Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tirupati Balaji Temple: बालाजींच्या कानांमागून समुद्राच्या लाटांचा आवाज का येतो? जाणून घ्या यामागील कारण

आंध्र प्रदेशातील तिरुमला पर्वतरांगांवर वसलेले तिरुपती बालाजी मंदिर हे हिंदू धर्मातील सर्वात पवित्र आणि श्रद्धास्थानांपैकी एक मानले जाते. त्यापैकी एक प्रसिद्ध मान्यता म्हणजे बालाजींच्या मूर्तीच्या कानांमागून समुद्राच्या लाटांसारखा आवाज ऐकू येतो. या श्रद्धेमागे नेमके काय कारण आहे ते आज जाणून घेऊया

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jul 12, 2026 | 09:25 AM
फोटो सौजन्य- chatgpt

फोटो सौजन्य- chatgpt

Follow Us
Follow Us:
  • बालाजींच्या कानांमागून समुद्राच्या लाटांचा आवाज का येतो
  • बालाजींच्या मंदिराची संबंधित ही आख्यायिका तुम्हाला माहिती आहे का?
  • समुद्राच्या लाटांचा आवाज येण्यामागील धार्मिक कारणे
 

तिरुपती बालाजी मंदिर हे भारतातील सर्वात श्रीमंत आणि प्रसिद्ध मंदिरांपैकी एक मानले जाते. आंध्र प्रदेशातील तिरुमला पर्वतरांगांवर वसलेले हे मंदिर दररोज लाखो भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र आहे. भगवान श्री वेंकटेश्वर (बालाजी) यांच्या दर्शनासाठी देश-विदेशातून भाविक येथे येतात. या मंदिराशी संबंधित अनेक चमत्कार, रहस्ये आणि धार्मिक मान्यता प्रचलित आहेत. त्यापैकी एक म्हणजे भगवान बालाजींच्या मूर्तीच्या कानांमागून समुद्राच्या लाटांसारखा आवाज ऐकू येतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. या मान्यतेमागे नेमकं कारण काय आहे ते जाणून घेऊया

भगवान विष्णूंचे मूळ निवासस्थान क्षीरसागर मानले जाते

तिरुमल्लातील श्री बालाजी मंदिराशी निगडित अनेक अशा रहस्यमयी कथा जोडलेल्या आहेत त्यापैकी एक प्रसिद्ध लोकश्रद्धा अशी श्री बालाजीच्या मागील बाजूस कान लावल्यास समुद्राच्या लाटांसारखा आवाज ऐकू येतो ही कथा भाविकांमध्ये मोठ्या श्रद्धेने सांगितले जाते. असे म्हणतात, भगवान विष्णूचं मूळ निवासस्थान हे क्षीरसागर मानलं जातं.

Tirupati Balaji Temple: तिरुपती बालाजीचा लाडूचा प्रसाद का आहे खास, जाणून घ्या यामागील इतिहास

क्षीरसागरात भगवान विष्णू शेषनागावर योगनिद्रेत विराजमान असल्याची पौराणिक कथा

या क्षीरसागरात भगवान विष्णू शेषनाग नागावरती योगनिद्रेत विराजमान असतात आणि त्यांच्या चरणांशी माता लक्ष्मी सेवा करत असतात. कलियुगात भक्तांच्या उद्धारासाठी भगवान विष्णूंनी श्रीनिवास अर्थातच श्री भगवान व्यंकटेश्वर म्हणजेच साक्षात बालाजी रुपात तिरुमालावरती अव तार घेतला. मात्र भक्तांचा असा विश्वास आहे पृथ्वीवर अवतार घेतल्यानंतरही त्यांचा क्षीरसागराशी असलेला संबंध हा कायम राहिला आहे म्हणूनच अशी लोकश्रद्धा निर्माण झाली.

भगवान विष्णूंच्या दिव्य उपस्थिती आणि अनंत स्वरूपाचे प्रतीक

श्री बालाजींच्या मूर्तींच्या मागे एक कान लावल्यास क्षीरसागरांतील लाटांचा मंद असा नाद ऐकू येतो. हा आवाज म्हणजे भगवान विष्णूंच्या मूळ धर्माची आठवण आणि त्याच्या दिव्य उपस्थितीचं प्रतीक मानलं जातं. अनेक भाविकांच्या मते, तो साधा ध्वनी नसून तो भगवान विष्णूंच्या अनंत आणि अखंड अस्तित्वाचं प्रतीक आहे. समुद्राचा नाद हा विश्वाच्या निर्मितीपासून चालत आलेल्या दिव्य स्पंदनाची जाणीव करून देतो, अशीही त्यामागची श्रद्धा आहे. या दाव्याला वैज्ञानिक किंवा आधुनिक पुरावा उपलब्ध नाही. शिवाय मंदिराच्या गाभाऱ्यात किंवा सर्वसामान्य भाविकांना मूर्तीच्या मागे जाऊन असा अनुभव घेण्याची परवानगी नाही. त्यामुळे ही कथा लोकश्रद्धा किंवा मंदिराशी संबंधित आख्यायिका म्हणूनच पाहिली जाते.

