
चौसष्ट कलांचा अधिपती असलेला श्री गणराया हे हिंदू धर्मातील आराध्य दैवत आहेत. एका पुराणानुसार, वल्लभांचा जन्म आंध्रप्रदेशच्या पिठापुरम या गावी झाला. आपळराजा आणि सुमती या दाम्पत्याच्या घरी श्राद्धाचे विधी झाले होते. तेव्हा दुपारच्या वेळी त्यांच्या दारात एक अतिथी याचक म्हणून आला. घरासमोर येऊन भिक्षा मागू लागला. त्यावेळी सुमती एकटी होती. माते भिक्षा वाढ हे ऐकून ती दारात आली. पुराणातील रुढी पाहता हिंदू धर्मात ब्राम्हणांना जेवण दिल्याशिवाय कोणी अन्न ग्रहण करु शकत नाही , असं मानलं जातं. मात्र भिक्षा मागायला आलेल्या याचकाचं रुप अगदी तेजस्वी होतं. त्या तेजस्वी रुपावर सुमती सर्व काही विसरुन गेली. सुमतीने त्या याचकाला भिक्षा घातली. त्यानंतर दत्तगुरु साक्षात मूळ रुपात प्रकटले.
प्रस्नन झालेल्या दत्तगुरुंनी सुमतीला आशिर्वाद दिला. ते म्हणाले माते मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे तुला पाहिजे तो वर माग. सुमतीला चार मुलं होती. मात्र तिची दोन मुलं देवाघरी गेली. तिची इतर दोन मुलं अंध आणि अपंग होती. आपल्या दोन्ही मुलांच्या अवस्थेमुळे दुखी असलेल्या सुमतीने सांगितलं की देवा मी आपल्यासारख्याच तेजस्वी मुलाची अपेक्षा करते. दत्तगुरु म्हणाले की, तुला कुलभुषण, तपस्वी आणि किर्तीवान पुत्र तुझ्यापोटी जन्माला येईल. हा तेजस्वी पुत्र तुमचं दुख आणि दारिद्य्र दूर करेन. हे ऐकून सुमती भारावून गेली. त्यानंर दत्तगुरु अदृश्य झाले.
सुमती आणि आपळराजा यांच्या पोटी काही महिन्याने एक तेजस्वी पुत्र जन्माला आला. त्याचे नाव श्रीपाद असं ठेवण्यात आलं. हा बालक सात वर्षांचा झाला तेव्हा त्याची मुंज केली. एवढ्या लहान वयातच त्याला सर्व वेद पाठ होते. श्रीपाद सोळा वर्षांचा होत नाही तोवर तो वेदांचे अर्थ ब्राम्हणांना समजावून सांगू लागला.
वयात आल्यानंतर श्रीपाद वल्लभांना तीर्थाटनाला जायचं असल्याचं माता पित्यांना सांगितलं. एक मुलगा म्हणून मी माता पित्यांप्रति असलेल्या कर्तव्यात कधीही कमी करणार नाही असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर श्रीपादाने आपली दृष्टी आपल्या भावंडांवर टाकली आणि ती भावंड अगदी ठणठणीत झाली. त्यानंतर त्यांना पुढे श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने ओळखलं जाऊ लागलं. अशी आहे श्रीपाद श्रीवल्लभांच्या जन्माची कथा.