Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 25 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jyotiba: ज्योतिबाच्या यात्रेतील सासनकाठी परंपरा नेमकी काय ते जाणून घ्या

महाराष्ट्रातील प्रसिद्ध ज्योतिबा मंदिर. यात्रेमधील सर्वात आकर्षण ठरणारी आणि ऐतिहासिक परंपरा म्हणजे सासनकाठी. या सासनकाठ्या केवळ धार्मिक प्रतीक नसून त्या गावांच्या मान-सन्मान, श्रद्धा आणि सामूहिक एकतेचे प्रतीक मानले जाते.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: May 10, 2026 | 09:40 AM
फोटो सौजन्य- chatgpt

फोटो सौजन्य- chatgpt

Follow Us
Follow Us:
  • ज्योतिबाच्या यात्रेतील सासनकाठी परंपरा
  • सासनकाठी म्हणजे काय
  • सासनकाठीचा इतिहास आणि वैशिष्ट्ये
 

 

महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील ज्योतिबा डोंगरावरील ज्योतिबाची यात्रा ही राज्यातील अत्यंत प्रसिद्ध धार्मिक यात्रांपैकी एक मानली जाते. दरवर्षी चैत्र पौर्णिमेला लाखो भाविक “चांगभलं!”च्या जयघोषात गुलाल उधळत ज्योतिबाच्या दर्शनासाठी येथे येतात. या यात्रेचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे सासनकाठी परंपरा. उंच, आकर्षक आणि सजवलेल्या या सासनकाठ्या भक्तांच्या श्रद्धेचे आणि गावांच्या मान-सन्मानाचे प्रतीक मानल्या जातात.

श्री क्षेत्र ज्योतिबा मंदिर येथे निघणाऱ्या यात्रेत सासनकाठी हा अत्यंत मानाचा आणि पारंपरिक भाग मानला जातो. सासनकाठी ही कोल्हापूरच्या श्री क्षेत्र ज्योतिबा चैत्र यात्रेतील अत्यंत प्राचीन आणि महत्त्वाची परंपरा आहे ती केदारनाथचा विजयध्वज मानली जाते. हजारो भाविकांच्या उपस्थितीत ही काठी वाजतगाजत ज्योतिबा डोंगरावर आणली जाते. चैत्र यात्रेदरम्यान हजारो भाविक गुलाल उधळत “चांगभलं!”च्या जयघोषात सासनकाठ्या घेऊन सहभागी होतात.

Jyotiba story: ज्योतिबा आणि गुलाल यांचं नातं आहे खूप खास, जाणून घ्या यामागील कारण

सासनकाठी म्हणजे काय

सासनकाठी ही उंच बांबू किंवा लाकडी काठी असते. तिच्यावर रंगीत कापड, पेटे, चांदीचे अलंकार, नारळ किंवा धार्मिक चिन्हे लावलेली असतात. प्रत्येक सासनकाठी एखाद्या गावाचं, घराण्याचं किंवा पारंपरिक मानकरी कुटुंबाचं प्रतिनिधित्व करते.
असा मान का दिला जातो तर पूर्वी ज्योतिबाच्या सेवेसाठी किंवा युद्ध काळात मदत करणाऱ्या गावांना आणि त्या घराण्यांना मान दिला गेला.

