Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Unique Maruti Temples in Pune : पुण्यातील विचित्र नावाने ओळखली जाणारी मारुती मंदिरं आणि त्यांचा रंजक इतिहास

एतिहासिक स्थळं याप्रमाणे संस्कृती जपणारं शहर म्हणून देखील पुणे शहराला पाहिलं जातं. याच पुण्यात मारुती मंदिरांचा प्राचीन इतिहास आहे. फक्त एवढचं नाही तर या मारुतीच्या मंदिरांची विचित्र नावं देखील प्रसिद्ध आहेत.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Aug 11, 2025 | 01:05 PM
Unique Maruti Temples in Pune : पुण्यातील विचित्र नावाने ओळखली जाणारी मारुती मंदिरं आणि त्यांचा रंजक इतिहास
Follow Us
Close
Follow Us:
  • पुण्यातील मारुती मंदिरांचा रंजक इतिहास
  • पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या मारुती मंदिरांची गमतीशीर नावं
  • असा आहे मारुती मंदिरांचा इतिहास
 

पुणे तिथे काय उणे असं कायमच म्हटलं जातं. शिक्षणाचं माहेरघर असलेल्या या पुण्याला एतिहासिक वारसा जसा लाभला आहे तसाच धार्मिक इतिहास देखील लाभला आहे. शिक्षण, एतिहासिक स्थळं याप्रमाणे संस्कृती जपणारं शहर म्हणून देखील पुणे शहराला पाहिलं जातं. याच पुण्यात मारुती मंदिरांचा प्राचीन इतिहास आहे. फक्त एवढचं नाही तर या मारुतीच्या मंदिरांची विचित्र नावं देखील प्रसिद्ध आहेत. अशी कोणती मंदिरं आहेत ते जाणून घेऊयात.

स्वराज्यसूर्य या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन पुण्य़ातील या मारुती मंदिरांची गंमतीशीर माहिती देण्यात आली आहे.

जिलब्या मारुती

तुळशीबागेतील जिलब्या मारुतीचं नाव प्रसिद्ध आहे. या जिलब्या मारुतीची गोष्ट देखील तशीच गंमतीशीर आहे. जिलब्या मारुती मंदिराचं पूर्वीचं नाव विसावा मारुती असं होतं. हे मंदिर वाटेतच असल्याने काही घटका आराम करण्यासाठी म्हणजेच विसावा घेण्यासाठी लोकं इथे थांबायची आणि पुढच्या प्रवासाला निघायची. त्यामुळे याला विसावा मारुती असं म्हटलं जातं होतं. या ठिकाणी कालांतराने एका हलवाईचं दुकान होतं. या हलावाईची मारुतीवर प्रचंड श्रद्धा होती. तो सुरुवातीच्या 11 ते 21 जिलेबींचा हार या मारुतीला अर्पण करायचा त्यामुळे विसावा मारूती पुढे जिलब्या मारुती म्हणून ओळखू लागला.

बटाट्या मारुती

शनीवार वाड्याच्या पटांगणात असलेला हा बटाट्या मारुती. याचं नाव बटाट्य़ा कसं पडलं तर वाड्याच्या पटांगणात त्यावेळी मोठी बाजार पेठ असत. त्यावेळी भाजीमंडईतच हे मंदिर उभारलं होतं. ज्य़ा ठिकाणी हे मारुतीचं मंदिर होतं त्या ठिकाणी बटाटे विकणारे व्यापारी मोठ्या प्रमाणात होते म्हणून याला बटाट्य़ा मारुती म्हणून लोक ओळखू लागले.

 

Vastu Tips: घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर कोणत्या देवतेचा फोटो लावणे असते शुभ

भांग्या मारुती

शनिवार वाड्यापासून श्रीमंत दगडूशेठ गणपतीकडे जाताना उजव्या बाजूला भांग्या मारुती हे हनुमानाचे मंदिर आहे. पूर्वी या मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरात भांग विकली जायची. म्हणूनच या मंदिराला भांग्या मारुती असे नाव पडले. आता हे मंदिर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन हेरिटेज लिस्टच्या ग्रेड ३ हद्दीत येतं.

उंटाड्या मंदिर

पुण्यातील काही मारुती मंदिरे पेशवेकालीन काळातील आहे. त्यावेळी परिसरात घडलेल्या विशिष्ट घटनेच्या नावाने ही मंदिरं ओळखली जातात. पुण्याच्या रास्ता पेठेत पेशव्यांच्या फौजेला उंट बांधून ठेवण्याची जागा होती. त्याजवळच असलेले हनुमान मंदिर कालांतराने उंटाड्या मंदिर म्हणून ओळखले जाऊ लागले.

Palmistry: या प्रकारची जीभ असलेल्या लोकांना जीवनात मिळते सुख, संपत्ती आणि ज्ञान

डुल्या मारुती

डुल्या मारुती मंदिर गणेश पेठेजवळ लक्ष्मी रोडवर आहे. एका कथेत असे म्हटले आहे की, पानिपतच्या तिसऱ्या युद्धात मराठ्यांची अहमदशहा अब्दालीशी लढाई झाली. या लढाईदरम्यान राज्य आणि पुणे शहरावर झालेल्या दुःखाने ही हनुमानाची मूर्ती थरथरायला आणि डोलायला लागली होती. म्हणून या प्राचीन मंदिराला काही वर्षाने डुल्या मारुती अस नाव पडलं.

