Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News:पोलीस ठाण्यात 15 तास ठिय्या, नातेवाईक संतप्त! अखेर आश्वासनानंतर अंत्यसंस्कार, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

सुरज शिंदे यांच्या मृत्यूवरून संगमेनर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. संतप्त नातेवाईक पोलीस ठाण्यात 15 तास ठिय्या धरून होते. अखेर ठोस आश्वासनानंतर सुरज शिंदे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 15, 2026 | 08:19 PM
पोलीस ठाण्यात 15 तास ठिय्या, नातेवाईक संतप्त!

पोलीस ठाण्यात 15 तास ठिय्या, नातेवाईक संतप्त!

Follow Us
Follow Us:
  • सुरज शिंदे यांच्या मृत्यूवरून संगमेनर शहरातील वातावरण तापले
  • संतप्त नातेवाईकांचा पोलीस ठाण्यात 15 तास ठिय्या
  • अखेर सुरज शिंदे यांच्यावर अंत्यसंस्कार
संगमनेर खुर्द (ता. संगमनेर) येथील वैदूवाडी परिसरात राहणाऱ्या सूरज शिंदे यांच्या मृत्यूवरून शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. हा अपघात नसून घातपाताचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त करत नातेवाईकांनी खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

सूरज शिंदे यांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी नाशिक जिल्हा रुग्णालय येथे करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी मृतदेह रुग्णवाहिकेतून थेट संगमनेर सिटी पोलीस स्टेशन येथे आणण्यात आला. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह हलवणार नाही, असा ठाम पवित्रा नातेवाईकांनी घेतला. पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्यास रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला होता.

Bihar Crime: वरिष्ठ महिला वकिलाचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह; संशयास्पद मृत्यूने खळबळ

परिस्थिती गंभीर होत असल्याने श्रीरामपूर विभागाचे अप्पर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी नातेवाईकांशी चर्चा करून वातावरण निवळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह हलवणार नाही, या भूमिकेवर नातेवाईक ठाम राहिले.

“पुरावे दिले असताना अडचण काय?”

सूरज शिंदे यांचा मृत्यू अपघाताने नव्हे, तर घातपातामुळे झाला असल्याचे नातेवाईक वारंवार सांगत होते. मात्र, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिस उपाधीक्षक कुणाल सोनवणे व पोलिस निरीक्षक समीर बारवकर यांनी स्पष्ट केले. “आम्ही सर्व पुरावे दिले असताना गुन्हा दाखल करण्यास अडचण काय?” असा सवाल करत नातेवाईकांनी न्यायाची मागणी केली.

Kerala Crime: १४ वर्षीय मुलीसोबत बाप अन् चुलत भावासह मामाने केला अत्याचार; सलग चार वर्ष…

दरम्यान, आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ यांनीही पोलिस ठाण्यात येऊन नातेवाईकांची समजूत काढली. मृतदेहाची अवहेलना करू नये, असे आवाहन करत फिर्याद दाखल केली जाईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर तब्बल 15 तासांनी नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेत अंत्यसंस्कारासाठी नेला.

दुपारी संगमनेर खुर्द येथील अमरधाममध्ये शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. पुढील तपास सुरू असून शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिस प्रशासनाने सांगितले.

Web Title: Ahilyanagar news sangamenar city heated up over the death of suraj shinde

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2026 | 08:19 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Marathi News
  • Sangamner

संबंधित बातम्या

Anil Kapoor: अनिल कपूर यांचा कव्वाली लुक आणि एनर्जीचा धमाका, ‘इंडियाज टॉप 1%’ चं नवं टीझर आलं समोर
1

Anil Kapoor: अनिल कपूर यांचा कव्वाली लुक आणि एनर्जीचा धमाका, ‘इंडियाज टॉप 1%’ चं नवं टीझर आलं समोर

“Are We Muslims?”Javed Akhtar: ‘आपण मुस्लिम आहोत का?’ फरहानच्या त्या एका प्रश्नाने घरात काय घडलं? वाचा भन्नाट किस्सा
2

“Are We Muslims?”Javed Akhtar: ‘आपण मुस्लिम आहोत का?’ फरहानच्या त्या एका प्रश्नाने घरात काय घडलं? वाचा भन्नाट किस्सा

Avadhoot Gupte: ‘हा धंदा विद्यानंदा…’ पुण्याच्या बापटांसाठी अवधूत गुप्तेंनी गायले भन्नाट गाणे; VIDEO चर्चेत
3

Avadhoot Gupte: ‘हा धंदा विद्यानंदा…’ पुण्याच्या बापटांसाठी अवधूत गुप्तेंनी गायले भन्नाट गाणे; VIDEO चर्चेत

Unfolds Across 2 Seasons: बाप-लेकाचं नातं पाहून डोळे पाणावतील! IMDbवर 7.9 रेटिंग असलेली ‘ही’ सीरिज या विकेंडला नक्की पाहा….
4

Unfolds Across 2 Seasons: बाप-लेकाचं नातं पाहून डोळे पाणावतील! IMDbवर 7.9 रेटिंग असलेली ‘ही’ सीरिज या विकेंडला नक्की पाहा….

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.