फोटो सौजन्य- istock
बऱ्याचदा असे वाटते की सौंदर्य आणि मेकअप हे फक्त दिखाव्यासाठी आहेत. मात्र ज्योतिष आणि वास्तूशास्त्रामध्ये प्रत्येक गोष्टीला स्वतःची अशी एक खास ऊर्जा मानली जाते. त्यामुळे महिलांच्या मेकअपच्या साहित्यामध्ये लिपस्टिकच्या रंगांबद्दलही वास्तूशास्त्रात सांगण्यात आलेले आहे. प्रत्येक दिवशी योग्य रंगांची लिपस्टिक लावल्याने तुमच्या नात्यामध्ये गोडवा निर्माण होतो. तसेच पतीच्या प्रत्येक कामामध्ये प्रगती होते. ही गोष्ट थोडी विचित्र वाटू शकते. बऱ्याच वेळा महिला आपल्याला आवडेल त्या रंगांची लिपस्टिक लावतात पण तो रंग योग्य दिवशी लावला तर जीवनामध्ये सकारात्मक घटना घडू शकतात.
ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांच्या उर्जेसाठी आपल्याला रंगांची मदत घेतली पाहिजे. रंग हे फक्त पाहण्यासारखे आपल्या शरीरावर खोलवर परिणाम करतात. लिपस्टिक ही प्रत्येक महिलेच्या दैनंदिन दिनचर्येचा एक भाग आहे, त्यासाठी फक्त तिचा योग्य वापर करणे आवश्यक आहे. आठवड्याच्या सातही दिवस कोणत्या रंगांची लिपस्टिक वापरावी, जाणून घ्या
सोमवारचा दिवस चंद्राला समर्पित आहे. हा ग्रह मन आणि भावनांशी संबंधित आहे. या दिवशी पांढरी किंवा फिकट गुलाबी रंगाची लिपस्टिक लावल्याने पती-पत्नीमधील नात्यात भावनिक बंध मजबूत होतो. यामुळे तणाव कमी होतो आणि घरातील वातावरण शांत राहते.
मंगळवारचा दिवस मंगळ ग्रहांशी संबंधित आहे. हा ग्रह शक्ती, आत्मविश्वास आणि सुरक्षिततेचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे मंगळवारी लाल किंवा मरुन रंगांची लिपस्टिक लावणे शुभ मानले जाते. तसेच महिलांनी या रंगांची लिपस्टिक लावल्याने त्यांच्यामधील आत्मविश्वास वाढतो. तसेच पतीला नोकरी- व्यवसायात लाभ होतो. जर पती संरक्षण, पोलिस किंवा कोणत्याही कार्यक्षेत्रात कार्यरत असल्यास महिलांनी हा रंग वापरणे अतिशय चांगला मानला जातो.
बुध ग्रह ज्ञान, बुद्धी आणि संवादाशी संबंधित मानला जातो. त्यामुळे बुधवारी हिरवा किंवा पीच रंगाची लिपस्टिक वापरल्याने परस्पर संभाषणात गोडवा येतो आणि गैरसमज दूर होतात. त्यामुळे पतीच्या व्यवसायात प्रगतीच्या संधी देखील निर्माण होतात.
गुरुवारचा दिवस गुरु ग्रहाचा मानला जातो हा ग्रह शिक्षण, धर्म आणि आदराचा कारक आहे. या दिवशी पिवळा किंवा हलका सोनेरी रंगांची लिपस्टिक वापरल्याने घरात देवी लक्ष्मीचा वास राहतो आणि पतीला समाजात बढती किंवा आदर मिळण्याची शक्यता वाढते.
शुक्रवार हा शुक्र ग्रहांशी संबंधित आहे. शुक्र ग्रह प्रेम, सौंदर्य आणि आरामाशी संबंधित आहे. या दिवशी गुलाबी किंवा फ्यूशिया रंगाची लिपस्टिक वापरल्याने वैवाहिक जीवनात प्रेम आणि आकर्षण वाढते. हा रंग महिलांसाठी खूप शुभ आहे आणि आर्थिक लाभदेखील मिळवू शकतो.
शनिवारचा दिवस शनि ग्रहाशी संबंधित मानला जातो. शनि देव हा कठोर मेहनत, न्याय आणि स्थिरतेचे प्रतीक आहे. या दिवशी गडद निळा किंवा गडद जांभळ्या रंगांची लिपस्टिक लावल्याने पतीला कामाच्या ठिकाणी स्थिरता आणि सुरक्षितता मिळते. त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा देखील दूर होते.
रविवारचा दिवस सूर्यदेवाला समर्पित आहे. सूर्यदेव हा आत्मविश्वास आणि नेतृत्वाशी संबंधित असल्याने नारंगी किंवा कोरल रंगाची लिपस्टिक लावल्याने तुमच्या मनात सकारात्मक विचार येऊ शकतात आणि तुमच्या पतीला उच्च पदांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळू शकते. अशा लोकांना इतर कामामध्ये यश मिळते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)