
Pitru Paksha 2026: गणपती बाप्पांना निरोप देताच पितृपक्ष सुरू (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
आपल्या ज्या पूर्वजांनी आपल्याला जन्म दिला, त्यांची आठवण त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा काळ आहे. या दिवसांमध्ये आपल्या पूर्वजांचं श्राद्ध केले जाते. ज्यामुळे त्यांच्या आत्म्याला शांती मिळते आणि ते आपल्याला आशीर्वाद देतात. पितृपक्षात श्राद्ध हे नेहमी दुपारच्या वेळी केलं जातं. यंदा म्हणजे 2026 मध्ये पितृपक्ष कधी आहे आणि कोणत्या तिथीला कोणतं श्राद्ध आहे हे सगळ्यांना जाणून घ्यायचं आहे.
Pitru Dosha Remedies: पितृदोषापासून मुक्ती हवी? धार्मिक मान्यतेनुसार ‘हे’ 3 उपाय नक्की करून पाहा
वैदिक पंचांगानुसार यंदा पितृपक्ष शनिवार, 26 सप्टेंबर 2026 ला सुरू होणार आहे. या दिवशी पौर्णिमा आहे आणि पौर्णिमेच्या श्राद्धाने पितृपक्षाची सुरुवात होईल. अनंत चतुर्दशी झाली की दुसऱ्या दिवसापासूनच पितृपक्ष सुरू होतो.जवळपास 15 दिवस हा पितृपक्ष चालतो. या काळात प्रत्येक तिथीप्रमाणे श्राद्ध केलं जातं. ज्या पूर्वजांची तिथी माहिती नसेल त्यांचं श्राद्ध सर्वपित्री अमावस्येला करतात.
पहिला दिवस – पौर्णिमा श्राद्ध – 26 सप्टेंबर 2026, शनिवार. या दिवशी पितृपक्ष चालू होईल.
प्रतिपदा श्राद्ध – 27 सप्टेंबर 2026, रविवार
द्वितीया श्राद्ध – 28 सप्टेंबर 2026, सोमवार
तृतीया श्राद्ध – 29 सप्टेंबर 2026, मंगळवार
चतुर्थी आणि पंचमी श्राद्ध – 30 सप्टेंबर 2026, बुधवार. या दिवशी दोन तिथी एकत्र आल्या आहेत.
षष्ठी श्राद्ध – 1 ऑक्टोबर 2026, गुरुवार
सप्तमी श्राद्ध – 2 ऑक्टोबर 2026, शुक्रवार
अष्टमी श्राद्ध – 3 ऑक्टोबर 2026, शनिवार
नवमी श्राद्ध – 4 ऑक्टोबर 2026, रविवार. या दिवसाला अविवाहित लोकांचं श्राद्ध पण म्हणतात.
दशमी श्राद्ध – 5 ऑक्टोबर 2026, सोमवार
एकादशी श्राद्ध – 6 ऑक्टोबर 2026, मंगळवार
द्वादशी श्राद्ध – 7 ऑक्टोबर 2026, बुधवार
मघा नक्षत्र श्राद्ध – 7 ऑक्टोबर 2026, बुधवार. याच दिवशी मघा नक्षत्राचं श्राद्ध पण आहे.
त्रयोदशी श्राद्ध – 8 ऑक्टोबर 2026, गुरुवार
चतुर्दशी श्राद्ध – 9 ऑक्टोबर 2026, शुक्रवार
शेवटचा दिवस – सर्वपित्री अमावस्या – 10 ऑक्टोबर 2026, शनिवार.
या दिवशी सगळ्या पितरांचं श्राद्ध केलं जातं. ज्यांची तिथी माहित नाही त्यांच्यासाठी हा दिवस खूप महत्वाचा आहे.
आपण आपल्या आई-वडिलांमुळे, आजी-आजोबांमुळे आज या जगात आहोत. त्यांनी आपल्यासाठी खूप कष्ट घेतले. त्यांच्याबद्दल आदर दाखवण्यासाठी आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून हे श्राद्ध केलं जातं. पितृपक्षात केलेलं दान, पिंडदान हे पूर्वजांपर्यंत पोहोचतं असं सांगितलं जातं.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)