फोटो सौजन्य- pinterest
खग्रास सूर्यग्रहणाला सोलर इलिप्स असे म्हणतात. जेव्हा चंद्र, सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो आणि चंद्राची सावली पृथ्वीवरती पडते तेव्हा हे सूर्यग्रहण होतं. चंद्राचा आकार सूर्याला पूर्णपणे झाकतो आणि काही काळासाठी सूर्याचा तेजस्वी भाग दिसेनासा होतो.
आता हे पाहतानाही काळजी घ्यायला हवी. सूर्याकडे नुसत्या डोळ्यांनी किंवा साध्या गॉगल्सने संध्यासेस मधून पाहू नये. योग्य प्रमाणित सोलर फिल्टर आणि ग्रहन शस्त्राचा वापर करणं आवश्यक आहे. विशेषतः दुर्मिळ किंवा कॅमेऱ्यातून सूर्य पाहताना योग्य फिल्टर नसल्यास डोळ्यांना गंभीर अशी इजा होऊ शकते.
हे ग्रहण दुपारी 3 वाजून 34 मिनिटांनी सुरू होणार आहे. या ग्रहणाची खग्रास अवस्था 4 वाजून 48 मिनिटांनी सुरू होणार आहे. तर खग्रास ग्रहणाची अवस्था समाप्ती ही 6 वाजून 34 मिनिटांनी होणार आहे तर ग्रहण पूर्णपणे समाप्तीचा वेळ आहे तो म्हणजे संध्याकाळी 7 वाजून 58 मिनिटं. पण हे सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही आहे.
तर खग्रास सूर्यग्रहण दिसणारे प्रमुख देश म्हणजे उत्तर रशिया, ग्रीनलॅड, आईसलॅडचा काही भाग, उत्तर आणि पूर्व स्पेन आणि पोर्तुगालचा ईशान्यकडील अतिशय छोटा भाग इथूनच हे ग्रहण दिसणार आहे. त्यामुळेच धार्मिकदृष्ट्या वेध पाळायचे की नाही असा प्रश्न अनेकांना पडलाच असेल.
भारतीय परंपरेनुसार सूर्यग्रहणाशी वेध आणि सूतक या संकल्पना जोडलेल्या आहेत मात्र ग्रहण भारतातून दिसत नसल्यामुळे भारतात वेध पाळायचे की नाही याबाबत पंचांग आणि धार्मिक परंपरानुसार मतभेद असू शकतात. त्यामुळे हा भाग धार्मिक परंपरेचा विषय आहे. जो खगोलशास्त्रीय घटनेपेक्षा वेगळा आहे.
सूर्यग्रहण ही सूर्य, चंद्र आणि पृथ्वी यांच्या परस्पर स्थितीमुळे घडणारी खगोलशास्त्रीय घटना आहे. तर वेध, सूतक, पूजा-विधी आणि धार्मिक नियम हे श्रद्धा व परंपरेशी संबंधित आहेत. त्यामुळे सूर्यग्रहणाकडे वैज्ञानिक आणि धार्मिक अशा दोन्ही दृष्टिकोनातून पाहिले जाते. वैज्ञानिकदृष्ट्या ग्रहणाची वेळ, मार्ग आणि दृश्यता निश्चित केली जाते, तर धार्मिक आचार हे संबंधित परंपरेनुसार ठरतात.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येऊन सूर्याचा संपूर्ण तेजस्वी भाग झाकतो, तेव्हा त्याला खग्रास सूर्यग्रहण म्हणतात.
Ans: उत्तर रशिया, ग्रीनलँड, आइसलँडचा काही भाग, उत्तर व पूर्व स्पेन आणि पोर्तुगालच्या ईशान्येकडील काही भागातून ते दिसणार आहे.
Ans: भारतीय परंपरेत सूर्यग्रहणाशी वेध आणि सूतक या संकल्पना जोडलेल्या आहेत. मात्र ग्रहण भारतातून दिसत नसल्यास हे नियम पाळण्याबाबत पंचांगानुसार मतभेद असू शकतात.






