक्ष दिलं तर जव परत उगवतं. नवरात्रीचा तिसरा दिवस उलटला तरी जव आलं नसेल तर हे उपाय लगेच करा.
२. ओल्या कापडाने झाका
मातीवर एक ओलं फडकं किंवा केळीचं पान टाका. त्याने आतमध्ये गरमावा राहतो आणि बी लवकर फुटतं. रोज फडकं काढून बघा, कोंब आला का ते. कोंब दिसला की फडकं काढून टाका.
३. रोज थोडं पाणी शिंपडत राहा
माती पूर्ण कोरडी पडू देऊ नका. सकाळ संध्याकाळ थोडं थोडं पाणी शिंपडा. स्प्रे असेल तर उत्तम. त्याने मातीला ओलावा मिळतो आणि बीला त्रास पण होत नाही.
४. नवीन बी टाका
तुम्हाला वाटत असेल की बी खराब आहे, जुनं आहे, तर नवीन बी आणून त्याच मातीत टोचून द्या. जुनं बी काढू नका, तिथेच नवीन टाका. २-३ दिवसात नवीन कोंब येतील.
५. भांडं आणि माती बदला
कधी कधी भांडंच खराब असतं. किंवा मातीत खडे असतात. असं वाटलं तर दुसरं नवीन परळ घ्या. त्यात चाळलेली मऊ माती घ्या. आणि परत नव्याने जव पेरा. हा उपाय करण्याआधी घरातल्या एखाद्या जाणत्या माणसाला किंवा गुरुजींना एकदा विचारा. उगाच घट हलवू नका.
Navratri 2026: नवरात्रीत उपवास करताय? ‘या’ चुका करू नका, जाणून घ्या व्रताचे खास नियम
आपल्या आजी सांगायच्या, जव कसं वाढतं त्यावरून घराचं भविष्य कळतं. जर जव एकदम उंच आणि सरळ वाढलं, हिरवंगार दिसलं, तर समजायचं घरात सगळं चांगलं होणार आहे. कामात यश मिळेल, घरात शांतता राहील.जर जव पिवळं पडलं, फिकट दिसलं, तर थोडं लक्ष द्या. याचा अर्थ पैशाची थोडी तंगी येऊ शकते किंवा जास्त मेहनत करावी लागेल.आणि जर जव खूपच लहान राहिलं, कमी उगवलं, तर कामात अडथळे येतील असं मानतात.
पण हे सगळं अंदाज आहेत. देवीवर विश्वास ठेवा. जव नाही उगवलं म्हणून घाबरून जाऊ नका. मनापासून पूजा करा. वर दिलेले उपाय करा, तुमचं जव नवरात्रीच्या शेवटपर्यंत नक्कीच हिरवं होईल आणि देवीचा आशीर्वाद पण मिळेल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)