
भारतात विवाह संस्कृतीला मोठं महत्व आहे. असं म्हटलं जातं की, लग्न फक्त दोन व्यक्तींचं नाही तर दोन कुटुंबाचं असतं. पती पत्नीच्या नात्याबरोबर सर्वात महत्वाचं नातं म्हणजे सासू आणि सुनेचं. घर आणि कुटुंब सांभाळण्यासाठी सासू आणि सुन एकमेकींशी कसं वागतात आणि हे नातं कसं निभावतात यावर कुटुंब अवलंबून असतं. बऱ्य़ाच सासू सुनांचं एकमेकींशी पटत नाही तर काही सासू सुनांचं नातं पाहिलं तर, तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना असं असतं. ज्योतिषशास्त्रानुसार, अशा कोणत्या राशीच्या सासू सुनेची जोडी आहे ते जाणून घेऊयात.
कर्क सासू आणि मीन सून
कर्क राशीच्या सासू अतिशय ममतेने वागणाऱ्या असतात. मीन राशीची सून भावनाशील, समजूतदार आणि नम्र असते. त्यामुळे या दोघींमध्ये आई-मुलीसारखं नातं तयार होतं.
वृषभ सासू आणि कन्या सून
दोन्ही राशी व्यवहारिक, संयमी आणि घराची जबाबदारी समजून घेणाऱ्या असतात. वृषभ सासूला स्थैर्य आवडतं आणि कन्या सून त्याच मूल्यांवर चालते. त्यामुळे घरात शिस्त, प्रेम आणि परस्पर आदर टिकतो.
तुळ सासू आणि मिथुन सून
या दोघींना संवाद आवडतो, हसतं-खेळतं वातावरण ठेवायला आवडतं. तुळ राशीची सासू संतुलन राखते आणि मिथुन सून बुद्धिमान व समजूतदार असते. दोघीही एकमेकींच्या मैत्रिणी बनतात.
सिंह सासू आणि मेष सून
दोन्ही राशी ऊर्जावान आणि आत्मविश्वासी असतात. थोडं मतभेद होऊ शकतात, पण दोघीही एकमेकींच्या प्रामाणिकतेचा आणि ताकदीचा सन्मान करतात. हे नातं “आदर आणि आत्मविश्वासाचं” उदाहरण ठरतं.
मकर सासू आणि कर्क सून
मकर सासू शिस्तप्रिय आणि जबाबदार असते; कर्क सून भावनाशील पण आदरणीय असते. त्यामुळे नातं “मजबूत पायावर उभं” राहतं – दोघीही घरासाठी त्याग करतात.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)