जून ते ऑगस्टपर्यंतचे नुकसानीसाठीचा मदतनिधी मंजूर झाला असून, निधीचे डीबीटी प्रणालीद्वारे संबंधित बाधित शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणार आहे. बाधित शेतकऱ्यांनी ई-केवायसी करुन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले.
शनी शिंगणापूर येथील प्रसिद्ध शनी देवस्थान ट्रस्टने एक मोठा निर्णय घेतला. शनी शिंगणापूरमधील १६७ कर्मचाऱ्यांना सेवेतून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये ११४ मुस्लिम कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीला वेग दिला आहे. मात्र, नव्या प्रभाग रचनेमुळे काही ठिकाणी असंतोष व्यक्त होत आहे.
सांगली, सोलापूर, कोल्हापूर, कोल्हापुरचा घाट परिसर, सातारा, मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांत मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. महानगरपालिकेच्या प्रसिद्ध सिद्धार्थ उद्यानाची भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. तर ५ जण जखमी झाली आहेत. मृत महिला उद्यानातील कर्मचारी होत्या.
सामान्यांना कमी किंमतीत वाळू मिळणार असल्याची घोषणा जिल्हा प्रशासनाने केली. मात्र, याच महिन्यात तहसीलदारांसह अन्य अधिकाऱ्यांच्या अंगावर वाहन टाकण्याचेधाडस माफियांनी केल्याचे दिसून आलेले आहे.
विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये असलेल्या अनेक पदव्यूत्तर महाविद्यालयांमध्ये आवश्यक त्या मुलभूत सुविधा, शैक्षणिक मनुष्यबळ आणि संशोधनासाठी योग्य वातावरणाचा अभाव आहे
आज विविध क्षेत्रात काम करणारे हे सगळे तरुण समाजाच्या भल्यासाठी काम करत आहेत. विशेषत: सामान्य नागरिकांचे जीवन सुखमय आणि आनंददायी होण्यासाठी ही तरुणाई आपापल्या क्षेत्रात सामाजिक बांधिलकी जपत सातत्यपूर्ण कार्यरत आहे.
तसेच या बसच्या आगमनामुळे जुन्या बसमधील वारंवार बिघाड होण्याच्या तक्रारी कमी होण्याची अपेक्षा आहे. नव्या बसच्या डिझाईनमध्ये प्रवाशांच्या आरामाला आणि सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले आहे,
गेल्या तीन दिवसांपासून सलग अवकाळी पाऊस कोसळत आहे. मंगळवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. मात्र, रात्री साडेअकरा वाजेनंतर मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत जोरदार पावसाने हजेरी दिली.
मुंबईवरून येणाऱ्या विमानांची सेवाही काही प्रमाणात विस्कळीत झाली होती. रविवारी सर्वत्र पडलेल्या मुसळधार अवकाळीमुळे अनेक ठिकाणी झाडे पडली. त्यामुळे रहदारीस मोठा अडथळा निर्माण झाला.