Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Somnath Temple: बारा ज्योतिर्लिंगांपैकी पहिले सोमनाथ, जाणून घ्या या मंदिराचा इतिहास

बारा ज्योतिर्लिंगांपैकी पहिले ज्योतिर्लिंग म्हणून सोमनाथाला विशेष महत्त्व आहे. सोमनाथ मंदिराच्या प्रतिष्ठापनेला आज ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी ११ मे १९५१ रोजी उद्घाटन केले

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: May 11, 2026 | 12:50 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • बारा ज्योतिर्लिंगांपैकी पहिले सोमनाथ
  • सोमनाथ मंदिराचा काय आहे इतिहास
  • सोमनाथ मंदिराचे पौराणिक महत्त्व

हिंदू श्रद्धा, संघर्ष आणि पुनर्जागरणाचे प्रतीक

भारताच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक इतिहासात काही तीर्थक्षेत्रे अशी आहेत की, ती केवळ देवस्थान म्हणून नव्हे तर संपूर्ण राष्ट्राच्या आत्मविश्वासाचे प्रतीक म्हणून ओळखली जातात. गुजरातमधील प्रभास पाटण येथे अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर उभे असलेले सोमनाथ मंदिर हे असेच एक अद्भुत आणि तेजस्वी मंदिर आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी पहिले ज्योतिर्लिंग म्हणून सोमनाथाला विशेष महत्त्व आहे. हिंदूंच्या श्रद्धेचे हे केंद्र हजारो वर्षे अनेक आक्रमणे, विध्वंस आणि संकटे सहन करूनही पुन्हा पुन्हा उभे राहिले. त्यामुळे सोमनाथ मंदिर हे “विनाशातून पुन्हा उभे राहणाऱ्या भारताचे प्रतीक” मानले जाते.

पौराणिक महत्त्व

सोमनाथ या नावामागे अत्यंत प्राचीन कथा सांगितली जाते. चंद्रदेव अर्थात “सोम” यांना दक्ष प्रजापतीने शाप दिला होता. त्या शापामुळे चंद्राचे तेज नष्ट होऊ लागले. तेव्हा चंद्रदेवांनी प्रभास क्षेत्रात भगवान शंकराची कठोर तपश्चर्या केली. भगवान शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी चंद्राला शापमुक्त केले. त्या स्मरणार्थ चंद्रदेवांनी येथे सुवर्णमंदिर उभारले, अशी आख्यायिका आहे. त्यामुळे या स्थानाला “सोमनाथ” म्हणजे “सोमाचा नाथ” असे नाव प्राप्त झाले. स्कंदपुराण, शिवपुराण आणि अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये सोमनाथ क्षेत्राचे वर्णन आलेले आहे. प्रभास क्षेत्र हे श्रीकृष्णांनी देहत्याग केलेले स्थान म्हणूनही ओळखले जाते.

Chanakya Niti: स्त्रियांच्या या गुणांमुळे ठरतात विशेष, जाणून घ्या चाणक्यांनी सांगितलेली कारणे

प्राचीन वैभव

इतिहासकारांच्या मते, सोमनाथ मंदिर प्राचीन काळापासून अत्यंत समृद्ध होते. समुद्रकिनारी असल्यामुळे व्यापारमार्गांशी त्याचा संबंध होता. देशभरातून भाविक येथे येत असत. मंदिरात मोठ्या प्रमाणात सुवर्ण, रत्ने आणि दानसंपत्ती जमा होत असे. मंदिराची वास्तुशैली, भव्य सभामंडप, सुवर्णकलश आणि शिल्पकला पाहून परकीय प्रवासीही चकित होत असत.

गझनीची स्वारी

इ.स. १०२५ मध्ये अफगाणिस्तानातील आक्रमक गझनीने याने सोमनाथ मंदिरावर भयंकर आक्रमण केले. त्या काळात सोमनाथ मंदिर अतिशय श्रीमंत असल्याची माहिती गझनीला मिळाली होती. लुटीच्या उद्देशाने त्याने हजारो सैनिकांसह भारतावर स्वारी केली. इतिहासातील वर्णनांनुसार, मंदिराचे रक्षण करण्यासाठी हजारो हिंदूंनी प्राणांची आहुती दिली. गझनीने मंदिरातील संपत्ती लुटली, मंदिराचा विध्वंस केला. असे म्हटले जाते की, या लुटीत प्रचंड प्रमाणात सोने, हिरे आणि रत्ने नेण्यात आली. परंतु विशेष गोष्ट म्हणजे, मंदिर उद्ध्वस्त झाले तरी हिंदू समाजाची श्रद्धा संपली नाही. पुढील काळात अनेक राजांनी पुन्हा मंदिर उभारण्याचा प्रयत्न केला.