पत्र्या मारुती

नारायण पेठेतील या प्राचीन हनुमान मंदिरात 1867 पासून पत्रे आहेत. असे म्हणतात की ससून रुग्णालयाच्या बांधकामादरम्यान पहिल्यांदाच पुण्यात पत्रे मागवण्यात आले होती. त्यापैकी काही उरलेले या हनुमान मंदिरात ठेवण्यात आले होते. त्याच उरलेल्या पत्र्यांचा वापर ह्या मंदिरासाठी झाला व तेव्हापासून हे मंदिर पत्र्या मारुती म्हणून ओळखले जाऊ लागले.

खरकट्या मारुती

लक्ष्मी रस्त्यावरील तुळशीबागेत ‘खरकट्या मारुती’ मंदिर आहे. पूर्वी दुसऱ्या गावातून दर्शनासाठी आलेले भाविक, शेतकरी मंदिराच्या परिसरात भाकरी खाण्यासाठी बसत. त्यावरून या मारुतीला ‘खरकट्या मारुती’ नाव पडलं.

दुध्या मारुती

शुक्रवार पेठेत ‘दुध्या मारुती’चं मंदिर आहे. पूर्वी येथील मंदिराच्या परिसरात गायी-म्हशींचा गोठा होता, येथून दूध-तूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध व्हायचं. त्यावेळी आजूबाजूच्या देवांना पाण्याने अभिषेक केला जायचा, मात्र येथील मारुतीला गवळी दुधाने अभिषेक घालायचा, त्यामुळे या मारुतीला ‘दुध्या मारुती’ नाव पडलं.

‘रड्या मारुती’

हे मंदिर गुरुवार पेठेमध्ये आहे. “रड्या” हा शब्द या मंदिराच्या नावामागे असलेल्या एका विशिष्ट कारणामुळे आला आहे. या मंदिराला हे नाव का पडले, याबाबत अनेक कथा प्रचलित आहेत, पण मुख्यत्वे, मंदिरातील हनुमानाची मूर्ती ‘रडताना’ किवा ‘दुःखाने व्याकूळ’ झाल्यासारखी दिसते, असे सांगितले जाते. त्यामुळे, या मंदिराला ‘रड्या मारुती’ असे नाव पडले आहे, असे स्थानिक सांगतात. परंतु काहींच म्हणणे असे ही आहे की, या मारुतीसमोर मृतदेह ठेवून रडायची पूर्वी प्रथा होती, म्हणूनच या मारुतीचं नाव ‘रड्या मारुती’ ठेवण्यात आलं.

‘भिकारदास मारुती’

‘भिकारदास मारुती’ मंदिर पुण्याच्या सदाशिव पेठेत असून या मंदिराची स्थापना जवळपास दीडशे ते दोनशे वर्षांपूर्वी करण्यात आली होती. त्या काळी या मंदिराची स्थापना गुजराती नागर समाजातील ‘भिकारदास सराफ’ या व्यक्तीने केली होती. भिकारदास यांच्या दानशूर वृत्तीमुळे येथील परिसरात ते खूप प्रसिद्ध होते. त्याकाळी त्यांनी या एक बाग विकत घेऊन त्या परिसरात हनुमानाचे मंदिर बांधले होते, त्यामुळे भिकारदास सराफांनी बांधलेल्या मंदिराला भिकारदास मारुती असे नाव देण्यात आले.

Web Title: Unique maruti temples in pune and their intresting history

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2025 | 12:47 PM

Topics:  

  • History
  • Pune

संबंधित बातम्या

मोठी बातमी! ‘परवानगी नसताना वाहनांवर…’; अजित पवारांच्या ‘या’ नेत्यावर गुन्हा दाखल
1

मोठी बातमी! ‘परवानगी नसताना वाहनांवर…’; अजित पवारांच्या ‘या’ नेत्यावर गुन्हा दाखल

Crime News: तडीपार गुंडाकडे पोलिसांचे दुर्लक्ष! हिंमत एवढी की महिलेचा केला बलात्कार, पोलीस कॉन्स्टेबलचे निलंबन
2

Crime News: तडीपार गुंडाकडे पोलिसांचे दुर्लक्ष! हिंमत एवढी की महिलेचा केला बलात्कार, पोलीस कॉन्स्टेबलचे निलंबन

Pune Politics: पुणे महापालिकेचा राजकीय पेच वाढणार! ‘आप’, ‘वंचित’ आणि ‘एमआयएम’ निवडणुकीच्या रिंगणात
3

Pune Politics: पुणे महापालिकेचा राजकीय पेच वाढणार! ‘आप’, ‘वंचित’ आणि ‘एमआयएम’ निवडणुकीच्या रिंगणात

Bats: वटवाघूळ झाडाला कायमच उलटी लटकलेली का असतात? कारण वाचून तुम्हीसुद्धा व्हाल हैराण
4

Bats: वटवाघूळ झाडाला कायमच उलटी लटकलेली का असतात? कारण वाचून तुम्हीसुद्धा व्हाल हैराण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.