Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vastu Tips: घरात कासव आणण्यापूर्वी या गोष्टी ठेवा लक्षात, नोकरी व्यवसायात होईल प्रगती

घरात क्रिस्टल, पितळ किंवा इतर साहित्यापासून बनवलेले कासव ठेवणे खूप शुभ मानले जाते. फेंगशुईनुसार, घरात या पद्धतीचे कासव असल्यास आर्थिक लाभाची शक्यता वाढते. घरात कासव आणताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Nov 20, 2025 | 11:19 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • घरात कासव आणण्यापूर्वी कोणते नियम पाळावेत
  • घरात कोणता कासव आणावा
  • कासव आणण्याचे वास्तुशास्त्रातील नियम
 

फेंगशुई आणि वास्तुशास्त्रात घरात कासव पाळण्याबद्दल महत्त्वाचे नियम सांगण्यात आलेले आहे. बऱ्याचदा सुख समृद्धीसाठी घरामध्ये असे कासव आणले जातात. फेंगशुईनुसार, घरात कासव पाळल्याने कुटुंबातील सर्व सदस्यांवर सकारात्मक परिणाम होतो. शिवाय, तुमच्या ऑफिसमध्ये कासव पाळणे देखील शुभ मानले जाते. यामुळे नोकरी आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते. दरम्यान घरी किंवा ऑफिसमध्ये कासव पाळण्यापूर्वी काही नियम लक्षात ठेवणे आवश्यक आहे. चुकीच्या ठिकाणी किंवा दिशेने कासव ठेवल्यास व्यक्तीच्या जीवनावर त्याचे नकारात्मक परिणाम होतात. घरामध्ये कासव पाळण्यापूर्वी वास्तूशास्त्र आणि फेंगशुईचे काही नियम लक्षात ठेवणे गरजेचे आहे. काय आहेत ते नियम जाणून घ्या

घरामध्ये कासव कसा आणि कुठे ठेवायचा

फेंगशुईनुसार, कासवाला योग्य ठिकाणी आणि योग्य पद्धतीने ठेवणे खूप महत्त्वाचे मानले जाते. हिंदू धर्मामध्ये कासवाला सुख आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. पौराणिक मान्यतेनुसार, भगवान विष्णूंनी कासवाचे रुप धारण केले होते. शिवाय, कासवाला शांत प्राणी मानले जाते. त्याची प्रतिमा देव्हाऱ्यात ठेवू शकता. याव्यतिरिक्त, पाण्याने भरलेल्या पितळेच्या किंवा अष्टधातुच्या भांड्यात कासवाची छोटी मूर्ती ठेवावी. घरी किंवा देव्हाऱ्यात कासव ठेवणे खूप फायदेशीर असते असे मानले जाते.

Vastu Tips: लग्नपत्रिका बनवताना वास्तूच्या या टिप्स ठेवा लक्षात, वैवाहिक जीवन होईल आनंदी

योग्य दिशेला ठेवा कासव

बऱ्याचदा आपण घरामध्ये कासवासाठी जागा निवडतो. फेंगशुई आणि वास्तुमध्ये कासव ठेवण्यासाठी योग्य दिशा सांगितली गेली आहे. असे मानले जाते की उत्तर दिशा ही देवी लक्ष्मीची दिशा आहे. अशा वेळी कासवाला तुमच्या घराच्या उत्तर दिशेला ठेवणे खूप चांगले असल्याचे मानले जाते. यामुळे धनाची देवी लक्ष्मीचा देखील आशीर्वाद देखील मिळतो आणि तुमचा बँक बॅलन्स वाढेल.असे मानले जाते की कासव उत्तर दिशेला ठेवल्याने शत्रूंचा नाश होतो आणि जीवनात सुख आणि समृद्धी येते.

पितळी कासवामुळे होते प्रगती

जर तुम्हाला तुमच्या करिअर, व्यवसाय किंवा नोकरीमध्ये सतत अडथळे आणि समस्या येत असल्यास घरामध्ये पितळी कासव आणून ठेवावे. यामुळे कामामध्ये येणारे अडथळे कमी होतात. तसेच तुम्हाला अपेक्षित यश मिळते. विद्यार्थ्यांसाठी देखील पितळी कासव खूप फायदेशीर आहे. घरात पितळेचे कासव ठेवल्याने आजूबाजूचे वातावरण नेहमीच सकारात्मक राहते.

संपत्ती मिळवण्यासाठी फायदेशीर

जर तुम्हाला आर्थिक अडचणी येत असतील तर तुम्ही तुमच्या घरात किंवा ऑफिसमध्ये क्रिस्टल कासव ठेवू शकता. मान्यतेनुसार क्रिस्टल कासवामुळे घरामध्ये संपत्ती येते. यामुळे आर्थिक अडचणींपासून सुटका होते आणि संपत्तीमध्ये देखील वाढ होते. त्याचप्रमाणे घराच्या किंवा ऑफिसच्या मुख्य प्रवेशद्वारावर कासवाचा फोटो देखील लावू शकता. व्यवसायामध्ये प्रगतीचे नवीन संधी मिळतात आणि नोकरीतही यश मिळू शकते.

Vastu Tips: भिंतीवर घड्याळ लावण्यापूर्वी वास्तूचे ‘हे’ नियम, अन्यथा होऊ शकते आर्थिक नुकसान

घरामध्ये 2 कासवे कधी ठेवावेत

फेंगशुईनुसार, तुमच्या घरात कासव पाळल्याने नशिबाची साथ मिळते. दरम्यान, जर तुमच्या घरात अनेकदा किरकोळ वाद किंवा तणाव निर्माण होत असल्यास तर तुम्ही ही छोटीशी गोष्ट करू शकता. तुमच्या घरात एक किंवा दोन कासव आणा. असे केल्याने नकारात्मकता दूर होईल आणि सकारात्मकता वाढेल. यामुळे तुमची घरगुती त्रासातून सुटका होईल. तसेच कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम राहील. घरात शांती, आनंद आणि आल्हाददायक वातावरण राखण्यासाठी, कासवांची जोडी पाळणे सर्वोत्तम मानले जाते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: कासव घरात ठेवणे शुभ का मानले जाते

    Ans: वास्तुशास्त्रानुसार कासव धनस्थैर्य, दीर्घायुष्य, सकारात्मक ऊर्जा आणि घर व्यवसायात स्थिरता आणते

  • Que: कासव घरात कोणत्या दिशेला ठेवावे

    Ans: उत्तर दिशेला किंवा ईशान्य दिशेला कासव ठेवणे शुभ असते

  • Que: कासवाच्या तोंडाची दिशा कोणती असावी

    Ans: कासवाचे तोंड घराच्या आतल्या बाजूला असावे

Web Title: Vastu tips remember these rules before bringing a turtle into the house

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2025 | 11:19 AM

Topics:  

  • vastu news
  • Vastu Shastra
  • Vastu Tips

संबंधित बातम्या

Vastu Tips: घरात करू नका या चुका, अन्यथा वाढू शकतात आर्थिक अडचणी
1

Vastu Tips: घरात करू नका या चुका, अन्यथा वाढू शकतात आर्थिक अडचणी

Vastu Tips: नोकरीत अडथळे येत आहेत का? घरात ‘ही’ मूर्ती ठेवल्याने बदलेल तुमचे नशीब
2

Vastu Tips: नोकरीत अडथळे येत आहेत का? घरात ‘ही’ मूर्ती ठेवल्याने बदलेल तुमचे नशीब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.