Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tulsi: तुळस पवित्र असूनही दुर्गामातेला अर्पण का करत नाहीत? धार्मिक मान्यता काय सांगते?

Tulsi and Goddess Durga: हिंदू धर्मात तुळशीला अत्यंत पवित्र मानले जाते आणि भगवान विष्णूच्या पूजेत तुळशीच्या पानांना विशेष महत्त्व आहे. मात्र, देवी दुर्गेच्या पूजेत तुळस अर्पण केली जात नाही, अशी धार्मिक परंपरा आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 11, 2026 | 12:28 PM
Tulsi (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Tulsi (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • शंखचूडाच्या वधाची कथा
  • वैष्णव आणि शैव परंपरांमधील फरक
  • दुर्गापूजेत कोणती फुले अर्पण करतात?
नवरात्र सुरु झाली की प्रत्येक घरात घट बसतो, देवीची पूजा होते. लोक देवीला आवडतं ते सगळं अर्पण करतात. हार, फुलं, नैवेद्य. पण एक गोष्ट कुणीच करत नाही, ती म्हणजे देवीला तुळस वाहणे. तुळस तर हिंदू धर्मात सगळ्यात पवित्र मानली जाते. घरोघरी तुळस असते, रोज पूजा होते. मग अशी पवित्र तुळस दुर्गा मातेला का वाहत नाहीत? अनेकांना हा प्रश्न पडतो. यामागे धार्मिक कथा आणि शास्त्राचा नियम दोन्ही आहे. Tulsi

कथा नंबर 1 – शंखचूडचा वध

पुराणात सांगतात की तुळशीचे लग्न शंखचूड नावाच्या असुराबरोबर झाले होते. हा शंखचूड सामान्य राक्षस नव्हता, खूप ताकदवर होता. त्याला हरवणे देवांनाही कठीण गेले होते. शेवटी देवी दुर्गेनेच त्याचा वध केला.आपल्या पतीला मारणारी देवी म्हणून तुळशीच्या मनात दुर्गेबद्दल नाराजी राहिली. तिला दुर्गेचा राग येतो असे मानले जाते. म्हणूनच तुळस कधीच दुर्गा देवीजवळ जात नाही. ही भावना आजही पाळली जाते. Tulsi and Goddess Durga:

कथा नंबर 2 – विष्णू आणि शिव यांची वेगळी परंपरा

तुळशीला विष्णूची पत्नी मानले जाते. तिला विष्णूप्रिया किंवा वैष्णवी असेही म्हणतात. त्यामुळे जिथे विष्णूची पूजा होते, जसे की विठ्ठल, कृष्ण, राम यांच्या पूजेत तुळस आवर्जून लागते.

Gardening Tips: तुळशीचे रोप वारंवार सुकून जातंय? ‘या’ पद्धतीने घ्या …

पण दुर्गा देवी ही शक्ती आहे, ती शैव पंथाशी जोडलेली आहे. शैव आणि वैष्णव या दोन वेगळ्या परंपरा आहेत. त्यामुळे वैष्णव असलेली तुळस शक्तीच्या पूजेत वापरली जात नाही. म्हणूनच जसे महादेवाला तुळस वाहत नाही, तसेच दुर्गा मातेला पण वाहत नाही. गणपती, शनीदेव, भैरव यांनाही तुळस वाहत नाहीत.

शापाची पण एक गोष्ट

काही ग्रंथात असेही लिहिले आहे की एकदा तुळशीने दुर्गा देवीला शाप दिला होता. ती म्हणाली होती की तुझ्या पूजेत माझा कधीच वापर होणार नाही. त्यामुळेच परंपरेने दुर्गा पूजेत तुळस वर्ज्य झाली.

घरामध्ये तुळशीची योग्य दिशा कोणती? | Navarashtra – Marathi News

शास्त्र काय सांगतं?

शक्तीच्या पूजेचे काही नियम आहेत. ज्या वस्तूचा संबंध असुराशी आहे, ती वस्तू देवीला अर्पण करत नाहीत. तुळशीचा संबंध शंखचूड असुराशी आल्यामुळे ती अपवित्र नाही, पण देवीच्या पूजेसाठी योग्य मानली गेली नाही.त्यामुळे नवरात्रीत देवीला फुले म्हणून झेंडू, गुलाब, कमळ, जास्वंद वाहतात, पण तुळशीचे पान चुकूनही ठेवत नाहीत.तुम्ही पण या नवरात्रीत पूजा करताना ही गोष्ट लक्षात ठेवा. तुळस ही विष्णूसाठी ठेवा आणि देवीसाठी दुसरी पवित्र फुले वापरा.

Web Title: Why tulsi is not offered to goddess durga religious beliefs rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2026 | 12:28 PM

Topics:  

  • hindu religion
  • Marathi News
  • religion news
  • religions

संबंधित बातम्या

Navratri 2026 First Day: नवरात्रीची पहिली माळ चुकवू नका! देवी शैलपुत्रीची पूजा, आवडता नैवेद्य आणि शुभ रंग जाणून घ्या
1

Navratri 2026 First Day: नवरात्रीची पहिली माळ चुकवू नका! देवी शैलपुत्रीची पूजा, आवडता नैवेद्य आणि शुभ रंग जाणून घ्या

Chhath Puja 2026 Dates: छठ पूजेचा शुभारंभ कधी? १३ ते १६ नोव्हेंबरपर्यंतचे संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या!
2

Chhath Puja 2026 Dates: छठ पूजेचा शुभारंभ कधी? १३ ते १६ नोव्हेंबरपर्यंतचे संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या!

America News : अमेरिकेत गोळ्या झाडून फाशीच्या शिक्षेचे थेट प्रक्षेपण? पोप लिओ चौदाव्यांचा मृत्युदंडाला विरोध
3

America News : अमेरिकेत गोळ्या झाडून फाशीच्या शिक्षेचे थेट प्रक्षेपण? पोप लिओ चौदाव्यांचा मृत्युदंडाला विरोध

Israel News : गाझा युद्धाच्या निषेधार्थ लंडनमध्ये हजारोंचा मोर्चा; पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले नागरिक
4

Israel News : गाझा युद्धाच्या निषेधार्थ लंडनमध्ये हजारोंचा मोर्चा; पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले नागरिक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.