Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Weekly Tarot Horoscope : धनसंपत्तीत होणार वाढ, सरत्या वर्षात येतोय लक्ष्मीयोग , ‘या’ राशींसाठी येणार सोन्याचे दिवस

सरत्या वर्षात मंगळ आणि चंद्राच्या युतीमुळे लक्ष्मीयोग तयार होत आहे. हा योग सर्वात शुभ असून काही राशीच्या आर्थिक समस्या पूर्णत: संपुष्टात येण्यार असल्याचं सांगितलं जात आहे. कोणत्या आहे या राशी ज्यांचं भाग्य आता उजळणार आहे

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Dec 16, 2025 | 07:38 PM
Weekly Tarot Horoscope : धनसंपत्तीत होणार वाढ, सरत्या वर्षात येतोय लक्ष्मीयोग , ‘या’ राशींसाठी येणार सोन्याचे दिवस
Follow Us
Close
Follow Us:
  • धनसंपत्तीत होणार वाढ,
  • ‘या’ राशींसाठी येणार सोन्याचे दिवस
बारा राशीच्या बारा गोष्टी. डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्य़ात म्हणजे 15 ते 21 डिसेंबर या काळात लक्ष्मीयोग घडत असून या योग बारा राशीना संमिश्र ते शुभफळ देणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात तयार होणारा लक्ष्मीयोग हा आर्थिक समस्य़ा मिटवणारा आहे. टॅरो कार्डच्या अभ्यासानुसार हा काळ अत्यंत शुभ आहे. त्यामुळे हा आठवडा बारा राशींसाठी काय शुभ फळ देणार आहे याबाबात जाणून घेऊयात.

मेष

या आठवड्यात तयार होणारा लक्ष्मीयोग मेष राशीच्या व्यक्तींना मेहनतीचं फळ देणारं आहे. व्यवसाय आणि नोकरदार वर्गासाठी हा आठवडा शुभदायी असणार आहे.वरिष्ठांकडून तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल. करियर नोकरीबाबत कोणताही निर्णय घेताना काळजीपुर्वक घ्या. आता घेतलेला निर्णय तुमच्या येणाऱ्या काही दिवसांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे वागण्यात संयम ठेवणं गरजेचं आहे.

वृषभ (Taurus Zodiac)

स्थावर किंवा जंगम मालमत्तासंबंधित वृषभेच्या मंडळींसाठी हा काळ अनुकूल असणार आहे. जमिनीसंबंधित एखादा करार तुम्हाला आर्थिक फायदा देऊ शकतो. विद्यार्थ्याना करिअरबाबत हा आठवडा शुभ आहे. तुमच्या करियरला नवं वळण मिळणार असून गोंधळलेल मन निर्णय घेण्यास सक्षम होईल. नोकरदार वर्गाा देखील हा आठवडा प्रगतीशील आहे. तुमची आर्थिक स्थिती सुधआरण्यास मदत होईल.

मिथुन (Gemini Zodiac)

मिथुन राशीसाठी हा आठवडा काहीसा संमिश्र असणार आहे. कामाच्या ठिकाणी काही किरकोळ अडथळ निर्माण होऊ शकतात. मात्र संयम आणि संतुलित वागणुकीमुळे ताण हलका होईल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी सावधगिरीने वागावं. आठवड्याच्या मध्यामपर्यंत परिस्थितीत सुधारणा होईल.

कर्क (Cancer Zodiac)

लक्ष्मीयोगामुळे कर्क राशीच्या मंडळीना कौटुंबिक शांतता लाभणार आहे. कौटुंबिक नातेसंबंधात सकारात्मक बदल घडून येतील. कामाच्या ठिकाणी मात्र सहकाऱ्यांबरोबर वाद होण्याची शक्यता आहे. कामाच तणाव निर्माण होत असला तरी तुमच्या शांत राहण्याने वाद मिटतील.

सिंह (Leo Zodiac)

कामाचं कौतुक होईल. गुप्त शत्रू तुमच्या कामात अडथळे आणतील मात्र तुमच्या वागणूकीने तुम्ही वरिष्ठांचं मन वळवण्यात यशस्वी व्हाल. आरोग्याच्या किरकोळ तक्रारी जाणवतील. तब्येतीची काळजी घ्या. आर्थिक बाबतीत विचार करुन केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. मित्रपरिवाराशी गाठीभेटी होतील.

