Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 23 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vastu Tips: छतावर कुंड्या ठेवणे का मानले जाते अशुभ? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या कारणे

घराच्या सजावटीसाठी अनेकजण छतावर झाडांच्या कुंड्या ठेवतात. मात्र, वास्तुशास्त्रानुसार छतावर कुंड्या ठेवणे अशुभ मानले जाते. यामागे नेमकी कोणती कारणे सांगितली आहेत, जाणून घेऊया.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Sep 04, 2026 | 10:15 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • छतावर कुंड्या ठेवणे का मानले जाते अशुभ
  • वास्तुशास्त्रात कोणती कारणे सांगितली आहेत
  • गच्चीवर कोणती झाड ठेवावीत
 

वास्तुशास्त्रामध्ये घरातील प्रत्येक लहान-मोठ्या वस्तूसाठी नियम सांगण्यात आलेले आहे. वास्तुच्या या नियमांकडे दुर्लक्ष केल्यास अनेक समस्या उद्भवू शकतात. घरात ठेवलेल्या सर्व वस्तूंच्या दिशेचा रहिवाशांवर थेट परिणाम होतो. त्यामुळे, वास्तुशास्त्राच्या नियमांकडे लक्ष देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. वास्तुशास्त्रामध्ये घरात झाडे ठेवण्यासंबंधी अनेक महत्त्वाच्या बाबी सांगितल्या आहेत, ज्याकडे लोक अनेकदा दुर्लक्ष करतात. यापैकी एक म्हणजे गच्चीवर झाडे लावणे.

अनेकदा तुमच्या मनात प्रश्न येत असेल की, आपल्या घराच्या छतावर झाडे लावावीत की नाही? छतावर झाडे लावावीत की नाही याबाबत वास्तुशास्त्रात कोणते नियम सांगण्यात आले आहे ते जाणून घ्या

गच्चीवर झाडं लावावीत का?

वास्तुशास्त्रानुसार, छतावर झाडे ठेवणे अशुभ मानले जाते, विशेषतः जर ती कुंडीतील असतील तर. आजकाल, लोक आपल्या छताचे सौंदर्य वाढवण्यासाठी त्यावर विविध प्रकारची झाडे आणि कुंड्या ठेवतात. बरेच जण तर संपूर्ण छताचेच छतावरील बागेत रूपांतर करतात. दरम्यान, वास्तुशास्त्रानुसार छतावर झाडे ठेवण्याबाबत काही नियम आहेत. असे म्हटले जाते की, जर योग्य दिशा आणि संतुलन राखले नाही, तर त्याचा घराच्या ऊर्जेवर आणि कुटुंबाच्या प्रगतीवर परिणाम होऊ शकतो.

Vastu Tips: तुमची ऑफिस बॅग कुठे असते? वास्तूनुसार चुकीच्या जागी ठेवल्यास करिअरवर होऊ शकतो परिणाम

गच्चीचा संबंध राहूशी आहे आणि झाडांचा बुधाशी

ज्योतिषशास्त्रानुसार, घराचे छत राहू ग्रहाशी संबंधित मानले जाते, तर हिरवीगार झाडे आणि वनस्पती बुध ग्रहाशी जोडल्या जातात. बुध ग्रहाला बुद्धिमत्ता, शिक्षण, वाणी आणि हिरवळ यांचा घटक मानले जाते. याउलट, राहू ग्रहाला गोंधळ, अचानक बदल आणि अस्थिरतेशी संबंधित मानले जाते. त्यामुळे, असे मानले जाते की छतावर जास्त झाडे लावल्याने राहू आणि बुध यांच्याशी संबंधित ऊर्जेचा समतोल बिघडू शकतो.

गच्चीचे बागेत रुपांतर करावे का

वास्तूनुसार, जर तुम्हाला तुमचे छप्पर हिरवेगार ठेवायचे असेल, तर त्यावर जास्त कुंड्या ठेवणे टाळावे. विशेषतः मोठ्या आणि जड कुंड्यांची संख्या मर्यादित ठेवण्याचा सल्ला वास्तूशास्त्रात दिला जातो. मोजक्या संख्येतील लहान रोपे तुमच्या छतावरील हिरवळ वाढवू शकतात. जर तुम्हाला तुमच्या छतावर झाडे ठेवायची असतील, तर ती पश्चिमेकडे तोंड करून ठेवणे उत्तम. कुंड्यांची मांडणी व्यवस्थितपणे करण्याचा सल्ला दिला जातो, जेणेकरून छताचा उर्वरित भाग मोकळा आणि प्रकाशमान राहील.

उत्तर आणि पूर्व दिशा

वास्तूशास्त्रामध्ये उत्तर आणि पूर्व दिशांना विशेष महत्त्व दिले जाते. या दिशा प्रकाशमान आणि मोकळ्या ठेवणे शुभ मानले जाते. त्यामुळे त्या ठिकाणी जास्त किंवा जड कुंड्या ठेवणे टाळण्याचा सल्ला दिला जातो. वास्तूशास्त्रानुसार, या दिशांमध्ये जास्त झाडे किंवा जड वस्तू ठेवल्याने घरातील सकारात्मक ऊर्जेच्या प्रवाहावर परिणाम होऊ शकतो. याचा संबंध कौटुंबिक प्रगती, शिक्षण आणि नवीन संधींशी जोडलेला आहे.

Vastu Tips For Roti: रात्री चपातीचा डबा रिकामा ठेवता? थांबा! वास्तुशास्त्रानुसार ‘ही’ गोष्ट ठरू शकते महत्त्वाची

छतावर सुकी झाडे ठेवू नका

तुमच्या छतावर झाडे असतील तर त्यांची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. वाळलेली, कोमेजलेली किंवा खराब झालेली झाडे जास्त काळ तशीच ठेवणे वास्तूशास्त्रानुसार अशुभ मानले जाते. झाडांची वेळोवेळी स्वच्छता आणि छाटणी केली पाहिजे.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Vastu tips why is it considered inauspicious to keep pots on the roof

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2026 | 10:15 AM

Topics:  

  • vastu news
  • Vastu Shastra
  • Vastu Tips

संबंधित बातम्या

Diwali Vastu Tips: दिवाळीच्या साफसफाईदरम्यान या चुका करणे टाळा, जाणून घ्या वास्तूचे नियम
1

Diwali Vastu Tips: दिवाळीच्या साफसफाईदरम्यान या चुका करणे टाळा, जाणून घ्या वास्तूचे नियम

Vastu Tips: फ्रीजची दिशा आणि रंग बदलू शकतात घराचं नशीब? सुख-समृद्धीसाठी जाणून घ्या वास्तुशास्त्राचे नियम!
2

Vastu Tips: फ्रीजची दिशा आणि रंग बदलू शकतात घराचं नशीब? सुख-समृद्धीसाठी जाणून घ्या वास्तुशास्त्राचे नियम!

Vastu Tips: आर्थिक चणचण आणि घरात सतत वाद होत असल्यास वास्तूचे करा हे प्रभावी उपाय
3

Vastu Tips: आर्थिक चणचण आणि घरात सतत वाद होत असल्यास वास्तूचे करा हे प्रभावी उपाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.