
फोटो सौजन्य- pinterest
२३ जानेवारी रोजी वसंत पंचमीचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, वसंत पंचमीचा दिवस हा स्वयंसिद्ध मुहूर्त मानला जातो. या दिवशी कोणत्याही शुभ कार्यासाठी मुहूर्त पाहण्याची गरज नसते, या शुभ योगांचा सकारात्मक प्रभाव पाच राशींवर पडणार असून त्यांच्यासाठी प्रगतीचे नवे दरवाजे उघडणार आहेत.
पंचांगानुसार माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथीची सुरुवात 22 जानेवारी रोजी संध्याकाळी 6.15 वाजता झाली आहे आणि पंचमी तिथीची समाप्ती 23 जानेवारी रोजी संध्याकाळी 8.30 वाजता होईल. अशा वेळी वसंत पंचमी 23 जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे.
हिंदू धर्मामध्ये सरस्वती देवीची पूजा केली जाते. हा दिवस देवी सरस्वतीला समर्पित आहे. 23 जानेवारी रोजी सकाळी 6.43 ते दुपारी 12.15 या वेळेत सरस्वती देवीची पूजा करण्याचा शुभ काळ आहे आणि या काळात पूजा केल्यास चांगले फळ मिळेल.
वृषभ राशीच्या लोकांना करिअरमध्ये मोठी झेप घेण्याची संधी मिळेल. यावेळी प्रगतीचे नवे मार्ग खुले होतील आणि कार्यक्षेत्रात अचानक यश मिळाल्याने मन प्रसन्न राहील. नवीन ओळखी भविष्यात फायदेशीर ठरतील.
कन्या राशीच्या लोकांना व्यापाऱ्यांच्या नफ्यात वाढ होण्याची शक्यता आहे. जुन्या मित्रांचे मोलाचे सहकार्य लाभेल, कौटुंबिक नातेसंबंधांत दृढता येईल आणि घरातील वातावरण सकारात्मक राहील.
धनु राशीच्या लोकांसाठी हा सण नवी उमेद घेऊन येणारा राहील. धनधान्याची प्राप्ती होईल आणि उत्पन्नाचे स्रोत वाढल्याने आर्थिक स्थिती सुधारेल. अनावश्यक खर्चावर नियंत्रण येईल. आयुष्यात सकारात्मक बदल घडतील आणि मित्रपरिवारासोबत आनंदाचे क्षण व्यतीत करता येतील.
मकर राशीत सूर्य, चंद्र, मंगळ, बुध आणि शुक्र यांची युती होत असल्याने प्रगतीचे प्रबळ योग आहेत. नवीन प्रकल्प, दुकान किंवा कारखाना सुरू करण्यासाठी हा काळ अत्यंत अनुकूल आहे. कुटुंबासोबत घालवलेला वेळ नात्यांमधील ओलावा वाढवण्यास मदत करेल.
कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ आर्थिकदृष्ट्या फायदेशीर राहील. धनप्राप्तीचे उत्तम योग असून वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ होण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीसाठी हा काळ शुभ मानला जातो.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: वसंत पंचमी हा दिवस देवी सरस्वतीच्या पूजेसाठी समर्पित आहे. या दिवशी विद्या, बुद्धी आणि सकारात्मक ऊर्जा प्रबळ असते, त्यामुळे नवीन कामांना यश मिळते अशी धार्मिक मान्यता आहे.
Ans: नवीन व्यवसाय किंवा स्टार्टअप शिक्षण, अभ्यास, नवीन कोर्स नोकरी किंवा करिअरची सुरुवात नवीन खाते, वह्या, ऑफिस काम कला, संगीत, लेखनाची सुरुवात
Ans: वसंत पंचमीला वृषभ, कन्या, धनु, मकर आणि कुंभ राशीच्या लोकांना होणार फायदा