Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 18 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tirupati Balaji Temple: तिरुपती बालाजीचा लाडूचा प्रसाद का आहे खास, जाणून घ्या यामागील इतिहास

तिरुपती बालाजीच्या दर्शनाला जाणारा प्रत्येक भाविक एक गोष्ट आवर्जुन घेऊन येतो ती म्हणजे तिरुपती बालाजीचा प्रसिद्ध लाडूचा प्रसाद. हा पदार्थ केवळ गोड पदार्थ नसून तो भगवान श्री व्यंकटेश्वराचा आशीर्वाद आहे. या प्रसादामागे श्रद्धा, इतिहास आणि परंपरेचा सुंदर संगम आहे. लाडूची परंपरा कशी सुरू झाली जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jul 04, 2026 | 09:25 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • तिरुपती बालाजीचा लाडूचा प्रसाद का आहे खास
  • 2009 मध्ये तिरुपती लाडूला GI Tag मिळाला
  • तिरुपती लाडू जगातील सर्वाधिक प्रसिद्ध मंदिर प्रसादांपैकी एक आहे.
 

आंध्र प्रदेशातील तिरुमला टेकडीवर वसलेले श्री तिरुपती बालाजी मंदिर हे भारतातील सर्वात श्रीमंत आणि प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. येथे दररोज लाखो भाविक भगवान श्री वेंकटेश्वरांचे दर्शन घेण्यासाठी येतात. दर्शनानंतर मिळणारा तिरुपती लाडू प्रसाद हा जगभर प्रसिद्ध असून, तो केवळ गोड पदार्थ नसून श्रद्धा, परंपरा आणि धार्मिक भावनेचे प्रतीक मानला जातो. तिरुपती बालाजी मंदिरात मिळणारा लाडूचा प्रसाद इतका खास असण्यामागील काय आहे इतिहास ते जाणून घेऊया

कसा तयार केला जातो लाडू

प्राचीन काळी तिरुमल्ला मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना फळ, पोंगल किंवा इतर नैवद्यांचा प्रसाद दिला जात असे. काळानुसार भाविकांची संख्या वाढत गेली. लाखो भाविकांना टिकाऊ सहज नेता येईल आणि सर्वांना समान प्रमाणात देता येईल असा प्रसाद आवश्यक होता. यासाठी बेसन, तूप, साखर, काजू, मनुका, वेलची आणि खडीसाखर वापरून एक विशेष लाडू तयार करण्यात आला. हा प्रसाद भाविकांना आवडला आणि हळूहळू तोच तिरुपतीची ओळख बनला.

Tirupati Balaji Temple: या कारणासाठी तिरुपती बालाजी मंदिरात सोने आणि पैसे केले जातात दान

मंदिरातील ‘पोटू’ या विशाल पारंपरिक स्वयंपाकघरात दररोज तयार होतात लाखो लाडू

अशी श्रद्धा आहे की, भगवान व्यंकटेश्वरांना गोड नैवेद्य अत्यंत प्रिय आहे. भक्त प्रेमाने अर्पण केलेला नैवेद्य देवाला अर्पण झाल्यानंतर तोच प्रसाद बनतो आणि तोच भक्तांमध्ये वाटला जातो. तिरुपतीचा लाडू हा केवळ मिठाई नसून भगवंतांचा आशीर्वाद म्हणून भाविक घरी घेऊन जातात. अनेक जण तो कटुंबीय, नातेवाईक आणि मित्रांमध्ये सुद्धा वाटतात. कारण प्रसाद वाटल्याने पुण्य आणि आनंद वाढतो अशी श्रद्धा आहे. मंदिराच्या परिसरात ‘पोटू नावाचं एक विशाल पारंपरिक स्वयंपाकघर आहे. येथे दररोज लाखो लाडू तयार केले जातात. अनुभवी कर्मचारी आणि पुजाऱ्याच्या देखरेखेखाली स्वच्छता, गुणवत्ता आणि पारंपरिक पद्धती यांची विशेष काळजी घेऊन हा लाडू तयार केला जातो.

2009 मध्ये तिरुपती लाडूला GI Tag (भौगोलिक मानांकन) प्राप्त

आजचा प्रसिद्ध तिरुपती लाडू हा प्रसाद इ.स. 1715 च्या सुमारास मंदिराचा नैवेद्य स्वरुपाचा भाग म्हणून नियमित स्वरुपात सुरू झाल्याची ऐतिहासिक नोंद सुद्धा आढळते. पुढे तो मंदिराची ओळख बनला. इतकंच नाही पुढे जाऊन 2009 मध्ये तिरुपती लाडू भौगोलिक मानांकन अर्थातच जीआय टॅक (GI Tag) मिळाल. त्यामुळे तिरुपती लाडू हे नाव आणि त्यांची पारंपरिक पद्धत ही संरक्षित झाली. इतरत्र बनवलेला लाडू हा या नावाने अधिकृतपणे आता विकता येत नाही.

