फोटो सौजन्य- pinterest
प्रत्येकजण आपल्या जीवनामधील आनंद आणि समृद्धी टिकून राहण्यासाठी काही ना काही प्रयत्न करत असतो. आपलं ध्येय पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत घेत असतो. त्याबरोबरच आपण घेतलेल्या प्रयत्नांना न जुमानता, आपण अपयशी ठरतो. ज्योतिषशास्त्रानुसार, तुमच्या प्रगतीमध्ये येणारे अडथळे हे वास्तूदोषाचे कारण असू शकते. एखाद्या व्यक्तीला आर्थिक अडचणी येत असल्यास किंवा त्याची प्रगती होत नसल्यास त्याचा संबंध घरातील वास्तू दोषाशी संबंधित असू शकतो. जर वास्तुनुसार घराच्या रचनेमध्ये काही दोष असल्यास तुम्हाला अपयश आणि नुकसानाला सामोरे जावे लागू शकते.
वास्तुनुसार, घरामधील रचना किंवा डिझाइनचा परिणाम संपूर्ण घरावर होतो. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते. वास्तूशास्त्रात म्हटल्याप्रमाणे पूर्व आणि उत्तर दिशा ज्या ठिकाणी मिळतात त्या बिंदूला ईशान्य दिशा म्हणतात. घरातील या भागाला ईशान्य कोपरा म्हणतात. वास्तुनुसार, घरामधील या कोपऱ्याला देवता आणि आध्यात्मिक शक्तींचे निवासस्थान मानले जाते. त्यामुळे घरामधील हा कोपरा सर्वांत पवित्र मानला जातो. असे म्हटले जाते की, महादेव देखील ईशान्य दिशेला राहतात. ईशान्य दिशा चुकीची असल्यास अधिक नुकसान होऊ शकते.
जर हा कोन उंचावला असल्यास तुम्हाला आर्थिक नुकसान होऊ शकते. तसेच प्रगतीमध्ये अडथळा देखील येऊ शकतो. ज्यावेळी ईशान्य दिशेची उत्तर बाजूची लांबी कमी होत असते त्यावेळी आर्थिक अडचणीला तुम्हाला सामोरे जावे लागते. ही दिशी जड, अस्वस्थ, कोरडी इत्यादी असल्यास तुमच्या संपत्ती आणि प्रगतीमध्ये वाढ होत नाही.
या दिशेकडील बाजूला शौचालय, गटार किंवा इतर घाण असल्यास आर्थिक समस्या निर्माण होऊ शकतात त्यामुळे प्रगतीमध्ये अडथळा येतो. या दिशेला सेप्टिक टँक असल्यास आर्थिक नुकसान होते. हा दोष दूर करण्यासाठी टाकीचे झाकण लाल रंगाने रंगवल्याने दोषाचा परिणाम दूर होतो.
ईशान्य दिशेला शौचालय असणे अशुभ मानले जाते. हे व्यक्तीचे जीवन उद्ध्वस्त करू शकते. तसेच प्रगतीमध्ये अडथळा आणि आर्थिक नुकसान होऊ शकते. या समस्येवर उपाय म्हणून त्या ठिकाणी आरसा ठेवणे शुभ मानले जाते. या ठिकाणी पाण्याने भरलेले भांडे ठेवावे. माशांचे मत्स्यालय ठेवावे.
या दिशेला पायऱ्या असल्यास तुम्हाला नुकसान होऊ शकते. त्यामुळे कर्जात वाढ होऊन आर्थिक समस्या वाढू शकतात. जर हा कोपरा कापला किंवा कमी केला तर गंभीर आर्थिक संकट येते. या कोपऱ्यामध्ये पायऱ्या, स्वयंपाकघर, कचराकुंडी इत्यादी गोष्टी असल्यास आर्थिक अडचणी कायम राहतात. या दिशेने शौचालय, पायऱ्या किंवा पाण्याची टाकी नसावी.
ही दिशा मोठा, उघडा, हलका, स्वच्छ आणि सुगंधित असावी. बर्फाच्छादित कैलास पर्वतावर ध्यानस्थ अवस्थेत, कपाळावर चंद्र आणि केसांमधून गंगा वाहत असलेले भगवान शिव यांचे चित्र लावावे.
या दिशेच्या नकारात्मक परिणांमापासून वाचण्यासाठी तुम्ही गुरु यंत्र स्थापित करा. एक मोठा आरसा लावावा. अन्नाच्या शोधात उडणाऱ्या पक्ष्यांची चित्रे लावावीत. पाण्याच्या स्रोतांचे आणि त्यांच्या ठिकाणांचे फोटो लावावेत.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)