Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shukra Gochar: अधिक महिन्यात शुक्र राहूच्या आर्द्रा नक्षत्रात करणार संक्रमण, धनु राशीसह या राशींनी बाळगावी सावधगिरी

बुधवार, 20 मे रोजी शुक्र राहूच्या आर्द्रा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. ज्यामुळे काही राशींच्या लोकांना चढ उताराचा सामना करावा लागू शकतो. ज्योतिषशास्त्रानुसार या काळात मानसिक ताण, आर्थिक अडचणी आणि नातेसंबंधांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो. कोणत्या राशींनी सावध राहावे जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: May 20, 2026 | 10:46 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • शुक्र राहूच्या आर्द्रा नक्षत्रात करणार संक्रमण
  • २८ मेनंतर पुनर्वसू नक्षत्रात करणार प्रवेश
  • या राशींच्या लोकांनी राहावे सावधान
 

बुधवार, २० मे रोजी शुक्र आर्द्रा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. अधिक मासात शुक्राचा आर्द्रा नक्षत्रातील प्रवेश ज्योतिषशास्त्रीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र गुरुवार, २८ मेपर्यंत या नक्षत्रात असणार आहे त्यानंतर तो पुनर्वसू नक्षत्रात प्रवेश करेल. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, आर्द्रा हे २७ नक्षत्रांपैकी सहावे नक्षत्र मानले जाते, ज्याचा स्वामी राहू असून भगवान रुद्र हे त्याचे अधिपती आहेत.

ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र हा आनंद, समृद्धी, प्रेम, कला आणि भौतिक सुखांचा ग्रह मानला जातो. तर, आर्द्रा नक्षत्राचा स्वामी राहू असून, तो गोंधळ आणि अशांतता निर्माण करणारा ग्रह मानला जातो. शुक्राचे आर्द्रा नक्षत्रातील संक्रमण धनु राशीसह इतर काही राशींच्या जीवनात अस्थिरता वाढवू शकतात. आर्द्रा नक्षत्रातील शुक्राच्या संक्रणामुळे कोणत्या राशींच्या लोकांनी सावधगिरी बाळगावी ते जाणून घ्या

या राशींच्या लोकांनी राहावे सावध

मिथुन रास

मिथुन राशीतील शुक्राच्या संक्रमणामुळे कामाच्या ठिकाणी असलेल्या लोकांसाठी हा काळ आव्हानात्मक असू शकतो. या काळात नोकरदार व्यक्तींना त्यांच्या वरिष्ठांशी समन्वय राखणे आवश्यक असेल. अनावश्यक संघर्ष आणि राग टाळण्याचा सल्ला दिला जातो, कारण याचा तुमच्या करिअरवर परिणाम होऊ शकतो. व्यवसायिकांनी या काळात विचारपूर्वक गुंतवणूक करणे आवश्यक आहे. कौटुंबिक बाबींमध्ये संयम राखणे आणि बोलताना शब्दांची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

Vinayak Chaturthi: बुधवार आणि विनायक चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर करा ‘हे’ उपाय, विघ्नहर्ता करेल तुमची सर्व अडचणी दूर

कर्क रास

शुक्राच्या संक्रमणादरम्यान कर्क राशींच्या लोकांनी आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. या काळात तुमचा खर्च अचानक वाढू शकतो, ज्यामुळे तुमच्या मासिक बजेटमध्ये व्यत्यय येऊ शकतो. या काळात कर्क राशीच्या व्यक्तींचा जवळच्या नातेवाईकाशी मतभेदही होऊ शकतो. या काळात वाहन चालवताना विशेष सावधगिरी बाळगावी. तसेच आरोग्याची काळजी घ्यावी.

वृश्चिक रास

शुक्राच्या नक्षत्र संक्रमणामुळे वृश्चिक राशींच्या लोकांना मानसिक ताण वाढू शकतो. या काळात वृश्चिक राशीच्या व्यक्तींना त्यांच्या कामात अपेक्षित यश मिळण्यास विलंब होऊ शकतो, ज्यासाठी त्यांना खूप धावपळ करावी लागू शकते. प्रेमसंबंधांमध्ये गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, या काळात कोणताही मोठा निर्णय घाईने घेणे टाळावे. आर्थिक बाबतीत विश्वासू लोकांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल आणि गुंतवणूक करताना तर तज्ञाचा सल्ला नक्कीच घ्यावा.

Numerology: लाथ मारेन तिथे पाणी काढेन; ‘या’ जन्मतारखेला जन्मलेली मुलं कमावतात गडगंज पैसा

धनु रास

शुक्राच्या नक्षत्र संक्रमणामुळे धनु राशींच्या व्यक्तींनी त्यांच्या करिअर आणि कौटुंबिक जीवनात संतुलन साधावे लागेल. या राशीतील नोकरदारांसाठी कामाच्या ठिकाणी स्पर्धा वाढू शकते आणि सहकाऱ्यांशी संघर्ष होण्याचीही शक्यता आहे. या काळात धनु राशीच्या लोकांना जुन्या वादांना सामोरे जावे लागू शकते, त्यामुळे संयम बाळगा. विद्यार्थ्यांना अभ्यासात अधिक मेहनत करावी लागू शकते. प्रवास करताना सावधगिरी बाळगण्याचा आणि महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षित ठेवण्याचा सल्ला दिला जातो.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: शुक्र ग्रहाचा संबंध कोणत्या गोष्टींशी असतो?

    Ans: ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रह प्रेम, सौंदर्य, वैभव, कला, सुख-सुविधा आणि ऐश्वर्य यांचा कारक मानला जातो.

  • Que: आर्द्रा नक्षत्राचे विशेष महत्त्व काय आहे?

    Ans: आर्द्रा नक्षत्र हे राहूशी संबंधित मानले जाते. हे नक्षत्र बदल, अस्थिरता आणि अचानक घडामोडींशी जोडले जाते.

  • Que: शुक्राच्या आर्द्रा नक्षत्रातील प्रवेशामुळे कोणत्या राशींच्या लोकांनी सावध राहावे

    Ans: शुक्राच्या आर्द्रा नक्षत्रातील प्रवेशामुळे मिथुन, कर्क, वृश्चिक आणि धनु राशींच्या लोकांनी सावध राहावे

Web Title: Shukra nakshatra gochar people of these zodiac signs should be careful

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2026 | 10:30 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Nirvana Shatakam: आत्मस्वरूपाची जाणीव करून देणारे निर्वाणषटकम्; काय आहे पठणाचे आध्यात्मिक महत्त्व
1

Nirvana Shatakam: आत्मस्वरूपाची जाणीव करून देणारे निर्वाणषटकम्; काय आहे पठणाचे आध्यात्मिक महत्त्व

Masik Shivratri: ८ की ९ ऑक्टोबर कधी आहे मासिक शिवरात्री, जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व
2

Masik Shivratri: ८ की ९ ऑक्टोबर कधी आहे मासिक शिवरात्री, जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

Hindu Religion: अंत्यसंस्कार करून घरी आल्यानंतर आंघोळ का केली जाते, जाणून घ्या यामागील कारण
3

Hindu Religion: अंत्यसंस्कार करून घरी आल्यानंतर आंघोळ का केली जाते, जाणून घ्या यामागील कारण

Numberlogy: मूलांक ४ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
4

Numberlogy: मूलांक ४ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.