Tirupati Balaji Temple: तिरुपती बालाजी मंदिरात अखंड तेवतो ‘हा’ दिवा, काय आहे यामागील रहस्य जाणून घ्या

तिरुपतीचा लाडू हा जगातील सर्वाधिक प्रमाणात तयार होणाऱ्या मंदिर प्रसादांपैकी एक

तिरुपतीचा लाडू इतका प्रसिद्ध का आहे तर त्याची चव आणि सुंगध अनेक दशकांपासून एकसारखी राखली गेली आहे. प्रसाद बनवण्यासाठी उच्च दर्जाचं साहित्य वापरलं जातं. प्रत्येक लाडू विशिष्ट वजन आणि प्रमाणानुसारच तयार केला जातो. तो मंदिरातील नैवेद्याचा भाग असल्यामुळे भाविकांसाठी त्याचे अध्यात्मिक महत्त्व अधिक आहे. दर्शनानंतर प्रत्येक भाविकाला एक लाडू दिला जातो. अनेक भाविक अतिरिक्त लाडूही खरेदी करतात. दररोज लाखो लाडूच वितरण होत असल्यामुळे तो जगातील सर्वाधिक प्रमाणात तयार होणाऱ्या मंदिराच्या प्रसादापैकी एक मानला जातो.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: तिरुपती बालाजीचा लाडू इतका प्रसिद्ध का आहे?

    Ans: तिरुपती लाडू हा भगवान श्री वेंकटेश्वरांना अर्पण केलेला पवित्र प्रसाद मानला जातो. त्याची पारंपरिक चव, धार्मिक महत्त्व आणि दीर्घ इतिहास यामुळे तो जगभर प्रसिद्ध आहे.

  • Que: तिरुपती लाडूचे धार्मिक महत्त्व काय आहे?

    Ans: हा लाडू श्री वेंकटेश्वरांच्या नैवेद्याचा प्रसाद असल्याने तो देवाचा आशीर्वाद मानला जातो. अनेक भाविक तो आपल्या कुटुंबीय आणि नातेवाईकांमध्ये वाटतात.

  • Que: तिरुपती लाडू कोणत्या पदार्थांपासून तयार केला जातो?

    Ans: हा लाडू बेसन, तूप, साखर, काजू, मनुका, वेलची आणि खडीसाखर यांसारख्या दर्जेदार साहित्यापासून तयार केला जातो.

Web Title: Tirupati balaji temple what is the history behind why tirupati balaji laddu prasad is special

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2026 | 09:25 AM

Topics:  

  • dharm
  • religions
  • Tirupati Balaji Temple

संबंधित बातम्या

Kuldevta: कुलदैवताला चांदीचा टाक जेजुरीवरूनच का आणतात? जाणून घ्या धार्मिक महत्त्व आणि परंपरा
1

Kuldevta: कुलदैवताला चांदीचा टाक जेजुरीवरूनच का आणतात? जाणून घ्या धार्मिक महत्त्व आणि परंपरा

Matsya Purana: प्रलयापासून सृष्टीच्या पुनर्निर्मितीपर्यंत! मत्स्य पुराणातील महत्त्वाच्या कथा आणि रहस्ये
2

Matsya Purana: प्रलयापासून सृष्टीच्या पुनर्निर्मितीपर्यंत! मत्स्य पुराणातील महत्त्वाच्या कथा आणि रहस्ये

New Vehicle Pooja: नवीन वाहनाची पूजा का केली जाते? गरुडाशी संबंधित धार्मिक श्रद्धा जाणून घ्या
3

New Vehicle Pooja: नवीन वाहनाची पूजा का केली जाते? गरुडाशी संबंधित धार्मिक श्रद्धा जाणून घ्या

Shivlilamrut: शिवकथा श्रवणाने पिशाच योनीतील जीवांनाही सद्गती? जाणून घ्या शिवलीलामृतच्या बाराव्या अध्यायाचे माहात्म्य
4

Shivlilamrut: शिवकथा श्रवणाने पिशाच योनीतील जीवांनाही सद्गती? जाणून घ्या शिवलीलामृतच्या बाराव्या अध्यायाचे माहात्म्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.