Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ladki Bahin Yojana |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vastu Tips: घराच्या मुख्य दरवाजाला उंबरठा असणे का आहे महत्त्वाचे, जाणून घ्या कारणे

घराच्या मुख्य दरवाजाला उंबरठा असणे शुभ मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार उंबरठा घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करण्यापासून रोखतो आणि सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत करतो, अशी श्रद्धा आहे. घराच्या मुख्य दरवाजाला उंबरठा का असावा, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: May 20, 2026 | 09:40 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • घराच्या मुख्य दरवाजाला उंबरठा असणे का आहे महत्त्वाचे
  • घराला उंबरठा असण्याची कारणे
  • उंबरठा नेमका कसा असावा
 

 

वास्तुशास्त्रानुसार, घराला उंबरा म्हणजेच उंबरठा असणे अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. तो केवळ दरवाज्याचा भाग नसून घराचे रक्षण करणारी लक्ष्मण रेखा मानली जाते. उंबऱ्याला धार्मिक, वास्तुशास्त्रीय आणि व्यावहारिक असे तिन्ही प्रकारचे महत्त्व आहे. उंबरा नकारात्मक ऊर्जा रोखतो, सकारात्मकता वाढवतो, घराची लक्ष्मी स्थिर ठेवतो आणि मुख्य दरवाजाची चौकट पूर्ण करतो. आज अनेक आधुनिक घरांमध्ये उंबरठा ठेवण्याची परंपरा कमी होताना दिसते, मात्र धार्मिक आणि वास्तुशास्त्रीय दृष्टीने उंबरठ्याला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. वास्तुशास्त्रानुसार घराला उंबराठा असण्यामागील काय आहेत कारणे जाणून घ्या

आर्थिक स्थैर्याशी संबंध

काही वास्तु मान्यतांनुसार मुख्य दरवाजाला उंबरठा नसल्यास घरातील धन टिकत नाही किंवा आर्थिक अडचणी वाढू शकतात. उंबरठा हा घरातील समृद्धीचे संरक्षण करणारा मानला जातो.

Vastu Tips: कपाटाच्या वर ठेवलेल्या या वस्तूंमुळे वाढू शकतात आर्थिक समस्या

कीटक आणि धूळ रोखण्यासाठी उपयुक्त

पूर्वीच्या काळात उंबरठा हा केवळ धार्मिक कारणांसाठीच नव्हे तर व्यावहारिकदृष्ट्याही महत्त्वाचा होता. उंबरठ्यामुळे धूळ, पाणी आणि कीटक घरात येण्याचे प्रमाण कमी होत असे.

घराला उंबरठा असण्याची कारणे

उंबरा बाहेरून येणारी नकारात्मक शक्ती आणि वाईट शक्तीला घरात प्रवेश करण्यापासून रोखते. मुख्य प्रवेशद्वारातील वास्तूदोष कमी करण्यासाठी उंबरा महत्त्वाची भूमिका बजावतो. उंबरा हा पूजनीय आहे यामुळे घरात लक्ष्मीची कृपा राहते आणि पैसा टिकतो. उंबरठ्यावरती रांगोळी काढली जाते, हळद कुंकू लावले जाते. लक्ष्मीचे स्वागत करण्याचं ते प्रतीक मानलं जातं. उंबरठ्यामुळे घराच्या मुख्य दरवाज्याची चौकट पूर्ण होते. ज्यामुळे घरातील ऊर्जा समतोल राहते. नववधुचे पाऊल पडताच उंबरठ्याचे पूजन केले जाते ते शुभ मानलं जातं.

Vinayak Chaturthi: बुधवार आणि विनायक चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर करा ‘हे’ उपाय, विघ्नहर्ता करेल तुमची सर्व अडचणी दूर

उंबरा नेमका कसा असावा

उंबरठा हा नेहमी लाकडाचा असावा. कारण लाकडात नैसर्गिक ऊर्जा शोषून घेण्याची क्षमता आहे. फ्लॅट संस्कृतीत सुद्धा मुख्य दरवाज्याला लहान का होईना पण लाकडी उंबरठा बसवणं शुभ मानलं जातं. उंबरठ्यावर पाऊल न टाकता तो ओलांडूनच प्रवेश करावा अशी प्रथा आहे. आता एकूणच उंबरा किंवा उंबरठा म्हणजे संरक्षण, मर्यादा आणि सकारात्मक उर्जेचे संरक्षण आहे म्हणूनच जर तुमच्या घराला उंबरा नसेल आणि तुम्ही जर वास्तुशास्त्र मानत असाल तर उंबराठा करून घेण्याचा सल्ला वास्तुशास्त्रात दिला जातो.

 

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: घराच्या मुख्य दरवाजाला उंबरठा का ठेवला जातो?

    Ans: वास्तुशास्त्र आणि धार्मिक श्रद्धेनुसार उंबरठा घरात सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत करतो.

  • Que: उंबरठ्याचे धार्मिक महत्त्व काय आहे?

    Ans: उंबरठा हा घराच्या पवित्रतेचे आणि संरक्षणाचे प्रतीक मानला जातो. अनेक ठिकाणी त्यावर हळद-कुंकू लावण्याची परंपरा आहे.

  • Que: मुख्य दरवाजासाठी कोणत्या प्रकारचा उंबरठा योग्य मानला जातो?

    Ans: लाकूड, दगड किंवा संगमरवरी उंबरठा शुभ मानला जातो.

Web Title: Vastu tips the importance and reasons for having a umbartha at the main door of a house

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2026 | 09:40 AM

Topics:  

  • vastu news
  • Vastu Shastra
  • Vastu Tips

संबंधित बातम्या

Vastu Tips: कपाटाच्या वर ठेवलेल्या या वस्तूंमुळे वाढू शकतात आर्थिक समस्या
1

Vastu Tips: कपाटाच्या वर ठेवलेल्या या वस्तूंमुळे वाढू शकतात आर्थिक समस्या

Vastu Tips: अंथरुणावर बसून जेवण केल्याने आरोग्य आणि मानसिक शांततेवर होऊ शकतो परिणाम
2

Vastu Tips: अंथरुणावर बसून जेवण केल्याने आरोग्य आणि मानसिक शांततेवर होऊ शकतो परिणाम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.