Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vastu tips: घरामध्ये कोणत्या दिशेला पती-पत्नीचा लावावा फोटो, जाणून घ्या वास्तू नियम

वास्तूशास्त्रात वास्तूच्या नियमांचे पालन करणे खूप महत्त्वाचे मानले जाते. घरामध्ये सुख, समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी वास्तूच्या नियमांचे पालन केले पाहिजे. कोणत्या दिशेला पती-पत्नीचा फोटो लावावा, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jun 06, 2025 | 10:54 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:

वास्तुशास्त्राच्या नियमांचे पालन केल्याने त्याचा सकारात्मक परिणाम आपल्या जीवनावर होतो. घर बांधताना आणि घरात वेगवेगळ्या वस्तू ठेवताना वास्तुचे नियम पाळले तर कौटुंबिक जीवनात सुख, शांती आणि समृद्धी टिकून राहते. हिंदू धर्मात वास्तुशास्त्राला विशेष महत्त्व आहे, ज्यामध्ये घराच्या आत चित्रे लावण्यासाठी शुभ स्थाने आणि दिशानिर्देश देखील सांगितले आहेत. असे मानले जाते की, पती-पत्नीचे वैवाहिक जीवन आनंदी ठेवण्यासाठी वास्तुच्या नियमांचे पालन केले पाहिजे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही घरात स्वतःचा आणि तुमच्या जोडीदाराचा फोटो लावला तर प्रथम योग्य दिशा आणि वास्तुच्या काही महत्त्वाच्या नियमांची काळजी घ्या.

या दिशेला लावू नका पती-पत्नीचा फोटो

पती पत्नी अनेकदा वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या घरात फोटो लावतात. वास्तुशास्त्रानुसार, काही ठिकाणी पती-पत्नींचा फोटो लावणे शुभ मानले जात नाही. असे केल्याने तुमच्या वैवाहिक जीवनात समस्या निर्माण होऊ शकतात. असे मानले जाते की, घरामध्ये पती पत्नीचे फोटो कधीही दक्षिण दिशेला लावू नये. वास्तुशास्त्रानुसार ही दिशा यमराज आणि पूर्वजांची मानली जाते. दक्षिण दिशेला फोटो लावल्यास दोघांना जीवनात समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.

Vastu Tips: टीव्ही किंवा मोबाईल पाहत जेवल्याने तुमच्या प्रगतीत येऊ शकतो अडथळा

फोटो लावण्याची योग्य दिशा

वास्तुशास्त्रानुसार पती पत्नीचा फोटो योग्य दिशेने लावल्यास दोघांमधील नाते नेहमीच मजबूत राहते आणि वैवाहिक जीवनात आनंद येतो. मान्यतेनुसार दोघांचा फोटो नैऋत्य दिशेला कोपऱ्यात लावावा. नैऋत्य कोपऱ्यात पती पत्नीचा फोटो लावणे सर्वोत्तम मानले जाते. ऋत्य कोपऱ्याव्यतिरिक्त, तुम्ही पती-पत्नीचा फोटो उत्तर दिशेला देखील लावू शकता. असे केल्याने दोघांमधील नात्यात गोडवा येतो आणि समन्वय अबाधित राहतो.

या ठिकाणी कधीही लावू नका फोटो

घरामध्ये फोटो लावण्यापूर्वी दिशेकडे लक्ष देणे गरजेचे आहे. वास्तुशास्त्रात, घरात काही ठिकाणी पती-पत्नीचा फोटो लावणे अशुभ मानले जाते. असे म्हटले जाते की कधीही जोडप्याचा फोटो त्यांच्या बेडसमोर लावू नये. तसेच देव्हारा, बाथरुमच्या समोर पती पत्नीचा फोटो लावू नये. या ठिकाणी पती-पत्नीचा फोटो लावल्याने वैवाहिक जीवनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

या ठिकाणी लावावा फोटो

वास्तुशास्त्रानुसार, घरात काही ठिकाणी पती-पत्नीचा फोटो लावणे अशुभ मानले जाते. असे म्हटले जाते की जोडप्याचा फोटो कधीही तुमच्या बेडच्या अगदी समोर ठेवू नये.

Nirjala Ekadashi: निर्जला एकादशीच्या दिवशी राशीनुसार करा या गोष्टींचे दान

एकाच वेळी अनेक फोटो लावू नये

बऱ्याचदा लोक त्यांचे अनेक फोटो एकत्र लावतात. असे करणे योग्य मानले जात नाही. यामुळे घरात समस्या निर्माण होऊ शकतात. वास्तुशास्त्रानुसार, एक किंवा दोन फोटो नेहमी तुमच्या ड्रॉईंग रूममध्ये किंवा बेडरूममध्ये लावावेत. घरात जोडप्याचा फोटो लावल्याने सकारात्मक ऊर्जा पसरते. तसेच, फोटो लावताना, त्याची फ्रेम तुटलेली किंवा फिकट रंगाची नसावी हे लक्षात ठेवा. असे फोटो लावल्याने घरात नकारात्मकता येऊ शकते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Vastu tips in which direction should a photo of husband and wife be placed in the house

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2025 | 10:54 AM

Topics:  

  • vastu news
  • Vastu Shastra
  • Vastu Tips

संबंधित बातम्या

Vastu tips: स्वयंपाकघरात इंडक्शन ठेवताना सावधान, या दिशेला ठेवल्यास वाढू शकतात समस्या
1

Vastu tips: स्वयंपाकघरात इंडक्शन ठेवताना सावधान, या दिशेला ठेवल्यास वाढू शकतात समस्या

Vastu Tips: आर्थिक समस्या दूर करण्यासाठी घरामध्ये आणा या वस्तू, काय सांगते वास्तुशास्त्र जाणून घ्या
2

Vastu Tips: आर्थिक समस्या दूर करण्यासाठी घरामध्ये आणा या वस्तू, काय सांगते वास्तुशास्त्र जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.