Vastu Tips For Roti: रात्री चपातीचा डबा रिकामा ठेवता?(फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
आपल्या घरात स्वयंपाकघर म्हणजे फक्त जेवण बनवायची जागा नाही. आपल्या आजीच्या काळापासून सांगितलं जातं की स्वयंपाकघर म्हणजे घराचं सुख, घराची बरकत. तिथे अन्न आहे तर घरात सगळं काही आहे. म्हणूनच स्वयंपाकघरातल्या प्रत्येक वस्तूला महत्त्व आहे. आपण अन्नाशी कसं वागतो यावरून घरात पैसा टिकतो की नाही हे ठरतं असं जुन्या लोकांचं म्हणणं आहे.
बऱ्याच घरांमध्ये एक सवय असते. रात्री जेवण झालं की पोळ्यांचा डबा म्हणजे कॅसरोल तसाच रिकामा ठेवला जातो. किंवा त्यात एखादी शिळी पोळी असेल तर तशीच रात्रभर ठेवली जाते. सकाळी बघू म्हणून सोडून देतात. पण तुम्हाला माहिती आहे का, रात्री पोळीचा डबा पूर्णपणे रिकामा ठेवणं हे वास्तुशास्त्रानुसार चांगलं मानलं जात नाही. Vastu Tips For Roti:
वास्तुशास्त्रात असं सांगितलं आहे की कोणतंही अन्नाचं भांडं कधीच पूर्णपणे रिकामं ठेवू नये. रिकामं भांडं हे घरात कमतरता आहे असं दाखवतं. म्हणजे घरात अन्न नाही, पैसा नाही अशी भावना तयार होते. देवी अन्नपूर्णा ही अन्नाची देवी मानली जाते. जर तिचं भांडं रिकामं असेल तर ती नाराज होते असं म्हणतात.
त्यामुळे रात्री जेवण झाल्यावर जरी पोळ्या संपल्या असल्या तरी डबा तसाच उघडा आणि रिकामा टाकू नका. त्यात निदान एक तरी पोळी ठेवा किंवा तो डबा स्वच्छ धुवून कोरडा करून बंद करून ठेवा. पण घाणेरडा आणि उघडा कधीच ठेवू नका.असं पण म्हणतात की रिकामी भांडी घरात गरिबी आणतात. जिथे अन्न भरलेलं असतं तिथे नेहमी लक्ष्मीचा वास असतो. म्हणूनच पूर्वीच्या बायका धान्याचे डबे कधीच रिकामे होऊ देत नव्हत्या.मग रात्री काय करावं?
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)






