Pitru Dosha Remedies: पितृदोषापासून मुक्ती हवी? (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
तुम्हाला पण असा त्रास होत असेल तर एकदा कुंडली बघून घ्या, पितृदोष तर नाही ना हे तपासा.पितृदोष असेल तर घाबरायचं कारण नाही. वास्तुशास्त्रात यावर खूप सोपे आणि घरगुती उपाय सांगितले आहेत. ते उपाय केले तर पूर्वज प्रसन्न होतात आणि घरातला दोष कमी होतो. चला तर मग ते 3 उपाय कोणते आहेत ते बघूया. Pitru Dosha Remedies:
हिंदू धर्मात गाय ही पवित्र मानली जात असल्याने तिला गोमाता असे म्हणतात. जर तुमच्या कुंडलीत पितृदोष असेल तर रोज गायीला काहीतरी खायला द्या. रोज सकाळी एक भाकरी, एक पोळी किंवा हिरवा चारा गायीला खाऊ घाला. तिची सेवा करा. गायीची सेवा केली की पूर्वज खुश होतात असं सांगितलं जातं.आता शहरात सगळ्यांना घरी गाय पाळणं शक्य नाही. मग अशा वेळी काय करायचं? तर जवळच्या गोशाळेत जा. तिथे जाऊन गायींना चारा द्या, त्यांची सेवा करा. हा उपाय रोज न चुकता करा. काही दिवसातच घरातला त्रास कमी होईल आणि पितृदोष दूर होण्यास मदत करेल,
पितृदोष घालवण्यासाठी हा सगळ्यात सोपा आणि जुना उपाय आहे. रोज सकाळी उठून पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घाला. जेवढ्या प्रदक्षिणा घालणं शक्य असेल तेवढ्या घाला. 7, 11, 21 अशा प्रदक्षिणा घातल्या तरी चालतील. पिंपळाच्या झाडात देव असतो आणि पूर्वजांचा वास पण पिंपळात असतो असं म्हणतात. त्यामुळे प्रदक्षिणा घातली की पितृदोष कमी होतो. या सोबतच एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. वर्षातून एकदा तरी आपल्या पूर्वजांचं श्राद्ध आणि पक्ष हे विधी तिथीप्रमाणे नक्की करा. हे केलं नाही तर पितृदोष वाढतो. त्यामुळे श्राद्ध पक्षाच्या वेळी पूर्वजांना जेवण द्या, त्यांची आठवण काढा.
प्रत्येकाच्या घरात तुळस असते. वास्तुशास्त्रानुसार तुळशीजवळ दिवा लावल्याने घरातले सगळे दोष दूर होतात. जर घरात पितृदोष असेल किंवा दुसरा कोणता दोष असेल तर रोज सकाळी आणि संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावा. दिवा लावताना मनात पूर्वजांचं नाव घ्या आणि घरात सुख शांती राहू दे अशी प्रार्थना करा. हा छोटा उपाय दिसतो पण त्याचा परिणाम खूप मोठा आहे. रोज दिवा लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते. घरात सुख, शांती आणि लक्ष्मी नांदते. भांडणं कमी होतात आणि पैशाची अडचण पण दूर होते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)






