
फोटो सौजन्य- pinterest
महाराष्ट्रात औरंगाबाद नावाचा जिल्हा आहे जो आता छत्रपती संभाजीनगर नावाने ओळखला जातो. यामध्ये धुपखेड नावाचं गाव होत. चांद भाई त्या गावचे पटेल होते. एकदा त्यांची घोडी हरवली आणि चांदभाईनी खूप शोध घेतला पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही.
एक आठवड्यानंतर ते शोधत असताना त्यांना रस्त्याच्या कडेला एक 16 वर्षांचा तरुण दिसला जो शांत दिसत होता आणि फकिराच्या वेशात होता. या तेजस्वी डोळ्याच्या देखण्या मुलाने पहिल्याच नजरेत चांदभाईचे मन जिंकले. जणूकाही हा तरुण मुलगा कोणाचंही मन वाचू शकत होता. त्या फकिराने चांदभाईंना इशारा करून विचारलं काय शोधत आहात पटेल, त्याने सांगितलं माझी घोडी हरवली आहे मी तिचा शोध घेतोय.
चांदभाई हात जोडून फकिराजवळ जात म्हणाले, मग आजून पुढे कशाला जायचं. तुमचा प्राणी त्या कुंपणाच्या पलीकडे चरत आहे. फकिर किंचित हसून म्हणाला आणि त्याने पलीकडच्या झुडपाकडे हात दाखवला. त्याच्या पलीकडे काही दिसत नव्हतं. त्यांचे शब्द ऐकल्यानंतर चांदभाईने तिथे जाऊन पाहायलं आणि आश्चर्य म्हणजे त्यांची घोडी तिथे शांतपणे चरत होती.
चांदभाईना कमालीचं आश्चर्य वाटलं. त्या फकिराने त्यांना पटेल म्हणून कसं ओळखलं. कुंपनाच्या पलीकडे घोडी आहे आणि ती आपलीच आहे ते हे या मुलाला कसं माहीत या प्रश्नांनी ते थक्क झाले आणि त्यांची खात्री पटली या मुलांमध्ये दैवी शक्ती आहे. चांदभाईंनी ही घटना आपल्या मित्रांना आणि शेजाऱ्यांना सांगितल्यावर त्या मुलांची कीर्ती पाण्यावर तेलाचा थेंब पडावा तशी पसरली. मात्र चांदभाईला तो तरुण परत दिसला नाही.
काही महिन्यानंतर धूपखेडहून एक लग्नाची वरात निघाली तो लहान फकिरही वरातीसोबत होता. जेव्हा वरात शिर्डीच्या बाहेरच्या बाजूला पोहोचली तेव्हा ती वरात खंडोबा देवाला वंदन करण्यासाठी थांबले. तब्बल तीन महिन्यानंतर शिर्डीत साईंबाबाचा प्रवेश झाला होता. तेव्हापासून ते तिथेच कायम राहिले, असे सांगण्यात येते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: चांदभाईंची घोडी हरवल्यानंतर तिचा शोध घेत असताना त्यांची एका तरुण फकिराशी भेट झाली, अशी कथा सांगितली जाते.
Ans: घोडी नेमकी कुठे आहे हे फकिराने अचूक सांगितल्यामुळे चांदभाईंना त्याच्यात दैवी शक्ती असल्याचे जाणवले.
Ans: ही कथा साईबाबांच्या शिर्डी आगमनाशी जोडली जाते आणि त्यांच्या प्रारंभीच्या जीवनातील एक महत्त्वाचा प्रसंग म्हणून भक्तांमध्ये सांगितली जाते.