Tirupati Balaji Temple: या कारणासाठी तिरुपती बालाजी मंदिरात सोने आणि पैसे केले जातात दान

लोकश्रद्धा आणि मंदिराशी संबंधित आख्यायिका

काही जणांच्या मते, मंदिरांच्या रचनेमुळे किंवा ध्वनीच्या प्रतिध्वनीमुळे विशिष्ट प्रकारचा आवाज नक्कीच जाणवू शकतो. मात्र याबाबात अधिकृत कोणताही निष्कर्ष उपलब्ध नाही. या आख्यायिकेचा मुख्य उद्देश चमत्कार सिद्ध करणं नसून भगवान विष्णू सर्वत्र आहे त्याचं दिव्य स्वरुप अनंत आहे आणि ते क्षीरसागराशी आजही आध्यात्मिकरित्या जोडलेले आहे हा भक्तिभाव जागृत करणं आहे.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: बालाजींच्या कानांमागून समुद्राच्या लाटांचा आवाज येतो, अशी श्रद्धा का आहे?

    Ans: धार्मिक मान्यतेनुसार भगवान श्री वेंकटेश्वर हे श्रीविष्णूंचे अवतार असल्याने त्यांचा क्षीरसागराशी आजही आध्यात्मिक संबंध आहे. त्यामुळे मूर्तीजवळ समुद्राच्या लाटांसारखा नाद ऐकू येतो, अशी श्रद्धा आहे.

  • Que: क्षीरसागराचे हिंदू धर्मात काय महत्त्व आहे?

    Ans: क्षीरसागर हे भगवान विष्णूंचे दिव्य निवासस्थान मानले जाते. तेथे ते शेषनागावर योगनिद्रेत विराजमान असून माता लक्ष्मी त्यांच्या सेवेत असल्याचे पुराणांमध्ये वर्णन आहे.

  • Que: तिरुपती बालाजी मंदिराशी संबंधित इतर कोणती प्रसिद्ध रहस्ये आहेत?

    Ans: मूर्ती स्वयंभू असल्याची श्रद्धा, अखंड तेवत असलेला दिवा, भगवान बालाजींचे नैसर्गिक केस आणि प्रसिद्ध तिरुपती लाडू प्रसाद यांसारख्या अनेक धार्मिक मान्यता मंदिराशी जोडलेल्या आहेत.

Web Title: Tirupati balaji temple reasons behind the sound of ocean waves coming from behind balaji ears

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2026 | 09:25 AM

Topics:  

  • dharm
  • religions
  • Tirupati Balaji Temple

संबंधित बातम्या

Budh Gochar: बुध सिंह राशीत प्रवेश करताच ‘या’ राशींना मिळणार मोठी संधी; परदेश प्रवासाची संधी
1

Budh Gochar: बुध सिंह राशीत प्रवेश करताच ‘या’ राशींना मिळणार मोठी संधी; परदेश प्रवासाची संधी

झोपण्यापूर्वी देवाचे नामस्मरण का महत्त्वाचे? जाणून घ्या ‘या’ स्तोत्रांचे धार्मिक महत्त्व
2

झोपण्यापूर्वी देवाचे नामस्मरण का महत्त्वाचे? जाणून घ्या ‘या’ स्तोत्रांचे धार्मिक महत्त्व

Maihar Temple: मैहरला ‘शक्तीचे पवित्र स्थान’का मानले जाते? जाणून घ्या शारदा देवी मंदिराचा इतिहास आणि आख्यायिका
3

Maihar Temple: मैहरला ‘शक्तीचे पवित्र स्थान’का मानले जाते? जाणून घ्या शारदा देवी मंदिराचा इतिहास आणि आख्यायिका

Coconut Worship Rules: नारळाच्या दोन शकलांपैकी कोणता भाग प्रसादासाठी वापरावा? काय सांगते धर्मशास्त्र जाणून घ्या
4

Coconut Worship Rules: नारळाच्या दोन शकलांपैकी कोणता भाग प्रसादासाठी वापरावा? काय सांगते धर्मशास्त्र जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.