
फोटो सौजन्य- pinterest
अंतिम संस्कारानंतर स्नान करणं ही शारीरिक स्वच्छता आणि धार्मिक शुद्धीकरण या दोन्हींसाठी महत्त्वाचं मानलं जातं. आता असा प्रश्न उपस्थित होतो की अंत्यसंस्कार केल्यानंतर आंघोळ का करतात याची केवळ धार्मिक कारणं नसून वैज्ञानिक कारणे देखील आहेत. काय आहेत ती कारणे ते जाणून घेऊया
वैज्ञानिक कारणांनुसार, संसर्गाचा प्रतिंबध हे सर्वांत पहिले कारण. मृत्यूनंतर शरीराची रोगप्रतिकारकशक्ती काम करणं थांबवतं. ज्यामुळे मृतदेहामध्ये जीवाणू आणि सुक्ष्म जंतूची वेगाने वाढ होते. स्मशानभुमीतील हवा आणि मृतदेह यांच्या संपर्कामुळे हे हानिकारक जीवाणू आणि विषाणू कपड्यांना आणि त्वचेला चिकटतात. स्नान केल्याने हे संसर्गजन्य जंतू पाण्याने त्वरित धुवून जातात आणि आजाराचा धोका कमी होतो. आरोग्याचे संरक्षण हेदेखील तितकेच महत्त्वाचं आहे. प्राचीन काळी जेव्हा वैद्यकीय सेवा आणि लसी उपलब्ध नव्हत्या तेव्हा संसर्ग टाळण्यासाठी हा कठोर नियम लागू करण्यात आला होता.
धार्मिक श्रद्धांनुसार तीव्र दुःख आणि स्मशानभुमीत होणाऱ्या वारंवार अत्यंसंस्कारामुळे नकारात्मक ऊर्जा प्रभावित होते स्नान केल्याने शरीर आणि मनावरील हा नकारात्मक परिणाम निष्पाप होण्यास मदत मिळते. पाणी हे शुद्धतेचे प्रतीक आहे आणि ते पवित्र देखीव मानले जाते. अंत्यविधीवरून परत आल्यानंतर घरात प्रवेश करण्यापूर्वी डोक्यावरून स्नान करून स्वचछ कपडे घालावेत, यासाठी आंघोळ केली जाते.
अंत्यसंस्कार ही भावनिकदृष्ट्या अत्यंत कठीण प्रक्रिया असते. जवळच्या व्यक्तीच्या निधनानंतर कुटुंबीय शोकात असतात. अशा वेळी स्नान करणे ही परंपरा केवळ शारीरिक स्वच्छतेपुरती मर्यादित नसून मानसिकदृष्ट्याही स्वतःला सावरण्याच्या प्रक्रियेशी जोडली जाते. स्नानानंतर कपडे बदलणे आणि काही वेळ शांत बसणे यामुळे अंत्यसंस्काराच्या प्रसंगातून दैनंदिन जीवनाकडे हळूहळू परतण्याची मानसिक तयारी होऊ शकते.
अंत्यसंस्कारानंतर स्नान करण्याची परंपरा ही धार्मिक श्रद्धा, शुद्धीकरण, स्वच्छता आणि मानसिक संक्रमण या विविध पैलूंशी जोडलेली आहे. त्यामुळे या प्रथेकडे केवळ अंधश्रद्धा किंवा केवळ वैज्ञानिक नियम म्हणून न पाहता, ती एक पारंपरिक धार्मिक पद्धत म्हणून समजून घेणे महत्त्वाचे आहे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)