वारंवार झालेला विध्वंस आणि पुनर्बांधणी

सोमनाथ मंदिरावर इतिहासात अनेक वेळा आक्रमणे झाली. दिल्ली सल्तनत आणि इतर इस्लामी आक्रमकांनीही मंदिर उद्ध्वस्त करण्याचे प्रयत्न केले. तरीही प्रत्येक वेळी हिंदू समाजाने मंदिर पुन्हा उभे केले. यामुळे सोमनाथ हे “अखंड श्रद्धेचे प्रतीक” बनले. मंदिराच्या पुनर्बांधणीमागे केवळ धार्मिक भावना नव्हती, तर भारतीय संस्कृती जपण्याचा निर्धार होता.

स्वातंत्र्यानंतरची पुनर्बांधणी आणि सरदार पटेल

भारत स्वतंत्र झाल्यानंतर देशाचे पहिले गृहमंत्री आणि लोहपुरुष सरदार पटेल यांनी सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाचा संकल्प केला. जुनागढ संस्थान भारतात विलीन झाल्यानंतर पटेल प्रभास पाटण येथे आले. मंदिराची अवस्था पाहून त्यांनी मंदिर पुन्हा भव्य स्वरूपात उभारण्याचा निर्णय घेतला.

Tri Ekadash Yog: गुरु आणि चंद्राच्या युतीने तयार होणार त्रिकादश योग, या राशींच्या लोकांना होणार आर्थिक फायदा

सरदार पटेलांनी स्पष्टपणे सांगितले की, सोमनाथ मंदिराचे पुनर्निर्माण हे केवळ मंदिर उभारणे नसून, गुलामीत खचलेल्या भारतीय आत्म्याचे पुनरुत्थान आहे. त्यांच्या पुढाकाराने सोमनाथ ट्रस्टची स्थापना झाली. प्रसिद्ध स्थापत्यतज्ज्ञ प्रभाशंकर सोमपुरा यांनी मंदिराची रचना केली.

मंदिराची वास्तुकला

आजचे सोमनाथ मंदिर चालुक्य शैलीत बांधलेले आहे. मंदिराचा शिखरभाग अत्यंत भव्य असून त्यावरील ध्वज दररोज बदलला जातो. समुद्रकिनारी उभे असलेले मंदिर सूर्यास्ताच्या वेळी अतिशय मोहक दिसते.
संध्याकाळची ध्वनी-प्रकाश शोभा आणखी वाढवते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: सोमनाथ मंदिराला विशेष महत्त्व का आहे?

    Ans: हे मंदिर बारा ज्योतिर्लिंगांपैकी पहिले ज्योतिर्लिंग मानले जाते आणि हिंदू श्रद्धेचे अत्यंत पवित्र केंद्र आहे.

  • Que: “सोमनाथ” या नावामागील पौराणिक कथा काय आहे?

    Ans: पौराणिक कथेनुसार चंद्रदेव (सोम) यांनी भगवान शिवाची कठोर तपश्चर्या करून शापमुक्ती मिळवली. त्यानंतर त्यांनी येथे मंदिर बांधले, त्यामुळे या स्थानाला “सोमनाथ” असे नाव पडले.

  • Que: सोमनाथ मंदिराला “पुनर्जागरणाचे प्रतीक” का म्हटले जाते?

    Ans: अनेक आक्रमणांनंतरही मंदिर पुन्हा उभे राहिले. त्यामुळे ते भारतीय संस्कृतीच्या जिद्दीचे आणि पुनर्जागरणाचे प्रतीक मानले जाते.

Web Title: Somnath temple the first among the 12 jyotirlingas know the history of somnath temple

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2026 | 12:50 PM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • religions

संबंधित बातम्या

Pitru Paksha: ऑनलाइन श्राद्ध-पिंडदान योग्य की अयोग्य? तुम्हाला माहीत आहे का शास्त्रातील हे नियम
1

Pitru Paksha: ऑनलाइन श्राद्ध-पिंडदान योग्य की अयोग्य? तुम्हाला माहीत आहे का शास्त्रातील हे नियम

Chandrama Upay: कुंडलीमध्ये चंद्र कमजोर असल्यास पौर्णिमेच्या दिवशी करा हे खास उपाय
2

Chandrama Upay: कुंडलीमध्ये चंद्र कमजोर असल्यास पौर्णिमेच्या दिवशी करा हे खास उपाय

Sakharchauth Ganpati: आगरी समाजाचा साखरचौथचा गणपती नेमका काय? जाणून घ्या भाद्रपदातील या खास परंपरेचे महत्त्व
3

Sakharchauth Ganpati: आगरी समाजाचा साखरचौथचा गणपती नेमका काय? जाणून घ्या भाद्रपदातील या खास परंपरेचे महत्त्व

Numberlogy: भाद्रपद पौर्णिमेचा दिवस सर्व मुलांकाच्या लोकांसाठी कसा राहील जाणून घ्या
4

Numberlogy: भाद्रपद पौर्णिमेचा दिवस सर्व मुलांकाच्या लोकांसाठी कसा राहील जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.