Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shardiya Navratri 2025 : चौथ्या माळेचा रंग पिवळा; आई तुळजाईचा उदो उदो, भाळी मळवट, भंडाऱ्याची उधळली मूठ

पिवळा रंग उत्साहाचं आणि स्वातंत्र्याचं प्रतीक आहे. भंडारा उधळत देवी येळकोट केला जातो. भाळी मळवट, भंडारा उधळत भक्त तुळजापूरात देवीची आराधना करतात.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Sep 25, 2025 | 04:44 PM
Shardiya Navratri 2025 : चौथ्या माळेचा रंग पिवळा; आई तुळजाईचा उदो उदो, भाळी मळवट, भंडाऱ्याची उधळली मूठ
Follow Us
Close
Follow Us:

नवरात्रीतला चौथा रंग पिवळा. आई राजा उदो उदो असं म्हणत तुळजाईचा जयघोष केला जातो. नवरात्रीला स्त्रीशक्तीचा जागर केला जातो. या निमित्ताने आज तुळजाईचा आवडता रंग आणि तिच्या शक्तीचं महात्म्य जाणून घेऊयात. चौथ्या दिवशीचा आजचा रंग पिवळा. हा पिवळा रंग उत्साहाचं आणि स्वातंत्र्याचं प्रतीक आहे. भंडारा उधळत देवी येळकोट केला जातो. भाळी मळवट, भंडारा उधळत भक्त तुळजापूरात देवीची आराधना करतात.

नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी देवीला अर्पण केल्या जाणाऱ्या रंगांचे विशेष महत्त्व असते. आजच्या पिवळ्या रंगाला देखील तसंच महत्व आहे.तुळजाभवानी देवी ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे आणि नवरात्रीमध्ये तिची विशेष पूजा केली जाते. जरी देवीला पिवळा रंग अर्पण केला जात असला, तरी पिवळा रंग हा थेट तुळजाई देवीच्या कोणत्याही विशिष्ट रूपाशी किंवा परंपरेशी जोडलेला नाही. हा रंग नवरात्रीच्या एका दिवसाचा भाग आहे, जो सर्व देवींच्या उपासनेसाठी वापरला जातो.

‘पिवळा रंग’ आणि ‘तुळजाई’ यांच्यातील संबंध समजून घेण्यासाठी आपल्याला नवरात्रीच्या उत्सवाकडे लक्ष द्यावे लागेल. महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या तुळजाभवानी देवीची नवरात्रीमध्ये विशेष पूजा केली जाते. या नऊ दिवसांत देवीच्या विविध रूपांची आराधना केली जाते आणि प्रत्येक दिवसासाठी एक विशिष्ट रंग ठरलेला असतो. हा रंग त्या दिवसाचे महत्त्व आणि देवीच्या रूपाशी संबंधित असतो.

पिवळ्या रंगाचे महत्त्व

पिवळा रंग हा समृद्धी, आनंद आणि उत्साहाचे प्रतीक मानला जातो. हा रंग बुद्धिमत्तेचा आणि ज्ञानाचाही सूचक आहे . अशी मान्यता आहे की, तुळजाभवानी देवीला पिवळा रंग अर्पण केला जातो. या दिवशी भक्त पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करतात आणि देवीच्या मूर्तीची पिवळ्या फुलांनी आणि वस्त्रांनी सजावट करतात. हा रंग देवीला अर्पण केल्याने घरात सुख-समृद्धी येते आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, अशी भक्तांची श्रद्धा आहे.

तुळजाई देवी आणि पिवळा रंग

तुळजाभवानी देवी, म्हणजेच तुळजाई, ही महाराष्ट्राची आराध्य देवता आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांत तुळजाभवानीच्या मंदिरात मोठी गर्दी असते. पिवळा रंग हा उत्साहाचं आणि निर्धाराचं प्रतीक आहे. तुळजाभवानी ही अशी एके देवी आहे जिने असूरांवर विजय मिळवून एका स्त्रिने राज्याचा कारभार हाती घेतला. सिंहासनावर बसलेल्या तुळजाईने फक्त राज्यशासनच हाती नाही घेतलं तर आईच्या मायेने भक्तांची काळजी घेतली आहे. हाच पिवळा रंग तिच्या निर्धाराचा आणि शुरतेचा प्रतीक मानला जातो. तसं तर अनेक रंग आहेत जसं की लाल, हिरवा हे सैभाग्याचं प्रतीक हिंदू धर्मात मानलं जातं. त्याचप्रमाणे पिवळा रंग देखील स्त्रिच्या कर्तव्याचा आणि खंबरेचा प्रतीक आहे. ज्याप्रमाणे आई तुळजाभवानी तिच्या भक्तांचं रक्षण करते अगदी त्याचप्रमाणे घरातली प्रत्येक कर्ती स्त्री ही भावनाशील आणि कर्तव्यतदक्ष असते, असा या पिवळ्या रंगाचा अर्थ आहे.

 

Web Title: Shardiya navratri 2025 the color of the fourth garland is yellow mother tuljais udo udo bhali is rotten bhandaras fist is loose

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2025 | 04:44 PM

Topics:  

  • hindu religion
  • Marathi News
  • Navratri 2025

संबंधित बातम्या

सलमान खानचा ‘बिग बॉस १९’ अडचणीत; परवानगीशिवाय गाणी वापरल्याप्रकरणी २ कोटींची कायदेशीर नोटीस
1

सलमान खानचा ‘बिग बॉस १९’ अडचणीत; परवानगीशिवाय गाणी वापरल्याप्रकरणी २ कोटींची कायदेशीर नोटीस

शाहरुख खान आणि गौरी खानविरुद्ध समीर वानखेडेने तक्रार केली दाखल, ‘बॅड्स ऑफ बॉलीवूड’ संबंधित प्रकरण
2

शाहरुख खान आणि गौरी खानविरुद्ध समीर वानखेडेने तक्रार केली दाखल, ‘बॅड्स ऑफ बॉलीवूड’ संबंधित प्रकरण

Shardiya Navratri: नवरात्रीत वाहन खरेदी करण्यासाठी काय आहे शुभ मुहूर्त, जाणून घ्या
3

Shardiya Navratri: नवरात्रीत वाहन खरेदी करण्यासाठी काय आहे शुभ मुहूर्त, जाणून घ्या

परदेशी लोकांनाही नवरात्रीची भुरळ; थायलंडमध्ये विधी, पौराणिक कथा अन् देवीसमोर तांडव नृत्य सादर, VIDEO
4

परदेशी लोकांनाही नवरात्रीची भुरळ; थायलंडमध्ये विधी, पौराणिक कथा अन् देवीसमोर तांडव नृत्य सादर, VIDEO

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.