Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 15 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jyotiba: दख्खनचा राजा ज्योतिबाला खिचडीचा नैवेद्य अर्पण करण्याची काय आहे परंपरा, जाणून घ्या

महाराष्ट्रातील कोल्हापूर परिसरात वसलेले दख्खनचा राजा ज्योतिबा हे लाखो भक्तांचे श्रद्धास्थान मानले जाते. इतर धार्मिक प्रसंगी ज्योतिबाला खिचडीचा नैवेद्य अर्पण करण्याची परंपरा विशेष भक्तिभावाने पाळली जाते. खिचडी अर्पण करण्याची काय आहे परंपरा जाणून घेऊया

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: May 17, 2026 | 10:30 AM
फोटो सौजन्य- chatgpt

फोटो सौजन्य- chatgpt

Follow Us
Follow Us:
  • ज्योतिबाला खिचडीचा नैवेद्य दाखवण्याची काय आहे परंपरा
  • खिचडीचा नैवेद्य दाखवण्यामागील श्रद्धा
  • चैत्र पौर्णिमा यात्रेचे महत्त्व
 

ज्योतिबाला दिवसभरात वेगवेगळे नैवेद्य दाखवले जातात. पण श्री क्षेत्र ज्योतिबा वाडी रत्नागिरी येथे दरवर्षी महाशिवरात्री आणि चैत्र पौर्णिमेच्या काळात लाखो भाविकांच्या उपस्थितीत डोंगवरावरती खिचडीचा सण साजरा होतो. या काळात भाविक ज्योतिबांच्या दर्शनासाठी येतात आणि डोंगरावरती येऊन खिचडी बनवून देवाला अर्पण करतात. खिचडी अर्पण करण्याची परंपरा जाणून घेऊया

भाविक नवस आणि परंपरेनुसार खिचडीचा प्रसाद

श्री क्षेत्र ज्योतिबा मंदिरात चैत्र पौर्णिमा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या यात्रेत भाविक मोठ्या प्रमाणावर हजेरी लावतात. अनेक भाविक आपली नवस्मृती म्हणून किंवा परंपरेनुसार डोंगरावरती खिचडीचा प्रसाद तयार करतात. सामुदायिक पद्धतीने ही खिचडी बनवली जाते. डोंगरावरील मोकळ्या जागी एकत्र येऊन तांदूळ, डाळ आणि विविध भाज्या या साहित्यांचा वापर करून चुलीवरती खिचडी बनवली जाते. तयार झालेली खिचडी प्रथम ज्योतिबा देवाला नैवेद्य म्हणून दाखवले जाते. त्यानंतर भाविक हा प्रसाद ग्रहण करतात. विशेष म्हणजे भाविकांची कितीही गर्दी असली तरी एकही भाविक या प्रसादाशिवाय जात नाही.

Jyotiba: ज्योतिबाच्या यात्रेतील सासनकाठी परंपरा नेमकी काय ते जाणून घ्या

ज्योतिबा हा केदारनाथाचा अवतार

ज्योतिबा हा केदारनाथचा अवतार मानला जातो आणि महाशिवरात्रीच्या काळात किंवा पौर्णिमेला डोंगरावर राहून नैवेद्य दाखवण्याची परंपरा अत्यंत जुनी आहे. ज्योतिबा मंदिरात प्रत्येक रविवार, पौर्णिमा आणि चैत्र यात्रेच्या दिवशी खिचडी तयार केली जाते. याशिवाय काही जण नवस पूर्ण झाल्यावरती तर काही जण घरून देखील खिचडी बनवून आणतात. पण इथे ही खिचडी मंदिराच्या आवारातच बनवली जाते.

खिचडीचा प्रसाद साधेपणा आणि सात्विकतेचे प्रतीक

लोकश्रद्धेनुसार खिचडीचा हा प्रसाद साधेपणा आणि सात्विकतेचं प्रतीक मानलं जातं. ज्योतिबाला खिचडीचा नैवेद्य देणं ही कृती, परंपरा आणि कृतज्ञतेचे सुंदर धार्मिक पद्धत मानली जाते.

Jyotiba story: ज्योतिबा आणि गुलाल यांचं नातं आहे खूप खास, जाणून घ्या यामागील कारण

देवाला नैवेद्य दाखवण्यामागील श्रद्धा

तयार खिचडी प्रथम ज्योतिबा देवाला अर्पण केली जाते. त्यानंतर ती प्रसाद म्हणून भाविकांमध्ये वाटली जाते. लोकश्रद्धेनुसार या प्रसादाचे सेवन केल्याने मनोकामना पूर्ण होतात आणि देवाची कृपा प्राप्त होते.

चैत्र पौर्णिमा यात्रेचे विशेष महत्त्व

चैत्र पौर्णिमेला ज्योतिबा यात्रेचा उत्साह शिगेला पोहोचतो. गुलालाची उधळण, जयघोष आणि धार्मिक वातावरणात खिचडी प्रसादाची परंपरा भक्तांसाठी विशेष आकर्षण ठरते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: ज्योतिबा देवाला खिचडीचा नैवेद्य का दाखवला जातो?

    Ans: लोकश्रद्धेनुसार खिचडी हा सात्विक आणि साधेपणाचे प्रतीक असलेला प्रसाद मानला जातो. भक्तिभावाने अर्पण केलेली खिचडी देवाला प्रिय मानली जाते.

  • Que: खिचडीचा नैवेद्य कोणत्या दिवशी विशेष केला जातो?

    Ans: चैत्र पौर्णिमा यात्रा, प्रत्येक पौर्णिमा, रविवार आणि महाशिवरात्रीच्या काळात खिचडीचा नैवेद्य विशेष केला जातो.

  • Que: खिचडीचा प्रसाद धार्मिक दृष्ट्या काय दर्शवतो?

    Ans: हा प्रसाद साधेपणा, सात्विकता, समानता आणि अन्नदानाची भावना दर्शवतो.

Web Title: What is the tradition of offering khichdi to jyotiba

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2026 | 10:30 AM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • jyotiba temple

संबंधित बातम्या

Nag Panchami 2026: नागपंचमीला बहीण भावासाठी उपवास का करते? जाणून घ्या या परंपरेमागचे खास कारण
1

Nag Panchami 2026: नागपंचमीला बहीण भावासाठी उपवास का करते? जाणून घ्या या परंपरेमागचे खास कारण

Surya Ketu Yuti: नागपंचमीच्या दिवशी सिंह राशीत सूर्य आणि केतूची होणार युती, या राशींच्या लोकांनी कुटुंबाची घ्यावी काळजी काळ
2

Surya Ketu Yuti: नागपंचमीच्या दिवशी सिंह राशीत सूर्य आणि केतूची होणार युती, या राशींच्या लोकांनी कुटुंबाची घ्यावी काळजी काळ

Samudrik Shastra: शरीराच्या या भागांवर तीळ असणे मानले जाते अशुभ, जाणून घ्या काय सांगते सामुद्रिकशास्त्र
3

Samudrik Shastra: शरीराच्या या भागांवर तीळ असणे मानले जाते अशुभ, जाणून घ्या काय सांगते सामुद्रिकशास्त्र

Guru Nakshatra Gochar: गुरू ग्रह करणार आश्लेषा नक्षत्रात प्रवेश, या राशींच्या लोकांना नोकरी व्यवसायात मिळणार यश
4

Guru Nakshatra Gochar: गुरू ग्रह करणार आश्लेषा नक्षत्रात प्रवेश, या राशींच्या लोकांना नोकरी व्यवसायात मिळणार यश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.