
फोटो सौजन्य- chatgpt
भारतीय संस्कृती ही कृतज्ञताला जास्त प्राधान्य देते. आपण निसर्गाकडून जे जे घेतो त्याचं मनमोकळेपणाने दैवी नाते जोडून त्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. कारण यातून संस्कारमुल्य जोपासले जातात. धरती ही आपली माता आहे आणि त्यांच्यावर आपला संपूर्ण भार आहे. तिच्यामुळे मी सुरक्षित आहे. या भावनेतून कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर काराग्रे वसते लक्ष्मी म्हणत आपण हातांमधील लक्ष्मी, गोविंदाचे दर्शन घेतो. त्यानंतर भूमीचे दर्शन घेतले पाहिजे, यामागे काय सांस्कृतिक भाव आहेत ते जाणून घेऊया
सकाळी उठल्याबरोबर भूमीला (जमिनीला) नमस्कार करण्याची भारतीय संस्कृतीमध्ये एक महत्त्वाची परंपरा आहे. यामागे धार्मिक, आध्यात्मिक आणि कृतज्ञतेची भावना आहे: कृतज्ञता व्यक्त करणे: आपण ज्या जमिनीवर राहतो, जी आपल्याला अन्न, पाणी आणि निवारा देते, त्या भूमीमातेचे आभार मानण्यासाठी नमस्कार केला जातो.
आपण दिवसभरात चालताना, काम करताना भूमीवर पाय ठेवतो. नकळत होणाऱ्या या कृत्यासाठी भूमीमातेची क्षमा मागण्यासाठी सकाळी नमस्कार करतात. यामुळे एक सकारात्मक ऊर्जा मिळते. सकाळी उठून भूमीला स्पर्श करून नमस्कार केल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते आणि दिवसाची सुरुवात चांगली होते. असे म्हणतात की, सकाळी सुरुवात चांगली झाली म्हणजेच जर दिवसाची सुरुवात कृतज्ञतेने आणि प्रार्थना करून केली, तर संपूर्ण दिवस आनंदात आणि तणावमुक्त जातो.
“समुद्रवसने देवि पर्वतस्तनमंडले, विष्णुपत्नि नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे।”
हे समुद्राचे वस्त्र परिधान केलेल्या, पर्वतांचे स्तन असलेल्या आणि विष्णूची पत्नी (भूमी माता), मी तुम्हाला नमस्कार करतो/करते.
आजकाळात हा संस्कार ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. संस्कारमूल्य टिकवणे हे आपले कर्तव्य आहे. वर जरी हे छोटे, छोटे संस्कार वाटत असले तरी यामुळे येणाऱ्या पिढीला याचा मोठा फायदा होणार आहे. ‘बेड टी’च्या जमान्यात काहींना हे कदाचित हे बुरसटलेले संस्कार वाटतील. पण येणाऱ्या पिढी संस्कारमय घडवायची असेल. पाश्चात्यांच्या अंधानुकरणापासून वाचावायचे असेल तर सकाळी उठल्यावर भूमातेला नमस्कार करणे गरजेचे आहे.
पुराणात असे वर्णन आहे की, शेष नागाने पृथ्वीवर स्वतःच्या मस्तकावर धारण केले आहे. एकदा शेषनागाला विचारण्यात आले की तुला या धरित्रीचे, तिच्यावर असलेल्या पर्वतांचे किंवा वृक्ष वनस्पतींचे ओझे वाटत नाही? शेष नागाने खूपच मार्मिक उत्तर दिले आहे.
न भूमिपर्वतांनां न च मे भारो वनस्पते|
विष्णुभक्तिर्विहीनस्य तस्य बायो सदा मम||
विष्णूपत्नी पृथ्वी , विष्णुभक्ति न करणाऱ्या मानवावर का खुश होईल? कृतज्ञतेने भूमिपूजन किंवा भावाने विष्णूभक्ति न करणारा माणूस पृथ्वीवर भाररूप बनून फिरतो. त्यासाठी म्हणता येईल की,
ते मर्त्यूलोके भुविभारभूता मनुष्यरूपेण मृगाश्चरन्ति…
भूमिपूजनाच्या मागे कृतज्ञतेनचे प्रगटीकरण, भावजीवनाची स्थापना, सुगंधी जीवनाचे सतत चिंतन आणि क्षमा याचनेचा भाव आहे..
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: धर्मशास्त्रानुसार पृथ्वी ही “माता” मानली जाते. ती आपल्याला अन्न, पाणी आणि निवारा देते. त्यामुळे तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नमस्कार केला जातो.
Ans: हिंदू धर्मात पृथ्वीला “भूमीदेवी” आणि भगवान विष्णूची पत्नी मानले जाते. त्यामुळे सकाळी तिचे स्मरण केल्याने पुण्य मिळते आणि दिवस शुभ मानला जातो.
Ans: दिवसभर आपण चालताना, काम करताना नकळत पृथ्वीवर पाय ठेवतो. या कृत्यासाठी क्षमा मागणे हा नम्रतेचा आणि संस्कारांचा भाग आहे.