सासनकाठीचे वैशिष्ट्य

अशी लोकश्रद्धा आहे की, काही मान पिढ्यान् पिढ्या चालत आलेले असतात आणि त्यालाच मोठा सन्मान मानला जातो. यात्रेत सासनकाठी पुढे नेण्याचा अधिकार हा प्रतिष्ठेचा विषय असतो. यात्रेत 98 सासनकाठ्याचा मान असून सातारा जिल्ह्यातील पाडळी गावाला पहिला तर विहे आणि डिग्रज गावच्या काठीला पुढचा मान आहे. किवळ गावाची सातवी मालाची सासनकाठी जी पूर्वापार चालत आलेल्या वाटेने म्हणजेच सैदापूर-चापेफळ या डोंगरावर येते. तिची परंपरा नावजीनाथ पूर्वजांपासून चालत आलेली आहे. या काठ्या 30 ते 40 फुटांवरून अधिक उंच असतात. त्या सांभाळणं आणि नाचवतं नेणं हे कौशल्याचं काम मानलं जातं. हे ज्योतिबा यात्रेचं खास वैशिष्ट्य आहे. सासनकाठी ही संरक्षण, रक्षण आणि भक्तीच प्रतीक मानलं जातं. ज्योतिबाच्या दर्शनासोबत सासनकाठीचं दर्शनही शुभ मानलं जातं. ज्योतिबाची यात्रा ही महाराष्ट्रात सर्वांत रंगतदार आणि लोकपरंपरा जपणाऱ्यांपैकी एक आहे.

Jyotiba story: ज्योतिबाच्या नावानं चांगभलं! अनेकांचे कुलदैवत असणाऱ्या ज्योतिबाची कथा

सासनकाठी परंपरेचा इतिहास

ही परंपरा अनेक शतकांपासून सुरू असल्याचे मानले जाते. पूर्वी गावोगावी देवस्थानांशी संबंधित मानाच्या वस्तू यात्रेत आणण्याची परंपरा होती. त्यातूनच सासनकाठीची परंपरा विकसित झाली. “सासन” या शब्दाचा अर्थ अधिकार किंवा मान असा घेतला जातो. त्यामुळे सासनकाठी म्हणजे गावाला मिळालेला धार्मिक मान आणि देवाप्रती असलेली निष्ठा असे मानले जाते. काही ठिकाणी या परंपरेचा संबंध मराठा काळाशीही जोडला जातो.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: सासनकाठी म्हणजे काय?

    Ans: सासनकाठी ही यात्रेत नेली जाणारी उंच सजवलेली काठी असून ती गावाच्या श्रद्धा, मान आणि परंपरेचे प्रतीक मानली जाते.

  • Que: ज्योतिबाच्या यात्रेत सासनकाठीचे महत्त्व काय आहे?

    Ans: सासनकाठी ही गावाच्या धार्मिक मानाची आणि भक्तीभावाची ओळख मानली जाते

  • Que: सासनकाठी परंपरेचा इतिहास किती जुना आहे?

    Ans: ही परंपरा अनेक शतकांपासून सुरू असल्याचे मानले जाते आणि ती महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा भाग आहे.

Web Title: What exactly is the tradition of sasanakathi during jyotiba journey

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 10, 2026 | 09:40 AM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • religions

संबंधित बातम्या

Vat Purnima 2026: वटपौर्णिमेला चुकूनही नेसू नका या रंगांची साडी, जाणून घ्या ज्योतिषशास्त्रीय आणि धार्मिक नियम
1

Vat Purnima 2026: वटपौर्णिमेला चुकूनही नेसू नका या रंगांची साडी, जाणून घ्या ज्योतिषशास्त्रीय आणि धार्मिक नियम

Sant Eknath Maharaj: ‘वासुदेव आला रे…’ या परंपरेमागे कोण होते? जाणून घ्या संत एकनाथ महाराजांचे योगदान
2

Sant Eknath Maharaj: ‘वासुदेव आला रे…’ या परंपरेमागे कोण होते? जाणून घ्या संत एकनाथ महाराजांचे योगदान

Dattatreya Paduka: दत्तसंप्रदायातील पादुकांचे महत्त्व काय? जाणून घ्या श्रद्धा आणि परंपरा
3

Dattatreya Paduka: दत्तसंप्रदायातील पादुकांचे महत्त्व काय? जाणून घ्या श्रद्धा आणि परंपरा

Nirjala Ekadashi 2026: निर्जला एकादशीच्या दिवशी संध्याकाळी या दिशेला लावा दिवा, संपत्तीमध्ये होईल अपेक्षित वाढ
4

Nirjala Ekadashi 2026: निर्जला एकादशीच्या दिवशी संध्याकाळी या दिशेला लावा दिवा, संपत्तीमध्ये होईल अपेक्षित वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.