Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्वामी समर्थाच्या प्रकट दिनाची गोष्ट तुम्हाला माहिती आहे का? भक्तांसाठी हा दिवस आहे खास, जाणून घ्या

श्री स्वामी समर्थ प्रकट दिन आज शुक्रवार, 20 मार्च रोजी आहे. हा दिवस भक्तांसाठी खूप खास असतो. या दिवशी श्रद्धा, भक्ती आणि मनोभावे पूजन केल्यास स्वामींचे आशीर्वाद, अशी धार्मिक श्रद्धा आहे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Mar 20, 2026 | 11:42 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • आज श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन
  • स्वामी समर्थाच्या प्रकट दिनाची गोष्ट
  •  प्रकट दिनाचे महत्त्व
 

 

श्री स्वामी समर्थ प्रकट दिन (अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन) हा मुख्यतः हिंदू दिनदर्शिकेनुसार चैत्र शुद्ध द्वितीयेला म्हणजे चैत्र नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो. यंदा हा उत्सव आज शुक्रवार, 20 मार्च रोजी उत्साहात साजरा केला जाणार आहे. ज्या दिवशी विशेष उत्सव आणि पारायण आयोजित केले जातात. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे स्वामी आपल्या भक्तांना नेहमीच सांगतात. या स्वामी महाराजांच्या प्रकट दिनाची गोष्ट तुम्हाला माहिती आहे का? जाणून घेऊया

प्रकट होण्याबाबत वेगवेगळे मतप्रवाह

खरं तरं स्वामी समर्थ महाराज कधी प्रकटले, त्याचा जन्म कधी झाला? यावर ठोस माहिती नाही आहे, पण अनेक कथांमध्ये उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, श्री स्वामी महाराजांना अवतार पंजाब प्रांतातील हास्तिनापुरापासून 24 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या छेली खेडा नावाच्या गावामध्ये एका वटवृक्षाखाली झाला होता असं सांगण्यात येतं. तर काहीजण असं म्हणतात की, स्वामी समर्थ कर्दळीच्या वनातून प्रकट झाले.

Palmistry: हाताच्या बोटांच्या आकारातून कळते नशीब? कोणते बोट वाकडे असणे ठरते अशुभ

कर्दळवन

श्री स्वामी समर्थ महाराज हे आंध्र प्रदेशातील श्रीशैलम जवळील घनदाट कद वनातून प्रकट झाले असं देखील सांगण्यात येतं. कदही वनात तपश्चर्या करत असताना एका लाकूड तोड्याचा घाव चुकून त्यांच्या मांडीवर लागला आणि त्यानंतर स्वामी प्रकट झाले. या पवित्र ठिकाणी नृसिंह सरस्वती महाराजांच्या पादूका आहेत, असं म्हटलं जातं.

अक्कलकोटमध्ये प्रथम दर्शन

जाणकाराच्या माहितीनुसार, 1856 मध्ये अक्कलकोटच्या खंडोबा मंदिरात पहिल्यांदा स्वामीचं दर्शन झालं होतं. त्यांनी मंगळवेढामधून पहिल्यांदा अकक्लकोट नगरीमध्ये प्रवेश केला होता, असं देखील म्हटलं जातं. त्यानंतर ते खंडोबाच्या मंदिरात मुक्कामासाठी राहिले होते. श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नृसिंह सरस्वती यांच्यानंतर श्री स्वामी समर्थांनी भगवान दत्तात्रेयाचं तिसरं रुप घेतलं असं मानलं जातं. अगदी आजच्या काळात देखील स्वामींना मानणारा आणि त्यांच्यावर श्रद्धा असणारा समुदाय फार मोठा आहे.

Chaitra Navratri 2026: नवरात्रीदरम्यान आपल्या राशीनुसार करा उपाय, तुमच्या सर्व इच्छा होतील पूर्ण

प्रकट दिनाचे महत्त्व

स्वामी समर्थ प्रकट दिन हा त्यांच्या अवतरणाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी भक्त स्वामींची विशेष पूजा, आरती आणि नामस्मरण करतात. “श्री स्वामी समर्थ” या मंत्राचा जप केल्याने मनःशांती, धैर्य आणि संकटातून मुक्ती मिळते अशी श्रद्धा आहे.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: स्वामी समर्थ प्रकट दिन म्हणजे काय?

    Ans: स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट होण्याची स्मृती म्हणून साजरा केला जाणारा हा पवित्र दिवस आहे. या दिवशी भक्त विशेष पूजा आणि नामस्मरण करतात.

  • Que: स्वामी समर्थ प्रकट दिन का महत्त्वाचा आहे?

    Ans: या दिवशी स्वामींच्या कृपेची विशेष अनुभूती मिळते, अशी श्रद्धा आहे. भक्त या दिवशी प्रार्थना करून मनोकामना पूर्ण होण्याची अपेक्षा करतात.

  • Que: स्वामी समर्थांचे पहिले दर्शन कुठे झाले?

    Ans: जाणकारांच्या मते अक्कलकोट येथे 1856 साली खंडोबा मंदिरात त्यांचे पहिले दर्शन झाले असे मानले जाते.

Web Title: Shree swami samarth maharaj prakat din story this day is special for devotees

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2026 | 11:20 AM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • Shree Swami Samarth

संबंधित बातम्या

Guru Uday 2026: उद्या गुरु ग्रहाची ‘शुभ नजर’! 7 राशींवर धनलाभाची शक्यता, कोणाला मिळणार मोठी संधी?
1

Guru Uday 2026: उद्या गुरु ग्रहाची ‘शुभ नजर’! 7 राशींवर धनलाभाची शक्यता, कोणाला मिळणार मोठी संधी?

Surya Grahan 2026: उद्या दिवसाच होणार ‘रात्र’! ६४ वर्षांनंतरचं दुर्मिळ सूर्यग्रहण; भारतात सूतक लागणार की नाही?
2

Surya Grahan 2026: उद्या दिवसाच होणार ‘रात्र’! ६४ वर्षांनंतरचं दुर्मिळ सूर्यग्रहण; भारतात सूतक लागणार की नाही?

Raja Yoga: 11 ऑगस्टला ग्रहांचा महासंयोगज! तयार होणार ४ दुर्मिळ रायोग; ‘या’ राशींच्या लोकांचे चमकणार नशीब
3

Raja Yoga: 11 ऑगस्टला ग्रहांचा महासंयोगज! तयार होणार ४ दुर्मिळ रायोग; ‘या’ राशींच्या लोकांचे चमकणार नशीब

Maharishi Patanjali: भारतीय ज्ञानपरंपरेतील महर्षी पतंजलींचे योगदान; योगापासून संस्कृत व्याकरणापर्यंत जाणून घ्या इतिहास
4

Maharishi Patanjali: भारतीय ज्ञानपरंपरेतील महर्षी पतंजलींचे योगदान; योगापासून संस्कृत व्याकरणापर्यंत जाणून घ्या इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.