Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navratri 2026: घटस्थापनेच्या वेळी धान्य पेरण्याची परंपरा का? नऊ दिवसांनी काय करावे हे जाणून घ्या…

Navratri 2026: शारदीय नवरात्रीत घटस्थापना करताना मातीच्या भांड्यात धान्य पेरण्याची परंपरा आहे. धान्य पेरल्यानंतर त्यावर माती टाकून रोज सकाळी आणि संध्याकाळी पाणी दिले जाते. नऊ दिवसांत त्याला हिरवे कोंब फुटतात. उत्तर भारतात या कोंबांना जवारा म्हणतात.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 11, 2026 | 01:34 PM
Navratri 2026: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Navratri 2026: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • धान्य पेरण्यामागील धार्मिक महत्त्व
  • कोणते धान्य पेरतात?
  • नवरात्रीच्या शेवटी अंकुरांचे काय करतात?
Shardiya Navratri 2026: आजपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झाली असून सगळीकडे घट बसवण्याची तयारी चालू आहे. घट बसवताना एक गोष्ट तुम्ही बघितली असेल, मातीच्या परातीत धान्य पेरतात. 9 दिवसात त्या धान्याला हिरवे कोंब येतात.अनेकांना प्रश्न पडतो की हे कशासाठी करतात? फक्त परंपरा म्हणून की यामागे काही अर्थ आहे? आणि नक्की कोणते धान्य पेरायचे असते? Navratri 2026:

धान्य पेरतात कसे?

एका मातीच्या भांड्यात आधी थोडी माती टाकतात, मग त्यावर धान्य टाकतात आणि परत वरून माती टाकून झाकतात. रोज सकाळ-संध्याकाळ थोडे पाणी मारतात. 2-3 दिवसातच त्याला छोटे कोंब फुटायला लागतात. 9 दिवसात ते चांगले वाढते. याला उत्तर भारतात जवारा म्हणतात.

यामागचे कारण काय? याची दोन कारणे आहेत.

पहिले कारण धार्मिक आहे. देवी दुर्गा ही जन्म देणारी, सृष्टी निर्माण करणारी देवी आहे. बी मधून कोंब येणे म्हणजे नवीन जन्म होणे. त्यासाठी घटामध्ये धान्य पेरणे त्याच अर्थ देवीच्या सृजन शक्तीची पूजा आहे. ते कोंब म्हणजे समृद्धी, भरभराट आणि चांगल्या दिवसांचे लक्षण समजले जाते.

Navratri 2026 First Day: नवरात्रीची पहिली माळ चुकवू नका! देवी शैलपुत्रीची पूजा, आवडता नैवेद्य आणि शुभ रंग जाणून घ्या

दुसरे कारण शेतीशी जोडलेले आहे. आपला भारत हा शेतीप्रधान देश आहे. पूर्वीच्या काळी लोक शेतीवरच जगायचे. नवरात्रीचा काळ हा शेतीसाठी महत्वाचा असतो. त्यामुळे मातीत धान्य पेरून त्याची वाढ बघणे म्हणजे शेतकरी आपल्या शेतीची आठवण करतो. निसर्गाने आपल्याला अन्न दिले त्याबद्दल आभार मानण्याचा हा प्रकार आहे.

कोणते धान्य पेरायचे?

याचा काही एकच नियम नाही, प्रत्येक भागात वेगळी पद्धत आहे.सगळ्यात जास्त लोक जव पेरतात. जवाचे कोंब लवकर येतात आणि एकदम हिरवेगार दिसतात. ते शुभ मानले जाते.गहू पण भरपूर लोक पेरतात. गहू म्हणजे समृद्धीचे प्रतीक आहे.काही घरांमध्ये तांदूळ पेरतात. तांदूळ तर पूजेत लागतोच.काही ठिकाणी मूग, हरभरा, तीळ असे कडधान्य पण पेरले जाते. तसेच काहीजण यामध्ये सात प्रकारचे धान्य पेरतात. त्याला सप्तधान्य असे म्हणतात. त्यात गहू, जव, तांदूळ, हरभरा, मूग, बाजरी आणि तीळ असे काहीही घेऊ शकता. तुमच्या घरात जे सहज मिळेल ते पेरा.

कोंबांचे महत्व काय असते?

9 दिवसात कोंब किती वाढले यावरून लोक अंदाज लावतात. जर कोंब हिरवेगार आणि सरळ वाढले तर घरात सुख-शांती राहणार, पीक चांगले येणार अशी श्रद्धा आहे. अर्थात हे शास्त्रीय नाही, माती चांगली असेल, पाणी योग्य असेल तर कोंब चांगले वाढणारच.

देवी सप्तशृंगीला अर्धशक्तीपीठ का मानले जाते? सप्तशृंगी देवीची मूर्ती एका बाजूला झुकलेली का आहे? जाणून घ्या

शेवटच्या दिवशी काय करायचे?

दसऱ्याला किंवा नवरात्री संपल्यावर हे कोंब उपटून देवीला वाहतात. काही ठिकाणी लोक हे कोंब एकमेकांना देतात आणि शुभेच्छा देतात. काही लोक याचे विसर्जन करतात. तुमच्या घरात जशी पद्धत असेल तसे करा.एक गोष्ट नक्की, ही परंपरा फक्त धार्मिक नाही तर आपल्याला निसर्गाशी जोडणारी आहे.

Web Title: Shardiya navratri 2026 why grains are sown during ghatasthapana rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2026 | 01:34 PM

Topics:  

  • hindu religion
  • Navratri 2026
  • navratri fesitival
  • religion news

संबंधित बातम्या

Tulsi: तुळस पवित्र असूनही दुर्गामातेला अर्पण का करत नाहीत? धार्मिक मान्यता काय सांगते?
1

Tulsi: तुळस पवित्र असूनही दुर्गामातेला अर्पण का करत नाहीत? धार्मिक मान्यता काय सांगते?

Navratri 2026: नवरात्रीत लुक दिसेल हटके! पहा पारंपरिक आणि मॉडर्न ऑक्सिडाईज कानातल्यांच्या सुंदर डिझाइन्स
2

Navratri 2026: नवरात्रीत लुक दिसेल हटके! पहा पारंपरिक आणि मॉडर्न ऑक्सिडाईज कानातल्यांच्या सुंदर डिझाइन्स

Navratri 2026 First Day: नवरात्रीची पहिली माळ चुकवू नका! देवी शैलपुत्रीची पूजा, आवडता नैवेद्य आणि शुभ रंग जाणून घ्या
3

Navratri 2026 First Day: नवरात्रीची पहिली माळ चुकवू नका! देवी शैलपुत्रीची पूजा, आवडता नैवेद्य आणि शुभ रंग जाणून घ्या

Navratri 2026: नवरात्रीला गरबा आणि दांडिया का खेळतात? जाणून घ्या ‘या’ परंपरेमागील धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व
4

Navratri 2026: नवरात्रीला गरबा आणि दांडिया का खेळतात? जाणून घ्या ‘या’ परंपरेमागील धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.