Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Saibaba story: शामाला डसलेल्या सर्पाचे विष साईंनी कसे काढले, काय आहे कथा जाणून घ्या

शिर्डीच्या साईबाबांच्या जीवनात अनेक चमत्कारिक कथा आहेत त्यापैकी एक म्हणजे शामा यांना सर्पदंश झाल्याची कथा विशेष प्रसिद्ध आहे. साईबाबांनी आपल्या दिव्य सामर्थ्याने आणि कृपादृष्टीने शामाचे प्राण वाचवले, अशी भक्तांची श्रद्धा आहे. नेमकी काय आहे ही कथा जाणून घेऊया

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jun 25, 2026 | 12:43 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • शामाला डसलेल्या सर्पाचे विष साईंनी कसे काढले
  • साईंचे कोणते चमत्कार प्रसिद्ध आहेत
  • शामाला साईबाबांनी सर्पदंशातून वाचवण्याची कथा
शिर्डीचे साईबाबा हे आपल्या भक्तांवरील अपार प्रेम, करुणा आणि चमत्कारिक लीलांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग आजही भक्तांच्या श्रद्धेला बळ देतात. अशाच एका प्रसिद्ध कथेत साईबाबांचे परमभक्त माधवराव देशपांडे उर्फ शामा यांना विषारी सर्पाने दंश केला होता. त्या वेळी साईबाबांनी आपल्या कृपाशक्तीने त्यांचे प्राण वाचवले, अशी भक्तांची श्रद्धा आहे.

शामा हे साईबाबांचे अत्यंत जवळचे आणि एकनिष्ठ भक्त

शामा हा साईबाबांचा एकनिष्ठ भक्त होता. साईबाबा नेहमी म्हणायचे ते आणि शामा अनेक जन्मांपासून एकमेंकाशी जोडलेले आहेत. एकदा संध्याकाळी शामाला एका विषारी सापाने बोटाला दंश केला. सापाच्या दंशाचा हळूहळू परिणाम होऊ लागता शामा वेदनेने ओरडू लागला मृत्यू जवळ आला आहे या विचाराने त्याची भीती अधिकच वाढली. शामाची ही अवस्था पाहून त्याच्या मित्रांनी त्याला विठ्ठोबा मंदिरात घेऊन जायचं ठरवलं. हे मंदिर शिर्डीजवळ होतं. जिथे सर्पदंश झालेल्यांना अशा वेदनांपासून मुक्ती मिळावी म्हणून नेलं जात असे. पण शामा आपल्या साईबाबांना भेटण्यासाठी मशिदीच्या दिशेने धावला.

Tirupati Balaji Temple: तिरुपती बालाजी मंदिरात अखंड तेवतो ‘हा’ दिवा, काय आहे यामागील रहस्य जाणून घ्या

बाबांचा राग शांत झाला आणि त्यांनी शामाला जवळ बोलावले

जेव्हा साईबाबांनी शामाला दुरून येताना पाहिलं तेव्हा ते रागाने गर्जना करून म्हणाले, हे ब्राम्हणा तिथेच थांब सावध राहा. जर तू वर चढून येत असशील तर तिथेच राहा, खाली उतर. साईबाबांचा राग पाहून आणि त्यांचे शब्द ऐकून शामा आश्चर्यचकित झाला. तो बाबांना आपल्या जीवनाचा आधारस्तंभ मानत असे. म्हणून तो पूर्णपणे निराश होऊन तिथे बसला. थोड्यावेळाने जेव्हा बाबांचा राग शांत झाला आणि ते शांत झाले तेव्हा शामा जाऊन बाबांच्या बाजूला बसला त्याचे डोळे पाण्याने भरलेले होते. साईबाबा त्याला म्हणाले शामा घाबरू नको काळजी करण्यासारखे काहीच नाही. सरळ घरी जा शांत बस पण बाहेर जाऊ नकोस. माझ्यावर विश्वास ठेव आणि तुझी चिंता सोडून दे. मशिदीतला फकीर खूप दयाळू आहे तो तुला मरू देणार नाही. शामाला हायस वाटलं. शामाला घरी पाठवल्यानंतर बाबांनी तात्या आणि काकांना त्याच्या घरी पाठवलं. त्यांनी सांगितलं त्याने त्याला जे हवं ते खाव प्याव आणि घरात फिराव अजिबात झोपू नये. म्हणजे जागं राहावं.

Sai Baba: साईंनी 3 दिवस त्यागले होते शरीर, काय आहे यामागील कथा जाणून घ्या

दुसऱ्या दिवशी सकाळी तो पूर्णपणे बरा झाला

बाबाचं प्रेम पाहून शामा निश्चिंत झाला आणि त्याने बाबांच्या आज्ञेचं काटेकोरपणे पालन केलं आणि सकाळपर्यंत जणू काही त्याचा पुर्नजन्मच झाला होता तो सकाळपर्यंत ठणठणीत बरा झाला होता. बाबांचे बाहेर ये खाली उतर हे शब्द शामाला उद्देशून नव्हते तर ते त्या सापाला आणि त्याच्या विषाला उद्देशून होते. तेव्हाचे ते विष निष्प्रभ झाले होते. बाबांनी असे हजारो चमत्कार केले आणि आपल्या भक्ताला साथ दिली.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: शामा कोण होते?

    Ans: शामा म्हणजेच माधवराव देशपांडे हे शिर्डीच्या साईबाबांचे अत्यंत जवळचे आणि एकनिष्ठ भक्त होते.

  • Que: शामाला सर्पदंश कधी झाला होता?

    Ans: एकदा संध्याकाळच्या वेळी शामाला विषारी सापाने बोटाला दंश केला होता, अशी साईचरित्रातील प्रसिद्ध कथा आहे.

  • Que: या कथेचा मुख्य संदेश काय आहे?

    Ans: गुरूवरील श्रद्धा, संकटकाळात धैर्य आणि साईबाबांच्या कृपेवरील विश्वास यामुळे मोठ्या संकटांवर मात करता येते, हा या कथेचा मुख्य संदेश आहे.

Web Title: Sai baba story how sai removed the venom from the snake that bit shama

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2026 | 09:40 AM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • shirdi

संबंधित बातम्या

Silver Toe Ring: चांदीची जोडवी महिला का घालतात? राहू-केतूशी काय आहे संबंध, जाणून घ्या
1

Silver Toe Ring: चांदीची जोडवी महिला का घालतात? राहू-केतूशी काय आहे संबंध, जाणून घ्या

Anant Chaturdashi 2026: अनंत चतुर्दशीच्या दिवशी १४ गाठींचा अनंत धागा बांधण्याचे काय आहे महत्त्व
2

Anant Chaturdashi 2026: अनंत चतुर्दशीच्या दिवशी १४ गाठींचा अनंत धागा बांधण्याचे काय आहे महत्त्व

Chanakya Niti: ‘या’ ५ प्रकारच्या लोकांपासून ठेवा अंतर, आजच ओळखा हे संकेत
3

Chanakya Niti: ‘या’ ५ प्रकारच्या लोकांपासून ठेवा अंतर, आजच ओळखा हे संकेत

Budh Nakshatra Parivartan: २१ सप्टेंबरनंतर बुधाचे नक्षत्र परिवर्तन; ‘या’ राशींच्या लोकांच्या आर्थिक स्थितीत होणार सुधारणा
4

Budh Nakshatra Parivartan: २१ सप्टेंबरनंतर बुधाचे नक्षत्र परिवर्तन; ‘या’ राशींच्या लोकांच्या आर्थिक स्थितीत होणार सुधारणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.