
Pitru Paksha 2026: पितृपक्षात दाराशी आलेल्या ‘या’ ५ जीवांना हाकलू नका! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
गरुड पुराणात पण सांगितलं आहे की, या दिवसात पूर्वज कोणत्याही रुपात घरी येऊ शकतात. प्राण्याच्या रूपात, पक्ष्याच्या रूपात. त्यामुळे या दिवसात जर एखादा प्राणी दारात आला तर त्याला मारू नका, हाकलू नका. त्याला काहीतरी खायला द्या. त्यातच आपलं चांगलं होतं.असे 5 प्राणी आहेत जे पितृपक्षात घरी आले तर खूप शुभ मानलं जातं.
पितृपक्ष आणि कावळा यांचं नातं खूप जुनं आहे. कावळ्याला पूर्वजांचं रूप मानले जाते. जर तुमच्या गच्चीवर, बाल्कनीत कावळा येऊन बसला आणि आरडाओरडा केला, किंवा तुम्ही ठेवलेलं जेवण त्याने शांतपणे खाल्लं, तर समजून जा तुमचे पूर्वज तुमच्यावर खुश आहेत. पितरांना घास दिला की कावळाच तो पहिला खातो. त्याने जेवण खाल्लं तर घरातले पितृदोष निघून जातात आणि अडकलेला पैसा परत मिळतो अशी मान्यता आहे.
अनेकदा स्वयंपाक घरात किंवा अंगणात काळ्या मुंग्यांची रांग लागलेली दिसते. लोक कंटाळून त्या मारतात, पण पितृपक्षात असं करू नका. कारण काळ्या मुंग्या दिसणं म्हणजे शुभ संकेत असतो. याचा अर्थ तुमच्या घरातली गरिबी कमी होणार आहे. या दिवसात त्यांना थोडी साखर किंवा कणीक टाकली तर खूप फायदा होतो. काम-धंद्यात बरकत होते आणि डोक्यावरचं कर्ज फिटतं.
काळा कुत्रा हा भैरव बाबाचं वाहन आहे. त्याला यमराजाचा रखवालदार असे देखील म्हटले जाते. पितृपक्षात जर एखादा काळा कुत्रा तुमच्या दारात येऊन उभा राहिला, शेपटी हलवायला लागला, तर त्याला रिकाम्या हाताने जाऊ देऊ नका. त्याला एक भाकरी द्या, बिस्किट द्या. असं केलं तर तुमच्यावरचं वाईट संकट टळतं. कुंडलीतला राहू-केतूचा त्रास पण कमी होतो आणि पूर्वज तुमचं रक्षण करतात.
Pitru Paksha 2026: सवाष्ण महिलेचे ‘भरणी श्राद्ध’ करावे का? धार्मिक परंपरेत वेगवेगळी मते
आपल्या धर्मात गायीला आईचा दर्जा दिला जातो. तिच्या पोटात 33 कोटी देव आहेत असं म्हणतात. श्राद्ध करताना पहिला घास गाईसाठी काढतात, त्याला गोग्रास म्हणतात.पितृपक्षात जर गाय स्वतःहून तुमच्या दारात आली आणि हंबरली, तर त्यापेक्षा शुभ काहीच नाही. तिला पहिली पोळी खाऊ घाला. श्राद्धाचं जेवण तिला द्या. याने घरात आजार येत नाहीत, मुलाबाळांची भरभराट होते आणि लक्ष्मी टिकून राहते.
तुमच्या अंगणात तुळशीजवळ किंवा बाल्कनीत जर चिमणी चिवचिव करत असेल, धान्य टिपत असेल तर ते चांगलं लक्षण आहे. श्राद्धाच्या काळात जर एखाद्या पक्ष्याने तुमच्या घरात घरटं केलं किंवा धान्याला चोच मारली, तर समजा पूर्वज समाधानी आहेत. घरातला वास्तुदोष जातो आणि लवकरच तुम्हाला एखादी गोड बातमी ऐकायला मिळेल.
Pitru Paksha: पितृपक्षात राशीनुसार ‘या’ रंगाच्या वस्तूंचे करा दान, पितरांसाठी मानले जाते विशेष
घरी आलेल्या कोणत्याही जीवाला काठीने मारू नका. ओरडून हाकलू पण नका. दोन, गच्चीवर एका भांड्यात पाणी आणि थोडे तांदूळ, बाजरी रोज ठेवा. पक्षी पाणी पितील.तीन, श्राद्धाचं जेवण बनवलं की त्यातले पाच घास आधी बाजूला काढा. एक देवासाठी, एक गायीसाठी, एक कुत्र्यासाठी, एक कावळ्यासाठी आणि एक मुंग्यांसाठी. यालाच पंचबली म्हणतात. हे केलं की पितरांचा आशीर्वाद नक्की मिळतो.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)