फोटो सौजन्य- istock
महालक्ष्मी राजयोग खूप शुभ मानला जातो. त्याच्या प्रभावामुळे व्यक्तीच्या जीवनात धन, समृद्धी आणि यश प्राप्त होते. जेव्हा कुंडलीमध्ये मंगळ आणि चंद्र हे ग्रह दुसऱ्या, अकराव्या, नवव्या किंवा दहाव्या घरात असतात तेव्हा महालक्ष्मी योग तयार होतो. पंचांगानुसार, सोमवार 9 जून रोजी सकाळी 8 वाजून 50 मिनिटांनी चंद्र देव वृश्चिक राशीत संक्रमण करेल या राशीमध्ये तो बुधवार, 11 जून रोजी रात्री 8.10 वाजेपर्यंत राहील. मंगळ ग्रहाने 7 जून रोजी पहाटे 2.28 वाजता सिंह राशीत प्रवेश केला आहे. तर 28 जुलैपर्यंत मंगळ ग्रह तिथेच राहणार आहे. 9 जून रोजी तयार होणाऱ्या महालक्ष्मी योगाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होईल, जाणून घ्या
वृश्चिक राशीमध्ये चंद्राच्या संक्रमणामुळे मंगळ त्यावर दृष्टीक्षेप करणार आहे. यामुळे महालक्ष्मी राजयोग तयार होणार आहे. यावेळी वृश्चिक राशीच्या लोकांना या योगाचा सर्वाधिक फायदा होणार आहे. नोकरी करणाऱ्या लोकांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल होऊ शकतात. तरुणांना नोकरी मिळण्याची शक्यता. त्याचप्रमाणे तुमच्या व्यावसायिक जीवनात संतुलन राहील. या लोकांना व्यवसायात पुढे जाण्यासाठी नवीन संधी उपलब्ध होईल. तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. या पाठिंब्याने तुमचे काम सोपे होईल. या लोकांच्या कुंडलीमध्ये व्यापारी आणि दुकानदारांच्या संपत्तीत वाढ होण्याची शक्यता जास्त आहे. या राशीच्या लोकांना फायदाच फायदा होऊ शकतो.
धनाची देवता मानल्या जाणाऱ्या म्हणजेच देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने या राशीच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होईल. तसेच मालमत्तेत किंवा कोणत्याही ठिकाणी पैसे गुंतवले असल्यास हा दिवस अनुकूल राहील. परंतु दीर्घकालीन गुंतवणूकीला प्राधान्य देणे योग्य ठरेल. तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. त्याचबरोबर घरात आनंदाचे वातावरण राहील. वैवाहिक जीवनात स्थिरता राहील. तुम्ही एखाद्या धार्मिक सहलीचे आयोजन करु शकता. तुमचे आरोग्य उत्तम राहील. व्यायवसायिकांना कठोर मेहनत घ्यावी लागेल.
महालक्ष्मी राजयोगाचा शुभ प्रभाव वृश्चिक आणि धनु राशीच्या व्यक्तिरिक्त मीन राशीच्या लोकांवर पडेल. या लोकांना कलेच्या क्षेत्रामध्ये फायदा होऊ शकतो. ज्या लोकांचा स्वतःचा व्यवसाय आणि दुकान आहे त्या व्यक्तींना वेगवेगळ्या स्त्रोतांमधून पैसे मिळविण्याच्या संधी उपलब्ध होतील. तसेच त्यांची बचत वाढेल. दीर्घकालीन गुंतवणूक करण्यासाठी येणारे तीन दिवस शुभ मानले जातात. याशिवाय या राशीच्या लोकांचे आरोग्य चांगले राहील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)