Numerology: या मूलांकांच्या लोकांना जुन्या गुंतवणुकीतून होईल फायदा

कन्या (Virgo Zodiac)

हा आठवडा यश प्राप्तीचा आहे. कामाच्या ठिकाणी नव्या प्रकल्पातून तुम्हाला चांगले अनुभव मिळतील. सहकऱ्यांचा पाठींबा मिळेल. आर्थिक बाबातीला हा काळ अनुकूल असणार आहे. कौैटुंबिक स्थिती साकारात्मक राहणार आहे.

तूळ (Libra Zodiac)

आयुष्यात साकारात्मक बदल दिसून येतील. कामाच्या ठिकाणी आत्मविश्वास वाढेल. तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा कराल. कामाच्या ठिकाणी मिळणाऱ्य़ा संधीचं सोनं कराल.

वृश्चिक (Scorpio Zodiac)

हा आठवडा तुम्हाला तब्येतीची काळजी घ्यावी लागणार आहे. मानसिक ताण वाढल्याने शारीरिक थकवा जाणवेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या विरोधात कट रचले जाणार आहेत. वैयक्तिक आयुष्यात जोडीदाराबरोबरचे मतभेद टाळा. हा आठवडा करिअर आणि नातेसंबंधाबाबत सामान्य राहणार आहे.

धनु (Sagittarius Zodiac)

कोर्ट कचेरीत निकाल तुमच्या बाजूने लागतील. विरोधकांना प्रभाव कमी होणार आहे. आर्थिक स्थिती सुधारणार असून कर्जाचा ताण हलका होणार आहे. पैशांची आधी केलेली गुंतवणूक आता फायदेशीर ठरेल.

मकर (Capricorn Zodiac)

धावपळ दगदग वाढणार आहे, त्यामुळे तब्येतीची काळजी घ्यावी. कुटुंबात वाद निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे मन आणि मेंदू शांत ठेवा. करिअरसंबंधित चांगली बातमी मिळू शकते. सकारात्मक दृष्टीकोन मानसिक संतुलन राखण्यास मदत करेल.

कुंभ (Aquarius Zodiac)

सामाजिक मान प्रतिष्ठा वाढणार आहे. आत्मविश्वासाने विरोधकांना तोंड द्याल. कुंभ राशीच्य़ा व्यक्तींना हा काळ संंमिश्र असणार आहे. वरिष्ठांकडून कामाचं कौतुक होईल.

मीन (Pisces Zodiac)

मित्र वर्गाकडून सहकार्य लाभेल. आर्थिक स्थितीचं सुधारणा दिसेल. विरोधकांच्या अडचणींमुळे ताण जाणवले म्हणूनच मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या. या आठवड्यात तब्येतीची काळजी घ्या.

Numerology: ‘या’ मूलांकांच्या लोकांच्या आर्थिक उत्पन्नात होईल वाढ

( येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोककथांवर आधारित आहे. यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. नवराष्ट्र डिजीटल यापैकी कोणत्याही विधानाची सत्यता प्रमाणित करत नाही.)

 

 

Web Title: Weekly tarot horoscope wealth will increase lakshmi yoga is coming in the new year golden days will come for twelve zodiac signs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 16, 2025 | 07:38 PM

Topics:  

  • hindu religion
  • other zodiac signs

संबंधित बातम्या

Jagannath Temple Birds : भविष्यातील संकटाची चाहूल; जगन्नाथ मंदिरावर पक्षांचे थवे, भाकित खरं ठरणार ?
1

Jagannath Temple Birds : भविष्यातील संकटाची चाहूल; जगन्नाथ मंदिरावर पक्षांचे थवे, भाकित खरं ठरणार ?

Vastushanti 2026 : नववर्षात गृहप्रवेश करायचाय ? मुहुर्त शोधताय; ‘हा’ काळ आहे अत्यंत शुभ, जाणून घ्या तारखांची यादी
2

Vastushanti 2026 : नववर्षात गृहप्रवेश करायचाय ? मुहुर्त शोधताय; ‘हा’ काळ आहे अत्यंत शुभ, जाणून घ्या तारखांची यादी

400 वर्षांचं रहस्य; नवसाला पावणारी भराडी देवी, आंगणेवाडीच्या जत्रेचं काय आहे वैशिष्ट्यं ?
3

400 वर्षांचं रहस्य; नवसाला पावणारी भराडी देवी, आंगणेवाडीच्या जत्रेचं काय आहे वैशिष्ट्यं ?

Astro Tips : अशुभ काळ सुरु होतोय ; खरमासमध्ये कशी घ्याल स्वत: ची काळजी?
4

Astro Tips : अशुभ काळ सुरु होतोय ; खरमासमध्ये कशी घ्याल स्वत: ची काळजी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.